मुंबईत समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत वाढलेल्या आणि सागरी संशोधक म्हणून कार्यरत प्राची हटकर यांच्याविषयी...
Read More
महाराष्ट्राच्या वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने टॅग केलेल्या 'प्रथमा' या मादी कासवाचे महाराष्ट्राजवळ पुनरागमन होत आहे. ती आधी गुजरात किनारपट्टीजवळ जात असल्याचे समोर आले होते. तर कासवे दक्षिणेकडे सरकली आहेत.
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव ( sea turtle ) विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिली दोन घरटी रायगड जिल्ह्यातील आरवी आणि दिवेआगर किनाऱ्यावर सापडली आहेत. आरवी किनाऱ्यावर प्रथमच कासवाचे (sea turtle) घरटे आढळून आल्याने वन विभागाच्या कासव विणीच्या किनाऱ्यांच्या यादीत नसणाऱ्या किनाऱ्यांवर देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकण किनारपट्टीवर सापडलेल्या समुद्री कासवांची घरट्यांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा एकूण 451 घरटी कासवमित्रांनी संवर्धित केली आहेत. सध्या या घरट्यांमधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचे काम सुरू असून कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या ’सागरी कासव संवर्धन’ मोहिमेमुळे घरट्यांची संख्या वाढल्याची शक्यता आहे.
जुहू किनाऱ्यावर सोमवारी पहाटे मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन सागरी कासवांना स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी जीवदान दिले.