मुहूर्त ट्रेडिंगनंतर आठवड्याच्या सुरूवातीलाच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये १,३५० अंकांची घसरण झाली असून निफ्टी ४५० अंकांनी कोसळला. आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजार गडगडला असून टॉप ३० कंपन्यांतील बड्या कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टायटन आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे.
Read More
मागील काही काळापासून भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होत असून गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आज सेन्सेक्स ६०२.७५ अंकांनी तर निफ्टीत १५८.३५ अंकांनी वधारला. गेल्या आठवड्यात बाजार लाल रंगात बंद होताना दिसला. त्यानंतर आता आठवड्याच्या सुरूवातीला बाजारात तेजी पुन्हा येण्याची शक्यता आहे.
भारतीय शेअर बाजार आज जवळपास क्रॅश झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यपूर्वेतील इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढता संघर्षामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, शेअर बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये सेन्सेक्स १७६९.१९ अंकांच्या घसरणीसह ८२,४९७.१० वर बंद झाला. तर निफ्टी ५४६.८० अंकांनी घसरत २५,२५०.१० वर बंद झाला.
आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स तब्बल १२७२ अंकांनी घसरला असून निफ्टीदेखील २६ हजारांच्या खाली बंद झाला आहे. आज भारतीय शेअर बाजारात ऑटो आणि बँकिंग सेक्टरमधील समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. विक्री सत्रामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
मागील तीन दिवसात सलग भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठले आहेत. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०ने आशियाई बाजारातील सकारात्मक रॅली दरम्यान ऑटो आणि मेटल स्टॉकमधील खरेदीमुळे नवा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स ६६६.२५ अंकांनी किंवा ०.७८ टक्क्यांनी वाढून ८५,८३६.१२ वर बंद झाला आहे.
शेअर बाजार सुरुवातीच्या घसरणीतून सावरला असून सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स २५५.८३ अंकांनी वधारून ८५,१६९.८७ पातळीवर स्थिरावला तर एनएसई निर्देशांक निफ्टी ५० ६३.७५ अंकांनी वधारत २६००४.१५ वर पोहोचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सुरुवातीच्या तोट्यातून सावरले असून शेवटच्या सत्रात विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
भारत हा २०३० ते ३१ पर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने पुढे जात आहे, असा अंदाज स्टँडर्ड अँण्ड पूअर्स या पतसंस्थेने व्यक्त केला आहे. Share Market update today सुरुवातीच्या आर्थिक वर्षांत ही अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वृद्धीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.२ टक्क्यांनी वृद्धीसह लॉजिस्टीक, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसह सार्वजनिक क्षेत्रावरील भार कमी करण्यासाठी सातत्याने धोरणात्मक सुधारणा गरजेच्या आहेत. भविष्यात मजबूत वृद्धीसह शेअर बाजारा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, दि. २३ जुलै सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात करताच भारतीय शेअर बाजार कोसळण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे दिवसाच्या सुरूवातीला भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली होती. पण, सरकारने भांडवली नफा कर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात जोरदार विक्री झाली.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. सकाळी ११.१५ च्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक २०.१८ अंशाने वाढला असून निफ्टी ५० निर्देशांकात १.४० अंशाने घसरला आहे.बाजार ओपनिंग नंतरच शेअर बाजारात घसरण सुरु झाली होती. सेन्सेक्स व निर्देशांकात नफा बुकिंगची शक्यता असल्याने व एफ अँड ओ सेटलमेंट झाल्याची शक्यता असल्याने बाजार घसरणीत अथवा सपाट पातळीवर राहिले आहे.
आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मक सुरूवात झाली आहे. रामनवमीच्या विश्रांतीनंतर आज बाजाराने पुन्हा रिव्हर्स गियर टाकत बाजारात ' जान' आणली आहे. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ३८५.२१ अंकाने वधारला असून ७३३२९.४२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी १३५.७५ अंकाने वधारला असून २२२८३.६५ पातळीवर पोहोचला आहे.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढ झाली आहे. निफ्टी सेन्सेक्सने आज बाजारात परतीचे संकेत दिले असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सेन्सेक्स निर्देशांकात ८९.६४ अंकाने वाढ होत अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७२१०१.६९ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ५० निर्देशांक २१.६५ अंशाने वाढत २१८३९.१० पातळीवर पोहोचला आहे. तीन दिवसानंतरही सेन्सेक्स बँक निर्देशांकात घट कायम असून ४७.५४ अंशाने घट झाली. पर्यायाने सेन्सेक्स निफ्टीची पातळी ५२५९५.६५ पातळीवर पोहोचली.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात निफ्टीत जबरदस्त मायलेज मिळाले आहे. बीएससी निर्देशांक ४०८.८६ पूर्णांकांने (०.५५%) वाढत ७४०८५.९९ पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टी ५० निर्देशांक ११७.७५ अंशाने वाढत २२४७४.०५ पातळीवर पोहोचला आहे.बीएससी बँक निर्देशांकात देखील जबरदस्त वाढ झाली आहे. बँक निर्देशांक ५३२.८५ अंशाने वाढत ५४५६६.७४ पातळीवर पोहोचला तर बँक निफ्टी ३८४.४० अंशाने वाढत ४७९६५.४० पातळीवर पोहोचला आहे.सकाळच्या सत्रात संथ सुरूवात झाल्यानंतर बाजारात घसरण मात्र अखेरच्या सत्रात भरून निघाली आहे.
तीन दिवसातील धुवाधार कामगिरीनंतर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज नकारात्मकता दिसली आहे.परिणामी निफ्टी सेन्सेक्सला ब्रेक लागला असून बीएससी सेन्सेक्स १९५.१६ अंशाने घसरत ७३६७७.१३ पातळीवर पोहोचला व एनएससी निफ्टी निर्देशांकात देखील घट होऊन निफ्टी ४९.३० अंशाने घसरत २२३५६.३० पातळीवर स्थिरावला आहे. सकाळच्या सत्रात देखील निफ्टी सेन्सेक्स खालावून ७३६७७.१३ पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय रुपया कालप्रमाणे थंड राहत अमेरिकन डॉलर तुलनेत ८२.८९ प्रति डॉलर पर्यंत राहिला आहे.
आज शेअर बाजारात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निफ्टी, सेन्सेक्स उसळला आहे. काल विशेष सत्रातील मार्केट वधारल्यानंतर आजच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क इंडायसेस (निर्देशांकात) पुन्हा एकदा भरघोस वाढ झाली आहे. निफ्टी ५० , २७.२० अंशाने वाढत २२४०५.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्समध्ये ६६.१४ अंशाने वाढत ७३८७२.२९ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीतील सेक्टोरल ( क्षेत्रीय) निर्देशांकात देखील चांगली वाढ पहायला मिळाली आहे. बँक निफ्टीत १५८.६० पातळीने (०.३४ %) ने वाढ होत ४७४५६.१० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्स सेवा निर्देश
विविध घडामोडींमुळे काल शेअर बाजारात उसळी पहायला मिळाली होती. त्याच धर्तीवर आजच्या दिवसातील महत्वाचे समभाग (शेअर) कुठले असू शकतात ते जाणून घेऊया..
आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकारात्मक वाढ होत शेअर बाजाराने ' विक्रमी ' नोंद केली आहे. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स १२४५.०५ अंशाने (१.७२ टक्क्याने) वाढत ७३७४५.३५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० ट्रेडिंग सत्राच्या अखेरीस (१.६२ टक्क्याने) ३४४.५० अंशाने वाढत २२३३८.७५ पातळीवर पोहोचला आहे. एकूणच अनेक निर्देशांकात मोठी उसळत पहायला मिळाली आहे. बँक निफ्टी निर्देशांक २.५३ % वाढत म्हणजेच ११६६ अंशाने वाढत ४७२८६.९० पातळीवर पोहोचला आहे. बँकिंग व मेटल या समभागांनी (शेअर) चांगली कामगिरी करत मिडिया, फार्
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज अखेर वाढ झाली असून बाजारातील नुकसानाचा परतावा आयटी, ऑटो कंपन्यांच्या समभागातून झाला. संवेदनशील बाजारात आज मोठी चढ उतार पहायला मिळाली. भारताची जीडीपी दरवाढ संभाव्यता, वैयक्तिक खर्चाचा अहवाल, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिर राहिलेली कंपनी बघता आज बाजारात उसळी पहायला मिळाली आहे. भारतीय रुपयाची आज किंमत डॉलर तुलनेत ८२.९१ रूपये होती.
काल आणि परवा समभागावर निराशा पत्करल्यानंतर आज अखेरच्या सत्रात शेअर बाजार वधारले आहेत. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता आढळली असून मुख्यतः लार्ज कॅप मिड कॅप निर्देशांकात वाढ झाल्याने आज गुंतवणूकीसाठी सुकाळ असल्याचे म्हणता येईल. अखेरच्या सत्रात निफ्टी ५०, हा ७६.३० अंशाने वाढत ७३०९५.२२ पातळीवर पोहोचला असून सेन्सेक्स ३०५.०८ अंशाने वाढत ७३०९५.२२ पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी निर्देशांकात देखील समाधानकारक वाढ होत ११.२५ अंशाने बाजार वाढत (०.०२ टक्क्याने) ४६५८८.०५ पातळीवर येऊन थांबला आहे.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळीही पडझड कायम राहून अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली. आज दिवसभरात अनेक समभागांच्या निर्देशांकात मोठी चढाओढ पहायला मिळाली आहे. काल तज्ञांच्या संमिश्र मतानुसार आज सकाळी बाजारात नकारात्मकता कायम होती. अखेरच्या सत्रात अखेरीस निफ्टी ९०.७० टक्क्याने घसरत २२१२२ पातळीवर पोहोचला आहे व सेन्सेक्स ३५२.६७ अंशाने घसरत ७२७९०.१३ पातळीवर पोहोचला आहे. बीएसी मिडकॅप निर्देशांकात देखील ०.४ टक्क्याने घसरण झाली. सेन्सेक्स साधारण ' जैसे थे' राहिला आहे. सकाळी बँक निफ्टीची घसरण झाली असताना
भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स निफ्टीत वाढ आजही कायम आहे. काल अखेरच्या सत्रात निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे दिसून आले होते. आज सेन्सेक्स सकाळ सत्र सुरू झाल्यानंतर ९९.४४ अंशाने वाढत ७३२५७.६८ पातळीवर पोहोचला होता. निफ्टी १८.३० अंशांने वाढत २२२३५.७५ पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी सकाळी बाजार सुरू झाल्यावर ०.४१ टक्क्याने वाढत ४७११२.१० पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी शेअर बाजार तज्ञांचे भाकीत खरे ठरले आहे. आज सकाळच्या सत्रात भाववाढीच्या नंतरही तज्ज्ञांनी बाजार वरकरणी वधारले असूनही गुंतवणूकदारांनी दक्षता घेण्याची गरज आहे. आज त्याची परिणती होत सेन्सेक्स निफ्टी मध्ये घसरण झाली आहे. बेंचमार्क निर्देशांकात आज घसरण पहायला मिळत आहे.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठा चढ उतार होताना दिसल. कालच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टीत घट पहायला मिळाली होती. सहा दिवसांच्या रॅलीनंतर मार्केट थंडावले होते. परंतु आज अनपेक्षितपणे मार्केट कालची ' री' ओढत पुन्हा ' बियर ' झाले आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीला निफ्टी ५० २६.५० (०.१२%) ने वाढत २२०८१.५५ पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स ५३.४१ (०.०७%) वाढत ७२६७७.५० पातळीवर पोहोचला होता. मात्र १०.५५ ला सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी घट पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स मध्ये सुमारे ४०० अंशान
अखेरच्या सत्रात आज बाजारात मोठे चढ उतार होताना पहायला मिळाली. आज बाजारातील समभागात मोठी हालचाल पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात कालच्या अखेरच्या सत्राप्रमाणे शेअर बाजाराची मंद सुरूवात होऊन सकाळी १०.५५ दरम्यान निफ्टी, सेन्सेक्स कोसळले मात्र आज भारताने अंतराळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्यानंतर अंतराळ कंपन्यांच्या समभागात ( शेअर) मध्ये भरघोस वाढत होत समभागाची किंमत ४ ते ७ टक्क्यांने मूल्य वाढले. विशेषतः एमटीआर टेक्नॉलॉजी, अपोलो मायक्रो सिस्टिम, पारस डिफेन्स, स्पेस टेक्नॉलॉजी अशा विविध स
बेंचमार्क इक्विटी निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ५१.९ अंशाने (०.२३ %) वाढ होऊन २२२४८.८५ पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे बीएसी सेन्सेक्स २१०.०८ अंशाने वाढत ७३२६७.४८ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टीत २६२.२० अंशाने वाढत ४७३६२.४० पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः आजच्या सत्रात लार्जकॅप व मिडकॅप निर्देशांकात वाढ पहायला मिळाली आहे. काल संध्याकाळी चांगल्या निर्देशांकाने निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे पहायला मिळाले होते.
ज सकाळच्या सत्रात निफ्टी सेन्सेक्स निर्देशकांत झेप पहायला मिळाली होती. परंतु अखेरच्या सत्रात (क्लोजिंग बेल) नंतर मात्र सेन्सेक्स ५०० अंशाने कोसळत ७२५०० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० हा २२००० पातळीवर पोहोचला. अखेरीस बीएसी सेन्सेक्स ४३४ पूर्णांकांने घटत ७२६२३.०९ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६७.८९ अंशाने घसरत ५३३७३.४८ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ५० हा १५० अंशाने घटत २३११८.५० पातळीवर पोहोचला आहे.
आजच्या सकाळच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे. सेन्सेक्स १६५.४४ अंशाने वाढत ७२,५४८.७२ पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे निफ्टी ४५.४० अंशाने कमी होत २२०६१ पातळीवर पोहोचला. निफ्टी निर्देशांकात १७ कंपन्यांना फायदा झाला असून ३३ कंपन्यांनी मात्र तोटा सहन करावा लागला आहे. कोटक बँक, पॉवर ग्रीड, अपोलो हॉस्पिटल, युपीएल, डॉ रेड्डीज या शेअर्सच्या भावात तेजी पहायला मिळाली दुसरीकडे आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एम अँड एम, एचडीएफसी लाईफ या शेअर्स (समभागात) घट पहायला मिळत आहे.
आज कालच्या सुट्टीअखेरीस बेंचमार्क निर्देशांकात अखेर वाढ झाली असून युएस उत्पादनातील किंमती वाढल्याचा फायदा आज भारतीय बाजारात जाणवत आहे. सकाळच्या सत्रात बीएसी सेन्सेक्स ५२ अंशाने वाढून ७२४७८ पातळीवर, एनएससी सेन्सेक्स ४३ अंशाने वाढत २२०८२ पातळीवर पोहोचला आहे. एनटीपीसी, एसबीआय, नेसले, बजाज फायनान्स यां कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरभराट पहायला मिळाली. मात्र दुसरीकडे विप्रो, टीसीएस या समभागात ( शेअर्स) मध्ये थोडी पडझड पहायला मिळाली आहे. निफ्टीवर बजाज ऑटो डॉ रेड्डीज, अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्ट, कोल इंडिया या समभा
आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी ' बूम' पहायला मिळाली होती. एनएससीने २२००० ची पातळी ओलांडून सेन्सेक्सनेही चमकदार प्रदर्शन केले होते. अखेरच्या सत्रात बाजार बंद होताना ती जादू कायम राहत सेन्सेक्सने उसळी मारत ७२७०८ चा टप्पा गाठला असून निफ्टी आपला विक्रम प्रस्थापित करत २२१८७ पातळीवर बंद झाला आहे.
काल अखेरच्या सत्रात अनेक प्रमुख कंपन्यांच्या समभागात (शेअर्समध्ये) तेजी पहायला मिळाली आहे. काल बँक निफ्टी बरोबरच गिफ्ट निफ्टीदेखील तेजीत राहिला होता. निश्चितच सेन्सेक्स निफ्टीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे असताना आज सकाळचे सत्र सुरू झाल्यानंतर आज सेन्सेक्स ३५० अंशाने वाढला असून निफ्टी पातळीत २२००० चा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही खूप मोठी वाढ समजली जाते. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात त्यामुळे मोठी वाढ पहायला मिळत आहे.
शुक्रवारी अखेरच्या सत्रात बेंचमार्क इंडायसेस एनएससी निफ्टी व बीएसी सेन्सेक्समध्ये गोड शेवट पहायला मिळत आहे. निफ्टीची पातळी १३० अंशाने (०.५९ %) वाढत २२०४० पातळीवर पोहोचली आहे. सेन्सेक्स ३७६ अंशाने (०.५२%) ने वाढत ७२४२६.६४ पातळीवर पोहोचला आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल या आशेचा दृष्टीकोन आज बाजारात पहायला मिळाला. निफ्टी ५० २२०४०.७० पातळीवर गेला असून सेन्सेक्स ३७६ अंशाने वाढत ७२४२६.६४ पातळीवर बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे सकाळच्या सत्रात आशियाई गुंतवणूकीची आशा व प्रगती यामुळे आज प्रमुख स्टॉकचे भाव
आज बेंचमार्क इंडायसेस बीएसी सेन्सेक्स व एनएससीवर थोडी वाढ झाली असून आज मार्केट थोड्या प्रमाणात सकारात्मक दिसले. गिफ्ट निफ्टी ०.३७ टक्क्यांवर जात २१९९७ पर्यंत पोहोचले आहे. भारतीय रुपयात ३ पैशाची वाढ झाली असल्याचे मार्केट सेंटिमेंट सकारात्मक दिसली. आज सुपीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांचा खंडपीठाने राजकीय पक्षांच्या इलेक्ट्रोल बाँड स्कीम वर निकाल देत त्याला ' असंवैधानिक घोषित केले आहे. एसबीआयला देखील राजकीय करता बाँड वाटपास सरकारने मनाई केली आहे.
आज अखेरच्या सत्रानंतर बेंचमार्क निर्देशांक सकाळच्या सत्राप्रमाणे तेजीत राहिला. शेवटच्या सत्राच्या अखेरीस आज निफ्टी २१९०० पार झाला असून सेन्सेक्स २२७.५५ अंशाने (०.३२%) वाढत ,७२०५०.३८ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ७०.८० अंशाने (०.३२) वाढत २१९१०.८० पातळीवर पोहोचला आहे. आज एम अँड एम, बीपीसीएल,ओएनजीसी,एनटीपीसी हे शेअर्स तेजीत पहायला मिळाले असून नेसले इंडिया, आयटीसी, एक्सिस बँक या शेअर्सच्या भावात घट झाली आहे.
काल क्लोजिंग बेलनंतर निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० पूर्णांकांने व निफ्टी १५० पूर्णांकांने घसरला आहे. बीएससी मिड कॅप स्मॉल कॅप देखील ०.७ ते १ टक्क्याने घसरल्याचे पाहिला मिळाले. विशेषतः आयशर मोटर्स, विप्रो, इन्फोसिस एलटीआय माईंड ट्री, इंडसइंड बँकचे शेअर घसरल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. बँक निफ्टी कालच्या पेक्षा घट होत १.७ टक्क्याने घसरत ४४९३८.६० वर पोहोचला आहे . निफ्टी ५० वर बजाज ऑटो आयशर मोटर्स अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया या शेअर्सला तेजी पहायला म
ज अखेर क्लोजिंग बेलनंतर मात्र मार्केट पुन्हा सावरले आहे. अखेरच्या सत्रानंतर इक्विटी इंडायसेस सकारात्मक झाले आहेत. बीएससी सेन्सेक्स २७७.९८ पूर्णांकांने वाढत ७१८३३.१७ वर पोहोचला आहे. निफ्टी ५० हा ९६.,८० पूर्णांकांने वाढत २८४०.०५ वर पोहोचला आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० पूर्णांकांने व निफ्टी १५० पूर्णांकांने घसरला होता.
आज क्लोजिंग बेलनंतर सेन्सेक्स निफ्टी ट्रेडिंगमध्ये चढे निर्देशांक अखेर दिसले. इंडियन इक्विटी मार्केट आज एकूणच सकारात्मक दिसले आहे. युएस महागाई दरातील घोषणेचा आज भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम जाणवला. सेन्सेक्स ७१४०० वर गेला असन ४०० पूर्णांकांने वाढला आहे. निफ्टी २१७०० पार झाला आहे. ३.४३ अखेरीस सेन्सेक्स ४८३ पूर्णांकांने बंद झाला आहे. एकूण सेन्सेक्स मध्ये ०.६८ टक्क्याने व निफ्टी ०.५९ टक्क्याने वाढला आहे.
आज सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजारात उतरती कळा पहायला मिळाली. पब्लिक सेक्टर युनिट, तेल कंपन्यांच्या भाग भांडवलात घट झालेली पहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पीएसयु शेअरचा विक्रीमुळे बाजार लाल सिग्नल दाखवत असल्याची एकंदर चर्चा चालू आहे. याशिवाय रिअल इस्टेट शेअर्स, मिडिया, धातू शेअर्स मध्येही घसरण पहायला मिळत आहे. सुरूवातीच्या सत्रात बेंचमार्क इंडेक्स कमी झाल्याने बीएससी १५० पूर्णांकांने कोसळून ७१४४२ वर व एनएससी निफ्टी ५३ पूर्णांकांने घसरून २१७२५ वर आले आहे.
देशातील प्रमुख शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल बुधवारी दि.२९ नोव्हेंबर रोजी प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सच्या पातळीवर पोहोचले. बीएसई सेन्सेक्स बुधवारी ३०५.४४ अंकांनी वाढून ६६.४७९.६४ अंकांवर पोहोचला.
आज शेअर मार्केटमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहिला मिळाले. इक्विटी इंडायसेसमध्ये सकारात्मक झोनमध्ये दिसले आहे. क्लोजिंग बेलनंतर द निफ्टी ५० इंडेक्स १८१.१५ टक्यांने वाढून १९४११.७५ पूर्णांक झाला होता. बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ५९४.९१ गुणांनी वाढत ६४९५८.६९ पर्यंत गेले आहे. बँक निफ्टी इंडेक्स ३०१.१५ गुणांनी ४३६१९ पर्यंत गेला आहे.
निफ्टी ६० अंकाने व निफ्टी २३० अंकाने ढासळले.
बीएसी ३० सेन्सेक्समध्ये ६३४. ६५ अंकाने वाढ होत सेन्सेक्स ६३,७३२.८० गुणांपर्यंत वाढला. दुसरीकडे निफ्टीमध्ये २०२.४५ अंकाने वाढ होत १९०५९.७० गुणांपर्यंत वाढले आहे. विशेषतः ऑटो, फायनान्शिअल, एनर्जी शेअर्स मध्ये रिकवरी पहायला मिळाली.
सलग सहाव्या सत्रात गुंतवणूकदारांना जोर का झटका लागला असून मोठे नुकसान भागभांडवलदारकांना सहन करावे लागले. सेन्सेक्स निफ्टी ५० हे प्रत्येकी ५ टक्यांने कोसळले आहे. आज गुरुवारी गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक कारणांनी ही उतरंडी दिसत आहे.वाढलेले व्याजदर, महागाई, इस्त्रायल हमास युदध अशा अनेक कारणांनी याचा शेअर बाजारावर प्रभाव दिसला आहे. निफ्टी ५०२५६ गुणांनी कोसळून १८८५७.२५ वर स्थिरावले असून सेन्सेक्स ९०१ गुणांनी घसरत ६३,१४८.१५ वर थांबले आहे. बीएसी मिड कॅप व स्मॉल कॅपलाही नुक
घरगुती निर्देशांक शेवटच्या ट्रेडिंग सत्रात कोसळले आहेत. निफ्टी ५० इंडेक्स मध्ये तब्बल ८२.५ पूर्णांकाने कमी होत १९५४२ पर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे सेन्सेक्स इंडेक्स २३१.६२ पूर्णांकांने खाली येऊन ६५३९७.६२ पर्यंत आला आहे.
आजही निफ्टी इंडेक्स ०.४२ कोसळून १९५४२ पर्यंत खाली आला. सेन्सेक्स २३१.६ टक्यांनी कमी होऊन ६५३९७.६ पर्यंत खाली आला. मध्य पूर्वेकडील दबावाच्या वातावरणाचा परिणाम आजही मार्केटवर कायम राहिला. विशेषतः क्रुड तेलाच्या किंमतीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे महागाई वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. इक्विटी सेशन मध्ये रेड सिग्नल कायम राहत मंदीचे वातावरण कायम राहिले.
क्लोजिंग बेलनंतर आज पुनरावृत्ती होत सलग दुसऱ्या वेळी निफ्टी १९६५० च्या खाली आला आहे. सेन्सेक्स २४७.७८ गुणांनी घसरत ६५६२९ पर्यंत आले आहे. निफ्टी ४६ गुणांनी कोसळून १९६२४ पर्यंत आला आहे. इस्त्रायल हमास युद्धाच्या घटनेचा प्रभाव आजही मार्केटवर राहिला. बँक निफ्टी ५२१ गुणांनी घसरत ४३८८९ गुणांवर आला आहे.
जीओपोलिटीकल तणाव असतानाचा प्रभाव आज शेअर बाजारात पण जाणवला आहे. इस्त्रायल हमास युद्धाच्या काळात होत असलेली हानी पाहता यांचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. इंधन, एनर्जी, व्यापारी आयात निर्यात यामध्ये परिणाम होऊन डॉलर रूपया सेंटलमेंट मध्ये देखील त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. आज क्लोजिंग बेलनंतर एनएससी १९ गुणांनी घसरत १९७३१.७५ वर आला आहे. बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ११६ गुणांनी घटत ६६१६६.९३ वर येऊन ठेपला आहे.
काही काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शेअर बाजारात आज दिवसा अखेर अप ट्रेंड सुरू झाला आहे. आज क्लोजिंग बेलनंतर सेन्सेक्स इंडेक्स ५६७ पूर्णांकांने वाढून ६६०७९ व निफ्टी १८० पूर्णांकांने वाढून १९६९३ ला थांबला आहे. इस्त्रायल व हमासच्या पार्श्वभूमीवर काल मार्केट मध्ये नकारात्मक दिशा दिसली असताना देखील आज तेजी दिसली.
पॅलेस्टाईन व इस्त्रायली देशात हिंसाचार झाल्याने जगात तंगीचे वातावरण दिसले. हमासने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यामुळे अनेक इस्त्रायली नागरिक ठार व जखमी झाले. त्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलने युद्ध जाहीर केले आहे. अर्थविश्वात या विषयावर विविध मान्यवरांनी आपले मत मांडले आहे. या घटनेनंतर विशेषतः क्रूड इंधन दरात भाववाढीची चिंता आता व्यक्त होऊ लागली असतानाच त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला.
आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आरबीआयचे आर्थिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सलग चौथ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवल्याने उद्योगधंद्यांसाठी अनुकूलता असल्याची चर्चा उद्योग वर्तृळात रंगली आहे. रेपो रेट ६.५ टक्के स्थिर ठेवल्याने आर्थिक वर्ष २३ मधील जून तिमाहीत विकासदर ६.५ टक्यांने राहण्याची शक्यता देखील आरबीआयने वर्तवली आहे . विशेषतः महागाई दबावातही भारताने आपली अर्थव्यवस्था बळकट केल्याचे दिसून आले. भाज्या, क्रुड, इंधन दरवाढीने जागति
आज मार्केट मध्ये क्लोजिंग बेलनंतर निफ्टी इंडेक्स १०९ पूर्णांकांने बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ३१६ पूर्णांकांने खाली येऊन निफ्टी १९५२८ ने सेन्सेक्स ६५५१२ पर्यंत आला आहे. अनिल अग्रवाल यांच्या विधानानंतर वेदांताचे शेअर इंट्रा डे मध्ये ४ टक्यांने वाढून २३१.७० रुपये प्रति शेअर पर्यंत पोहोचला. बँक निफ्टी मध्ये आज घसरण पाहायला मिळाली. २२० पूर्णांकांने कमी होऊन आयडीएफसी आयसीआयसीआय बँकेच्या शेअर मध्ये अनुक्रमे १.८३ , १.०९ टक्यांने पडले.
आज शेअर बाजारात फारशी तेजी आणि पडझडही पहायला मिळाली नाही. निफ्टी ५० इंडेक्स ०.३ पूर्णांकांने वाढून १९६७४.५५ ला क्लोजिंग बेलनंतर थांबला. BSE सेन्सेक्स १४.५४ पूर्णांकांने वधारला असून क्लोजिंग बेलनंतर ६६०२३.६९ वर थांबला आहे. काही दिवस मंदीच्या पार्श्वभूमीवर फेडरल बँकेचे व्याजदर व आर्थिक व्यवस्थेतील महागाई नियंत्रणासाठी अमेरिकन फेडरल बँकचे पाऊल या कारणांमुळे मार्केट मध्ये फार उलाढाल दिसली नाही.