पणजी : ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असून यंदा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’ने जगभरातील उत्तम चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपट समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेते वाईल्ड लाईफ फिल्म मेकर सुबैय्या नल्लामुथू असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माते, दिग्दर्शक, लेखक असणार्या दहाजणांची टीम कार्यरत होती. त्यापैकी गेल्या 3० वर्षांपासून स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून कार्यरत असणार्या समितीच्या सदस्य उषा देशपांडे ( Usha Deshpande ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी उषा यांनी सध्याच्या
Read More
इजिप्तमधील महत्वाचा मानला जाणारा ब्रिटिश यूनिव्हर्सिटी इंटरनेशनल स्टूडंट्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या 'अत्तर' या कलाकृतीची निवड झाली असून ही बाब देशासोबतच महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे. हा चित्रपट महोत्सव ए. आय. शोरूक, न्यू कैरो, गव्हर्नरेट, इजिप्त या ठिकाणी १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. गटाराची साफ सफाई करणाऱ्या कामगारांचा प्रश्न हा जगभर आहेच. गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला द्यायची असून वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी त्या मुलीच्या संघर्षाची
कलाक्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अवलिया शिरीष पवार यांच्याविषयी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या ३ डिसेंबर २०२३ रोजी ‘चैत्यभूमी’ या सोमनाथ वाघमारे दिग्दर्शित माहितीपट कोलंबिया यूनिव्हर्सिटीत दाखवला जाणार आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील इन्स्टिटयूट फॉर कॅम्पाराटीव्ह सोसायटी अँड लिटरेचर या विभागातर्फे हा माहितीपट दाखवला जाणार आहे.
‘अभिनय कट्ट्या’वर अभिनयाचा श्रीगणेशा करून थेट चित्रपटसृष्टीला गवसणी घालणार्या अथर्व किरण नाकती या होतकरू युवा कलाकाराविषयी...
विवेक समुहाची निर्मिती असलेल्या 'दुर्दम्य लोकमान्य' ह्या लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचे पदर नव्याने उलगडून सांगणाऱ्या माहितीपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकतीच विशेष स्क्रिनिंगसाठी निवड करण्यात आली आहे.
कलाकारांना घडविण्याचे काम ‘वेध अकादमी’च्या माध्यमातून डोंबिवलीतील संकेत ओक करीत आहेत. संकेत यांचा हा जीवनप्रवास कसा आहे, तो जाणून घेऊया.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य नेते आणि आधुनिक लोकशाही राष्ट्रवादाचे प्रणेते निष्काम कर्मयोगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील ‘दुर्दम्य लोकमान्य’ हा लघुपट ठाण्यातील मान्यवरांना दाखविण्याचा मानस आहे. सा. ‘विवेक’ समूह आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’ निर्मित या लघुपटाचा प्रयोग फ़क्त निमंत्रितांसाठी शनिवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ठाणे पश्चिमेकडील वागळे इस्टेट, रोड नं. १६ किसननगर येथील ‘सनराईज बिझनेस पार्क’ इमारतीतील ‘वास्तुरविराज ९०२'येथे आयोजित केला आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि सा. ‘विवेक समूहा’मार्फत निर्मित ‘दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक’ हा एक सर्वोत्तम लघुपट आहे, अशी भावना येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित विशेष प्रदर्शन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
नाट्य, संगीत, गायन, अभिनय, लघुपट निर्मिती आणि कलाक्षेत्रात अशी मनसोक्त मुशाफिरी करणारे कल्याणचे कलोपासक दत्तात्रय लधवा यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
भाजपच्या "सेवा आणि समर्पण" अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "कर्मयोगी नमो!" ही लघुपट स्पर्धा नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर आधारीत असेल.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या खर्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी व त्यांचा जीवनपट इतरांना मार्गदर्शक होण्याच्या उद्देशाने ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने युवा पिढीसाठी ‘आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा’ आयोजित केलेली आहे.
गावाची भीषण वास्तवता मांडणारा माहितीपट; आशिष निनगुरकर यांचे प्रभावी दिग्दर्शन
कर्करोगाबद्दल जनजागृती करणार्या 'आरसा’ लघुपटाने पटकावले पाच पुरस्कार!
युट्यूबच्या माध्यमातून होणार चित्रपटाचे प्रदर्शन!
आशिष निनगुरकर यांची संकल्पना; 'नियम' पाळा, 'कोरोना' टाळा
‘देवी’मध्ये काजोलसह दिसणार दिग्गज मराठी अभिनेत्री!
तिसरा ‘चित्रभारती लघुपट महोत्सव’ संपन्न
नमामि चंद्रभागा' प्रकल्पावर निर्मित माहितीपट व लघुपटाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात झाले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहिती आणि लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
पर्यावरण क्षेत्रात विविध अंगाने व सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणा-या लघुचित्रपट निर्मात्यांकरिता ही स्पर्धा असणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही विषयाबाबत लघुपट बनवून तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन
कधी कधी काही लघुपट आपल्याला सांगून जातात कि आपल्याकडे सगळंय, आवश्यकता आहे आपल्याकडे जास्त असलेलं त्यांना द्यायची ज्यांना त्याची खरी गरज आहे. पंतप्रधानांच्या बालपणावर आधारित हा लघुपट त्यापैकीच एक.. अवश्य बघा..
( या जोडप्याकडून कुठलीही प्रेरणा घेऊ नका. लघुपटात कुणी पकडल्या जात नाही, खऱ्या आयुष्यात असे काही केले तर जेलमध्ये नक्की जावे लागणार त्यामुळे याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनीच बघावे.)
कधी कधी काही लघुपटांमध्ये पात्र नसतात, तसं पाहिल्या गेलं तर एखादी कथाही नसते, संवादही नसतात, तरी तो लघुपट एक खूप सुंदर अनुभूती देणारा लघुपट ठरतो. आजचा हा लघुपट असाच एक लघुपट आहे. यामध्ये मानवी पात्र नाहीत, संवाद नाही, पटकथा नाही, मात्र एक सुंदर अनुभूती आणि एक वेगळा विचार नक्कीच आहे.
अशा परिस्थितीत एका कष्टाळू एकट्या आईने तिच्या दोन्ही मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला, प्रसंगी गावकऱ्यांना झुगारून ती त्यांच्या शिक्षणासाठी उभी राहिली आणि त्यामुळे निर्माण झाली चंदना. मात्र शेवटी ती वयात आल्यानंतर तिच्या रुपामुळे तिने पुढे शहरात शिक्षण घेऊ नये असे तिच्या आईचे मत होते, आणि इथेच या लघुपटाला वेगळे वळण मिळते. चंदनाला शिकायचे असते, आणि तिच्या आईला तिचे लग्न करायचे असते. दुसऱ्या दिवशी चंदनाला बघायला मुलगा देखील येणार असतो. आई सकाळी उठून बघते तर काय? चंदना घरात नाही? अरे देवा.... ही घर सोडून गेली क
हे नाव विचित्र वाटतं ना ऐकायला ? मात्र इंग्रजीच्या "कडल" या शब्दाचा वापर करुन बनवण्यात आलेला शब्द म्हणजे कडली. एका छोट्या बाळासाठी सर्व सुविधायुक्त असलेला झोपाळा, ज्याला कुठेही घेऊन जाता येईल, असा हा कडली. कडल करणं म्हणजेच लाडावणं, कुरवाळणं, तर जो झोपाळा बाळाला आई सारखं कुरवाळेल ते म्हणजे कडली. सतत हे सांगण्याचे कारण म्हणजे आजचा लघुपट याच विषयावर आहे.
लहानपणापासून आतापर्यंत आपण अनेकदा अनेकांकडून एप्रिलफूल झालो असू. त्याची एक मजाच वेगळी असते. लहान असताना छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपण एप्रिलफूल केलेलं आहे लोकांना. ही कहाणी पण अशाच एका एप्रिल फूलची कहाणी आहे.
कान्स फिल्म फेस्टिवल.. एक अत्यंत महत्वाचा असा चित्रपट महोत्सव.प्रत्येक दिग्दर्शकाचं, कलाकाराचं स्वप्न असतं यामध्ये सहभागी होण्याचं आणि आपल्या पहिल्याच कलाकृतीला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्थान मिळणं म्हणजे एक अत्यंत गौरवाचा क्षण. हा क्षण अनुभवते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील २१ वर्षीय मानसी देवधर.