शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'च्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
Read More
जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर उर्जेची मागणी वाढत आहे. याच वाढत्या मागणीचा फायदा घेत भारतीय उत्पादक सौर मॉड्यूल्सची जगातील प्रमुख देशांमध्ये निर्यात करत आहेत. भारतीय सौर मॉड्यूल्सची निर्यात भविष्यातही अशीच राहिल. कारण, सध्या जगभरात चीन अधिक-एक रणनीतीचा वापर केला जात आहे.
नुकतेच भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाचे नव्याने गठन करण्यात आले असून त्यात सुधा यादव या एकमेव महिला आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज भाजपच्या संसदीय मंडळात होत्या. सुधा यांचे नाव देशपातळीवर इतके परिचित नसतानाही त्यांची निवड का, हाही एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानिमित्ताने सुधा यादव यांचा इतिहास आणि त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी 1987 मध्ये रूडकी ‘आयआयटी’तून पदवी प्राप्त केली. 1999 मध्ये राजकारणात प्रवेश केला. परंतु, त्यानंतर भारत-पाकिस्तान कारगिल
ज्या शाळांच्या भिंतीवर यापुढे ‘मुंबई महापालिका अनुदानित शाळा’ असा फलक नसेल, त्या शाळांचे अनुदान बंद करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका शिक्षण समिती अध्यक्षांनी दिला आहे.