अमित साटम; आवर न घातल्यास कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल मुंबई आणि महानगर परिसरामध्ये गेल्या ११ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत प्रकल्प मार्गी लावून शहर आधुनिक व सुरक्षित करण्याचे प्रयत्न होत असताना, मुंबईचा रंग बदलण्याचे काही घटकांचे प्रयत्न आहेत. मतांच्या राजकारणासाठी या शहराचे ध्रुवीकरण करण्याचा यामागे डाव असल्याचा दावा अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
Read More
धारावी अधिसूचित क्षेत्रातील (डीएनए) ६२० एकर जागेपैकी पुनर्वसनासाठी अयोग्य असलेल्या मालमत्तांची जागा वगळून उरलेल्या जमिनीतून ५०% जागा ही सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार आहे. निविदेतील तरतुदीनुसार, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविला जाणार असल्याने स्थानिकांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडणार आहे. मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा, दर्जेदार सार्वजनिक सेवा -सुविधा, रस्त्यांचे जाळे आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे धारावीचा कायापालट होणार आहे.
मुंबईतील जुन्या चाळी आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना तेथील मंदिरांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गुरुवार, १३ मार्च रोजी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना अपात्र ठरवणारी कायद्यातील तरतूद योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका जनहीत याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिला आहे. मात्र,राज्य शासनाच्या वतीने 'विशेष जनहिताच्या प्रकल्पाचा 'दर्जा प्राप्त असल्याने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील वरच्या मजल्यावरील झोपड्याना हा निकाल लागू असणार नाही. राज्य शासनाने आधीच घोषित केलेल्या धोरणानुसार धारावीतील वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना पुनर्विकास प्रकल्पात सामावून घेतले जाणार आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी आणि आजूबाजूच्या निवासी आणि अनिवासी गाळ्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि डीआरपीच्या माध्यमातून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हेक्षण करत आहे. या सर्व्हेक्षणाला धारावीकरांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. "या सर्वेक्षणाला मूळ धारावीकरांचा विरोध नसून विरोध करणाऱ्यांनी धारावीतील या घाणीत राहून दाखवावे आणि मग विरोध करावा", अशी तीव्र भावना धारावीतील महिलांनी आणि नागरिकांनी दैनिक
( SRA ) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींची संरचना आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच, झोपु योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारती म्हणजे एक प्रकारची उभी झोपडपट्टीच असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. 'या उभ्या झोपड्यांचे आम्हाला कौतुक नाही', असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
रेल्वे जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यांना प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका १० वर्षांच्या आत कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. पुनर्विकासाठी निविदा भरलेल्या विकासकांची निवड होणार, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचा सरकारचा निर्णय आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आलेल्या निविदांची समितीकडून छाननी होणार आहे.
गोपाळ शेट्टी : झोपडपट्टी पुनर्विकास - मुंबईकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासावरून खा. गोपाळ शेट्टींचा पुन्हा आक्रमक पवित्रा मुंबईकरांना पाहायला मिळाला. मालाडमधील एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील ३ रहिवाशांच्या बाबतीत प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी पात्र असलेल्या झोपडी धारकांना खोली खाली करण्याचे आदेश दिल्याचा दावा करत रहिवाशांनी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांना तक्रार केली.
आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
झोपू योजनेत सदनिकांच्या खरेदी विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही