‘अखंड भारत व्यासपीठ’ हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे या वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाचा अध्यक्ष म्हणून येणार्या कालावधीमध्ये आयोजित उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
सोने खरेदी करणे म्हणजे गुंतवणुकदारांची पहिली पसंती राहिली आहे. परंतु सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेलच असे नाही. २०२४ या वर्षी सोने - चांदीने वाढीचा सर्वाधिक वाढीचा विक्रम केला आहे. सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढा झाली आहे. जवळपास साधारण १७ ते १८ हजारांनी सोने महागले आहे.
Avani Lekhara पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखरा या शूटरने सुवर्ण पदक पटकावले आहे. एअर रायफल स्टँडिंग एसएच १ अवनीने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घालत सबंध भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे बारताच्या मोना अगरवालने याच खेळात कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. यामुळे देशाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
Neeraj Chopra भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. मात्र, नीरजच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालेल असे अनेक भारतीयांचे स्वप्न होते. मात्र, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने ८ ऑगस्ट रोजी सुवर्णपदक पटकावून पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आशिया खंडाचे नाव उंचावले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नीरज चोप्राच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून अनेकांची मने जिंकली आहेत.
युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात संमिश्र प्रतिक्रिया आल्याने सीपीआय (Consumer Price Index) आकडेवारी आल्यानंतर व युएस डॉलरमध्ये घसरण होताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
अमेरिकन फेडरल व्याजदर कपात होईल या आशेनंतर अमेरिकन पीएमआय आकडेवारीनंतर बाजारात सोने वधारले होते. काल झालेल्या वाढीनंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एस अँड पी ग्लोबलने परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) जाहीर केल्यानंतर उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक मे मधील ५१.३ वरुन ५१.७ वर पोहोचला होता त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा कायम राहिली होती. मे मधील सेवा क्षेत्रातील पीएमआय ५४.८ वरुन जूनमध्ये ५५.१ वर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील आर्थिक आकडेवारीत घसरण झाल्यामुळे तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने अमेरिकन बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोने महागले आहे.
गुंतवणूकदारांना सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, युएस पेरोल डेटा, डॉलर्स निर्देशांकात झालेली वाढ व चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने घोषित केल्याप्रमाणे विदेशी मुद्रेत न झालेला बदल, देशांतर्गतील धोरणे, घटलेली मागणी अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या निर्देशांकात काल आणि आज मोठी घसरण झाली आहे.
युएस यील्डमध्ये घसरण झाल्याने तसेच युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता गुंतवणूकदारांनी नोंदवल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आशियाई बाजारात निर्देशांकात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी महागली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावात नियंत्रण आल्याने कालपासून सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली असल्याने अखे
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे दर घटले आहेत. मुख्यतः सकाळी डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. येत्या गुरुवारी वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) चे आकडे व सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ची आकडेवारी येणार आहे.तज्ञांच्या मते हे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता लक्षात घेता बाजारातील सोन्याचे भाव वधारले आहेत.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची किंमत वधारल्याने बाजारात सोने चांदी किंमतीत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३ टक्यांने वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९७ ते १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोने ०.०५ टक्क्यांनी महागले असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७३७५० रुपयांवर पोहोचले आहेत.
अमेरिकन बाजारातील महागाई आकडे आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकात वाढ झाल्याने आशियाई बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १२.१५ वाजेपर्यंत ०.२० टक्यांने वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०४ टक्क्यांनी वाढ होत सोने ७३१२९.०० पातळीवर पोहोचले आहे.
भारतातील सोने चांदी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आज सराफा बाजारात सोने उसळले आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील सराफा बाजारात 'गुड रिटर्न्स'संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीनुसार, देशात २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम दरात ४०० रूपयांनी वाढ होत सोने ६७१५० रुपयांवर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४३० रुपयांनी वाढ होत दर ७३२५० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.स्थिर रुपया, तसेच पुरवठ्यातील नियमितता व बाजारातील स्थैर्य यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०१ टक्क्यांनी घसरण होत सोने ७२७२२.०० पातळीवर पोहोचले आहे.
अक्षयतृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने त्यांचे परिणाम भारतीय बाजारात झाले आहेत. कालपासून स्वस्त झालेले सोन्याचे भाव दुपारनंतर पुन्हा वधारले आहेत.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.६४ टक्क्यांनी वाढ झाली असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७१११९.०० पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकातही १.५४ टक्क्यांनी वाढ झाल्याने चा
अमेरिकन युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही कपात झाली नसल्याने बाजारात काही प्रमाणात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत असताना व्याजदरात वाढ न झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.जून पर्यंत व्याज दर कपात पुढे ढकलल्याने तारण कर्ज दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. तुलनेने कर्ज व्याजदर स्वस्त राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकतेचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर जागतिक पातळीवरील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय फेडची बैठक आज समाप्त होणार असून याविषयी जेरोम पॉवेल आपला फेडरल रिझर्व्ह व्याजदराचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये व्याजदरत बदल झाला का नाही झाला याबाबत कळेल परंतु त्याआधी रोजगार निर्मितीची अपेक्षित आकडेवारी अमेरिकेत आली नाही.व्याजदर घोषित करण्याच्या पूर्वसंध्येला बाजारात एक काळजीवाहू काळ सुरू झाल्याने बाजारात क्रूड तेलाच्या आंतरराष्ट्रीय मागणीत घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र भावना असताना क्रूडसोबत सोन्यानेही आपली हजेरी लावली आहे.अमेरिकन बाजारातील सोन्याच्या मागणीत झाली आहे. अक्षय तृतीयेच्या नंतर पुन्हा एकदा सोने चढ्या भावाने नोंदवले गेले आहे.आज युएस सोने फ्युचर निर्देशांकात वाढ झाल्यावर आशिया बाजारातही सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. कालपर्यंत घसरलेले भाव पुन्हा वाढत सोने व चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात देखील उमटले आहेत. युएस स्पॉट गोल्ड दरात आज घट झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी युएस गोल्ड स्पॉट फ्युचर दर ८८ अंशाने घसरत २३०४ डॉलर्सपर्यंत गेले होते. मध्यपूर्वेतील दबावात घट होऊन बाजारात स्थिरता आल्याने आज सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही.
आज सोने गुंतवणूकदारांना चांगली गुंतवणूकीची संधी आली आहे. गेल्या महिन्यात सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती आज मात्र थंडावल्या आहेत.गेले काही दिवस सराफा बाजारात सोने किंमतीत मोठे चढ उतार पहायला मिळाला आहे. या अनुषंगाने आज देशातील सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. देशात सरासरी प्रति ग्रॅम किंमतीत ५० रुपयांनी घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
चित्रपटांच्या चंदेरी दुनियेकडे कलाकारांना आकर्षित करते ते ‘फेम’ आणि ‘ग्लॅमर’. अशा या कलाकार मंडळींना कायमच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांची पाठीवरील शाब्बासकी आजही तितकीच महत्त्वाची असते आणि त्याकरिता प्रत्येक कलाकार आपली प्रत्येक भूमिका ही उत्तमपणे कशी साकारता येईल, यासाठी झटत असतो. आता हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचे झाल्यास, ८०-९०च्या दशकात जे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, त्यांच्यापुढे कालानुरुप मनोरंजनाची बरीच दालनं खुली झाली. त्यापैकीच एक महत्त्वाचे माध्यम किंवा व्यासपीठ म्हणजे ‘ओटीटी’ वाहि
जागतिक पातळीवर अस्थिरमुळे आज क्रूड तेल व सोने निर्देशांकात वाढ झाली आहे. मध्य पूर्वेकडील दबाव, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्षा यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीत वाढ झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात ०.५० टक्क्यांनी १० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक ७०५६ रूपयांवर पोहोचला आहे.
आज पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.सोने एमसीएक्सवर ०.७८ टक्क्यांनी वाढत ७१४६५ पातळीवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर चांदीच्या भावात ०.६९ टक्क्याने वाढ होत ८२४४० रुपयांपर्यंत चांदी पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रकारच्या सोन्याच्या १० ग्रॅम भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे.
उद्या गुढीपाडव्याच्या सणासुदीच्या दिवशी सोने खरेदीचा बेत असेल तर सावधान! गेल्या एक महिन्यापासून सोन्या चांदीच्या किंमती नव्या उच्चांकावर जात असताना आज सोने चांदी भावाने शिखर गाठले आहे. एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वरील सोने निर्देशांकात ०.४३ टक्क्याने व चांदीच्या निर्देशांकात ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसातील हा नवा उच्चांक आहे.
काल रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. भारतातील विदेशी मुद्रेतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत होते. कालपर्यंत स्वस्त झालेले सोने आज पुन्हा महागले आहे. आज देशातील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सोने १२०० रुपयांनी वाढत ६५३५० रूपयावर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात १० ग्रॅममध्ये १३१० रुपयांनी वाढ होत ७१२९० रुपयांवर पोहोचले आहे.
गुरूवारी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्यानंतर मात्र सोने चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. शुक्रवारी डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत नियंत्रित झालेल्या पाहिला मिळाल्या आहेत. दुपारी ३ पर्यंत एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.७३ टक्क्याने घसरण होत निर्देशांक ६९६२८ पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा एमसीएक्सवर (Multi Commodity Index) निर्देशांक ०.७७ टक्क्याने घटत ७९३६५ पातळीवर पोहोचला आहे.
युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात होण्याची चिन्हे जेरोम पॉवेल यांच्या भाषणानंतर शक्यता दिसल्याने सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. पुरवठ्यपेक्षा वाढलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही भाव वाढ झाली आहे .
आज सराफाबाजारात सोनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वच शहरातील प्रति ग्रॅम किंमत वाढली आहे. देशातील सरासरी दराप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅममागे ३५ रुपयांनी भाववाढ झाली आहे. तर १० ग्रॅम सोने किंमत ३५० रुपयांनी वाढल्याने सोन्याचा किंमती गगनाला भिडल्या आहेत.
आज २५ मार्च रोजी सोन्याच्या भावात कुठलाही बदल झालेला दिसत नाही. मार्चमध्ये सोनाच्या भावात ६ टक्क्याने वाढ झाली आहे. शनिवारी सोनाच्या भावात घट झाली होती. २३ मार्चला प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १० रुपयांने घट झाली होती.आज २५ मार्चला सोन्याचे भाव ' जैसे थे ' राहिले आहेत.भारतातील सोन्याचे सरासरी दर २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ६१२५ रुपये असू़न २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ६६८२ रूपये झाले आहेत.
युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात न केल्याने आशियाई बाजारातील गुंतवणूकीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. विशेषतः सोन्याच्या भावात देखील नवी उभारी सराफा बाजारात नोंदवली गेली आहे.सकाळच्या सत्रात सोनाच्या भावात प्रति १० ग्रॅम किंमतीत १०२८ रुपयाने वाढ झाली आहे.
Gold Silver Price Latest : गेले काही दिवस सोन्याच्या भावात मोठी वाढ पहायला मिळत होती. २०२४ मध्ये सोन्याचे चढे दर पहायला मिळाले असतानाच आता सोन्याचे भाव विक्रमी किंमतीवर पोहोचले आहेत. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २२ कॅरेट प्रकारात प्रति ग्रॅम सोने १५ रूपयांनी वाढत ६०२५ रूपये प्रति ग्रॅम दरावर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोने दरात १७ रूपयांनी वाढ होत ६५५३ रूपये प्रति ग्रॅम झाले आहे.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याज रेट कपातीच्या संभाव्यतेने सोने बाजारात उसळी मारत सोन्याचे नवे उच्चांक प्रस्थापित केला आहे. सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात भरघोस वाढ झालेली आहे. मार्चमध्ये सुरूवातीलाच २२ कॅरेट व २४ कॅरेट मूल्यात दरवाढ झाली आहे.
देशात सोने चांदी अखेर महागली आहे. सोन्याच्या निर्देशांक ९० अंशाने वाढत ६२३६० रूपये प्रति १० ग्रॅम व चांदीचा निर्देशांक ११० अंशाने वाढत ७१६८० प्रति किलोपर्यंत वाढला आहे. आज अंदाजे सोन्याच्या भावात वाढ होऊन ५७६० रूपये प्रति ग्रॅमने सराफ बाजारात विकले जात आहे. विशेषतः मुंबईत आज सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्याच्या प्रकारात प्रति ग्रॅम ५७६० रूपये ठरला आहे. २४ कॅरेट प्रकारात ६२७४ रुपये प्रति ग्रॅमने सोने महागले आहे.
काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. आपल्या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचा देखील खुलासा केला आहे. सोनिया गांधी उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे त्यांच्या मूळ देशात म्हणजेत इटलीमध्ये अजूनही संपत्ती आहे. यासोबतच त्याच्याकडे ८८ किलो चांदी आणि १..२८ किलो सोने आणि दागिने आहेत. याशिवाय त्यांची दिल्लीतही जमीन आहे.
आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याच्या निर्णयावर उद्योगाशी निगडीत लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वैश्विक अडचणींचा सामना करतानाच महागलेले तेल,पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती यानंतर पेटीएम फिनटेकवरील वाढलेल्या अडचणीत मात्र बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचे भाव मात्र वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे विनिमय मूल्यात कपात झाल्याने त्याचा परिणाम कमोडिटी एक्सचेंज मध्ये दिसून आला आहे.
सण-उत्सवांची सुरुवात झाली असून बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे. आज विजयादशमी असून यादिवशी सोनं खरेदी करण्याचा मान आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. आजचे मुंबईतील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. Gold price
वैश्विक युद्ध, मंदी व अर्थव्यवस्थेतील अडचणीच्या कालावधीत देखील काल रूपयाचा भाव वधारला असल्याने काल सोने चांदीच्या किंमतीत कपात झाली असली तरी दसरा सणाच्या निमित्ताने वाढलेली सोन्या चांदीची मागणी याचा एकत्रित परिणाम म्हणून आज पुन्हा एकदा भाव वाढले आहेत. MCX मध्ये मेटलची देखील भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी झुंबड उडते. दसरा हा अत्यंत महत्वाचा सण हिंदू समाजासाठी मानला जातो. याच्यातच गेले काही दिवस इस्त्रायल हमास युद्धाचे सावट असल्याने मार्केट मध्ये मंदीचे सत्र सुरू होते. तेलाच्या पर बॅरल दरात अस्थिरता असतानादेखील आज सोने चांदीच्या एमसीएक्स दरात मात्र कपात झाल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी हा शुभशकुन मानला जात आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार,जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 90 रुपयांनी वधारून 59,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीही ८०० रुपयांनी वधारून ७५,३०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ५५४० रुपये जो काल ५५२५ रुपये प्रति ग्रॅम होता.२४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ६०४४ आहे जो काल ६०२८ रुपये प्रति ग्रॅम होता.२२ कॅरेट सोन्याची किंमत १५ रुपये व २४ कॅरेट साठी १६ रुपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे.
अंतर्मनाची साद ऐकून सिल्व्हर ओकवर गेलो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दि. १५ जुलै रोजी अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना दुखापत झाल्यानं त्यांची विचारपूस करण्यासाठी अजितदादांनी ही भेट घेतली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी ते सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर दि. १४ जुलै रोजी सकाळी ब्रीच कॅंडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेल्याची चर्चा आहे.
सोनेतारण कर्जाप्रमाणेच आता चांदीवर सुध्दा कर्ज मिळणार आहे. यासाठी पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे.
अमेरिकेतील अर्थव्यवस्था ‘टाईम बॉम्ब’च्या तोंडावर उभी असून, तेथील बँकिंग संकट येत्या काळात आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. भारतासाठी हे वर्ष आर्थिक आव्हानांचे असेल, असा इशारादेखील त्यांनी गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्यानंतर दिला होता. सुदैवाने भारतावर ती वेळ आली नाही, येणारही नाही!
अमेरिका तसेच युरोपमधील बँका सध्या आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. तेथील तीन बँकांना टाळे लागले, तर एका ‘स्विस बँके’चे विलिनीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय बँका वित्तीय संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्याविषयी...
मुंबई : आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पाहायला मिळते. त्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या दिवशी सोनेखरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईत सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी थेट सिल्व्हर ओक ला भेट दिली. दरम्यान, या भेटी मागे कोणतेही राजकारण नाही. तसे कोणीही करु नये, असे उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच मविआ आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमुळे ‘मविआ’च्या ऐक्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे.पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चाही झाली. त्यामुळे या भेटीनंतर आता कुठल्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.