डेटा डायनॅमिक अॅनालिसिस अँड रिसर्च फाऊंडेशन, नवी दिल्ली य आणि टाटा इंस्टिटयुट ऑफ सोशल सायन्स(टीस) च्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण : समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) आणि माहिती तंत्रज्ञान (खढ) यांचा वापर" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे.हा परिसंवाद डेटा डायनॅमिक अॅनालिसिस अँड रिसर्च फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत अरमायटी देसाई हॉल, मुख्य कॅम्पस, टिस मुंबई येथे होणार आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा लाल किल्ल्यावरुन केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या उद्बोधनात देशाची लोकसंख्या रचना (डेमोग्राफी) बदलण्याच्या षड्यंत्रावर परखड भाष्य केले. त्याच्याच एक दिवस आधी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’च्या दिवशी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या मुंबईतल्या संस्थेने ‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ हा माहितीपटदेखील प्रदर्शित केला. यानिमित्ताने भारतात अवैध घुसखोरीच्या माध्यमातून लोकसंख्याबदलाचे जिहादी षड्यंत्र कसे पद्धतशीरपणे राबविले जात आहे, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात सुधारणा केली आहे. त्यामध्ये दिल्ली सल्तनत आणि मुघल काळात "धार्मिक असहिष्णुतेची" अनेक उदाहरणे आढळून आल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येचे स्वरूप बदलत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबई शहरातील लोकसंख्येच्या रचनेवर खोलवर परिणाम करणारे बदल नमूद केले आहेत. हिंदू लोकसंख्येमधील लक्षणीय घट आणि मुस्लिम लोकसंख्येतील लक्षणीय वाढ ही चिंताजनक बाब असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधून, विकास अभ्यास (Development Studies) या विषयावर उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी पल्लवी रामाणे हिला ईशान्य भारतात जायचं होते.
अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ
‘सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या माध्यमातून ८५ युवांना समाजाच्या उत्थानासाठी नि:स्वार्थीपणे प्रेरित करणे, त्यांच्याकडून समाजकार्य करून घेणे, त्यातूनच त्या विद्यार्थ्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे, त्यांच्यातील राष्ट्रप्रेम, समाजनिष्ठा जागवणे, हे काम ‘सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुप’ करत आहे. या ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत, प्रा.अमेय महाजन. या ग्रुपचे उद्दिष्ट हेच की, सुट्टीच्या काळात तरुणांना प्रशासनासोबत काम करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे. प्रशासनालाही मानवी रूप असून भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा आणि कल्याणपूर्
‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ अंतर्गत स्वमग्न मुलांना त्यांच्या गरजेनुसार, स्वमग्न अनुकूल शिक्षण पद्धतीने त्यांना शैक्षणिक मदत आणि वास्तविक जगाशी जुळवून घेण्यासाठी सहकार्य केले जाते. ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ चे वेगळेपण म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या थेरपी, प्रत्येक स्वमग्न मुलाच्या गरजेनुसार वैयक्तिक सर्वांगीण विकास उपक्रम निदान प्रणाली (उपचार पद्धती) आहेत.
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ व तांडा प्रकल्प ऊछढ संसाधन केंद्र (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजातील ३०० कार्यकर्त्यांची एकदिवसीय ‘कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा’ दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून ३०० स्त्री-पुरुष, शिक्षित, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विकारमुक्त जीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण सबंध जोडत असू, तर त्यात आपल्याच आध्यत्मिक परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे होईल.