Atul Parchure : मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका विश्वातील हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन.
Read More
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) फिल्म मार्केटकरीता तीन मराठी चित्रपटांची यंदा निवड झाली आहे. यात शशी खंदारे दिग्दर्शित 'जिप्सी', श्रीकांत भिडे दिग्दर्शित ‘भेरा’ आणि मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या चित्रपटांची निवड झाल्याची (Cannes Film Festival) माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. परंतु, अगदी शेवटपर्यंत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतच होते. दरम्यान, जयंत सावरकर यांची सुरुवातीच्या काळात बदली कलाकार म्हणून ओळख होती. जर कोणताही कलाकार उपलब्ध नसेल तर त्या कलाकाराच्या भूमिकेसाठी जयंत सावरकरांची वर्णी लागत असे, अशी माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. यावेळी चंद्रकांत यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देखील दिला.
महाराष्ट्राचे लाडके लेखक व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा उत्तरार्ध लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या शुक्रवारी ११ जानेवारी २ महत्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले ते म्हणजे 'उरी' आणि 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे
पुणे आणि मुंबईतील काही सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा आपल्या थिएटरमध्ये दाखविण्यास नकार दिला आहे.
'भाई' या पु.ल. देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा
‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे या सिनेमात नव्याने रसिकांना पाहायला मिळणार आहे.
‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.