ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
Read More
Senior Citizen Scheme राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. त्यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. मागील भागात आपण काही करातील वजावटीच्या दृष्टीने तरतुदींचा आढावा घेतला. आजच्या भागातही करबचत करणार्या अशाच काही महत्त्वपूर्ण योजनांविषयी...
ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक आधार असणारी विरंगुळा केंद्रे, सवलतीत एनएमएमटी बस सुविधा, आरोग्य सेवा अशा विविध बाबीनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी ज्येष्ठांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम राबवित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असते. अशाच प्रकारे या वर्षीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जल्लोषात साजरा झाला.
सोन्यातील गुंतवणूक ही पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष सोनेखरेदीपुरती मर्यादित न राहता, हल्ली त्याचे बरेच डिजिटल पर्याय उपलब्ध होतात. त्याचीही माहिती नागरिकांनी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांत ज्येष्ठ नागरिकांची गुंतवणूकदेखील वाढली आहे. याचे कारण म्हणजे या योजनांतील गुंतवणुकीवर आता चांगला परतावा मिळत आहे व या गुंतकवणुकीत जोखीम नाही.
‘ऑमिक्रॉन’मुळे जर २०२१-२०२२ या वर्षासाठीची प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली, तर मुद्दा वेगळा, पण जर नाही वाढविली, तर निवडलेल्या पर्यायात ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक करावीच लागेल. पण, अगदी मार्चपर्यंत, अकराव्या तासापर्यंत थांबू नये. कारण, घाईघाईने निवडलेल्या गुंतवणुकीचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो. मार्चमध्ये एकदम मोठी रक्कम उभारणे अशक्यही होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपासूनच योग्य नियोजन करुन, योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. म्हणूनच आजच्या लेखात गुंतवणूकदारांसाठी अशाच दहा पर्यायांची विस्तृत माहिती जाणून घेऊया...
मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी 'सिनियर सिटीझन' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
या योजनेत 8.30 टक्के दराने व्याज मिळत असून व्याजाची रक्कम 50 हजार रुपयांहून जास्त झाल्यास आयकरपात्र होणार. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांत ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त होण्यापूर्वी, सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद म्हणून गुंतवणूक करता येते.
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन! त्यानिमित्ताने घराघरातील आजीआजोबांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...