Siddaramaiah कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कावेरी येथील सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने २.६ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज लावला. त्यांच्यावर अनावश्यक खर्चाचे आरोप करण्यात आले आहेत.
Read More
Sheesh Mahal दिल्ली विधानसभा नुकतीच पार पडली. त्यानंतर दिल्लीत भाजपने कमळ फुलवले. शीशमहलवरून (Sheesh Mahal) आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यात आले होते. दिल्लीच्या निवडणुकीनंतरही शीशमहलचीच चर्चा आहे, भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी शीशमहल बांधण्यासाठी केजरीवाल यांनी शासनाचा किती खर्च वापरला? असा प्रश्न उपस्थित केला. त्याच त्याचपार्श्वभूमीवर प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
Rekha Gupta दिल्लीच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दि: २० फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर आता रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी निवडणुकीआधी अनेक आश्वासन दिले होते. त्यापैकी महिलांना प्रतिमहिना २५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अशातच त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेखा गुप्ता
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कार्यकाळात बांधलेला शीशमहल आज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच आता भाजपचे नेते पर्वेश वर्मा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहीत म्हटले की केजरीवालांचा शीशमहल जनतेसाठी खुला करण्यात यावा. त्यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की शीशमहाल बांधण्यासाठी तब्बल ३३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या शीशमहलात महागडे पडदे लावले गेले, तसेच स्पेशल मार्बेल बसवण्यात आले.
राजधानी चंदिगड व्यतिरिक्त पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आता जालंधरमध्ये राहण्यासाठी एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. बंगला भाड्याने घेण्याचा उद्देश या भागातील लोकांची सेवा करणे हाच असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे. याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे जालंधरमध्ये भाड्याने घर घेण्याचे बोलले होते.