कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रभावित झाली. मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली, मात्र यादरम्यान बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.
Read More
मध्य रेल्वेने ३९९ किलोमीटर रेल्वे मार्गावर स्वयंचलीत सिग्नल प्रणाली स्थापित केली आहे. मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी व ज्या क्षेत्रात ट्राफिक जास्त आहे अशा क्षेत्रात परिचालन वाढवण्यासाठी मध्य रेल्वेकडून ही यंत्रणा बसवण्याच काम केल जात आहे. अलिकडेच पुणे-लोणावळा या मार्गावर ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले.
दादर येथे ऑगस्टमध्ये सिग्नल यंत्रणेत स्त्री-पुरुष समानतेचा प्रयोग सुरू झाल्यानंतर आता वरळी सी-फेसमधील सिग्नल यंत्रणेला ‘युनिडायरेक्टरल ट्राफिक लाईट’चा नवा चमकता साज चढवला गेला आहे. यामुळे वाहतूक यंत्रणा अधिक सुरक्षित होणार असून, मुंबईच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.