साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी s5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज ‘धर्मवीर २’ या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Read More
प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २:साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रेक्षकांनी धर्मवीर १ ला जितका प्रतिसाद दिला तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रेम धर्मवीर २ ला मिळालं. चित्रपटगृहात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हि
मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरुपात आपल्यासमोर येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे यांचं पहिलं दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असणारा ‘फुलवंती’ हा ऐतिहासक चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला.
धर्मवीर २' हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना आवडली असून त्याची प्रचिती बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. 'धर्मवीर २ :'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाची व्याख्या दाखवण्यात आली आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर १'च्या यशानंतर नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनाही दुसऱ्याही भागाला उत्तुंग प्रतिसाद दिला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत तुफान कमाई केली आहे. प्रसाद ओक यांची प्रमुख भूमिका असणारा 'धर्मवीर २'चे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.
प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख राज्यात ओढावलेल्या पुरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आधी ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र आता प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर करण्यात आली आहे.
गेले काही दिवस राज्यभरात मुसळगार पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याचमुळे बहुचर्चित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘धर्मवीर – २’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या "धर्मवीर - २" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन,ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. या म्युझिक लाँच कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 'आनंद माझा' या पुरस्काराने गौरवण्यात आले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनाचा आढावा घेणारा धर्मवीर..मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होता. आता धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्या
क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या "धर्मवीर -२" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे. ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. ३० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख रिलीज करण्यात आली. धर्मवीर २ हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा धर्मवीर १ आणि धर्मवीर २ हे चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर उपस्थित होते. यावेळी सचिन यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer 2) यांचा जीवनपट मांडणारा ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ (Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा करण्य
'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता सिनेरसिकांना 'धर्मवीर २' चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि निर्माता मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चित्रपटाविषयी भाष्य केले आहे.
‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच सुरु झाले असून चित्रकरणाची पहिली झलक समोर आली आहे.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. हीच जबबादारी अभिनेता प्रसाद ओक याने लिलया सांभाळली आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता धर्मवीर २ ची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्टरचे अनावरण केले. धर्मवीर २ च्या घोषणेनंतर मुंबई तरुण भारतशी बोलताना चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, धर्मवीर २ या चित्रपटाची संपूर्ण टीम ही तीच असणार आहे. प्रसाद ओक दिघेंच्या भूमिकेत असणार असून क्षितीज दातेच एकनाथ शिंदे
पोलिसांचे आयुष्य आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. मराठीतच म्हणायचे तर ‘दे दणादण’, ’माझा छकुला’, ‘पछाडलेला’, ’पोलीस लाईन’, ’शेंटीमेंटल’, ’मुंबईचा फौजदार’ किंवा मग सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट असो, त्यातही त्यांनी मनाला भिडणारा हवालदार कायम साकारला. असे हे ज्यावेळी कलाकार पोलिसांची वर्दी अंगावर चढवतात, त्यावेळी त्यांच्या मनातल्या भावना नेमक्या काय असतात, हे आगामी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर काही कलाकारांशी संवाद साधून जाणून घ्यायचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेल