भारतीय मसाल्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही देशांनी भारताच्या मसाल्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र भारतीय अन्न सुरक्षा महामंडळाने ' क्लिन चीट' दिल्याने मसाला उत्पादकांना दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय मसाल्याच्या उत्पादन निर्यातीत वाढ होत ही निर्यात ४.४६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वाढलेल्या मागणीमुळे तसेच वाढलेल्या निर्यात क्षमतेमुळे व वाढलेल्या मसाल्याच्या किंमतीमुळे ही वाढ झाली आहे.
Read More
गेल्या काही दिवसांपासून जगभरात भारतीय मसाल्यांच्या उत्पादनावरुन वादंग उठला आहे. भारतातील मसाले हे दर्जेदार नसून, त्यामध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ हा मानवी आरोग्यासाठी घातक पदार्थ आढळून आल्याचे दावे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देशांनी केले. त्यामुळे विविध देशांच्या नियामक मंडळांनी भारतीय मसाल्यांच्या आयातीवर अथवा वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय अन्न नियामक मंडळाने चौकशीनंतर भारतीय मसाला कंपन्यांना क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय मसाल्यांना मुद्दाम जागतिक बाजारपेठेत
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एमडीएच व एव्हरेस्ट या मसाला कंपन्यांच्या कारखान्याची झडती घेण्यात आली. परंतु बहुतांश मसाल्याच्या नमुन्यात 'एथिलीन ऑक्साईड ' मिळाले नसल्याचे नियामक मंडळाने सांगितले आहे.
पुन्हा एकदा एव्हरेस्ट व इतर मसाला कंपन्या अडचणीत आल्या आहेत. भारतीय मसाला मंडळाने हाँगकाँग येथे मसाल्याची छाननी करण्यात आल्यावर इथीलीन ऑक्साइडचे प्रमाण मिळाल्यावर नवी चौकशी सुरू केली आहे. भारतातील उत्पादनाचे ' क्वालिटी चेकिंग ' सुरू करण्यात आले असून मसाला कंपन्यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
आता मसाला कंपन्या एमडीएच, एव्हरेस्ट पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. जागतिक स्तरावर या कंपन्या रडारवर आल्या असताना पुन्हा एकदा न्यूझीलंड देशाने मसाला भेसळ प्रकरणी या मसाल्यांची चौकशी करण्याचे ठरवले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील अडचणीत वाढ होत असताना न्यूझीलंड देशाने मसाल्यातील घातक पदार्थांवर आक्षेप घेत याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
उद्यापासून रुलका इलेक्ट्रिकल लिमिटेड व होक फूडस इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांचे एस एम ई प्रवर्गात आयपीओ बाजारात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे दोन्ही आयपीओ उद्यापासून म्हणजेच १६ मे ते २१ मे २०२४ पर्यंत गुंतवणूकीसाठी खुले असणार आहेत. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती....
भारतीय मसाला कंपन्यांच्या युएसमधील शिपमेंट (निर्यात)अतिरिक्त हानिकारक पदार्थांचा वापर व कथित दूषित भेसळीच्या आरोपांमुळे नाकारल्या गेल्या आहेत. २०२१ पासून सातत्याने या भारतातील मसाल्याची निर्यात युएसमध्ये रोखल्या गेल्या होत्या. यामध्ये युएस रेग्युलेटरी आकडेवारीनुसार या नाकारलेल्या शिपमेंटमध्ये आतापर्यंत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाँगकाँगनेही मागच्या महिन्यात एमडीएच व एव्हरेस्ट या भारतीय मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली होती.
जागतिक पातळीवरील भारतीय मसाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने भारत सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. भारत सरकारने इथिलिन ऑक्साईडचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यातीत तयार केलेल्या मसाल्यावर आता निर्बंध घातले आहेत. मसाल्यावर आता सरकारची करडी नजर असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात केलेल्या भारतीय मसाल्यात घातक केमिकल्सचा वापर केला जात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालात केला गेला होता.विशेषतः एमडीएच व एव्हरेस्ट मसाला या उत्पादनावर आरोप झाल्याने भारत सरकार अँक्शन मोडवर आले आहे.
मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावातुन २ लाख रूपयांचे भेसळयुक्त मसाले जप्त करण्यात आले आहेत. मसाल्यांमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसून येते. ही भेसळ प्रामुख्याने मसाल्यांचे वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी केली जाते. विटांची पूड, सिमेंट, पपईच्या बिया किंवा चुना असे घटक या भेसळीसाठी वापरले जातात. त्यामुळे खोट्या आणि हानिकारक मसाल्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
संसाराचा गाडा चालविण्यासाठी पापड, मसाले तयार करणे, यासारख्या लघुउद्योगापासून सुरुवात करून त्याला आज एका उंचीवर नेण्याचे काम कल्याणमधील निर्मला अरविंद जोशी यांनी केले आहे. सध्या त्यांच्या पोळीभाजी केंद्रात अत्याधुनिक अशी पोळी आणि भाकरी बनविणारी मशीन असून त्यावर काम चालते. निर्मला यांच्या या संघर्षमय प्रवासावर टाकलेला प्रकाश.
आपल्या दैनंदिन आहारातही बदलत्या ऋतुमानानुसार काही अमूलाग्र बदल करायला हवेत.