रशियन बनावटीची आणि एकच मात्रा पुरेशी असणारी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सक्षम असणारी स्पुटनिक-व्ही लस आता नवी मुंबईत उपलब्ध होणार आहे. नेरुळच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे आज ७५ नागरिकांना ही स्पुटनिक व्ही लस देण्यात आली.
Read More
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रशियाकडून तयार करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे उत्पादन आता भारतातही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रत्येक नागरिकाचे लसीकरण आवश्यक बनले आहे. मात्र, लसींची टंचाई लक्षात घेत मुंबई लगतच्या मोठ्या शहरांमध्ये आता लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांना सूचना दिल्या आहेत.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुरू असलेली वाढ पाहता एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोना लसीच्या तुटवड्याच्या मध्यावर आता 'स्पुतनिक-वी' या लसीला भारतात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत याबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. रेड्डीज या कंपनीतर्फे ही लस बाजारात आणली जाऊ शकते. आपत्कालीन वापरासाठी ही लस भारतीयांसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात ऑक्टोबर पर्यंत पाच कंपन्यांच्या लसी उपलब्ध होऊ शकतील, अशी शक्यता आहे.