सिनेविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं नुकतंच निधन झालं आहे. रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले आहे. प्रेम सागर हे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी होते. ते उत्तम दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर होते.
Read More
रामायण - महाभारताचे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत दिवंगत दाजी पणशीकर यांच्या शब्दसुमनांचा जागर ठाण्याच्या सहयोग मंदिरात पार पडला.
आपण या लेखमालेमध्ये वेगवेगळी मंदिरे समजून घेतो आहोत. या मंदिरांमध्ये असणारी शिल्पं हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. याच शिल्पांना न्याय देण्यासाठी, आपण आज या लेखात फोटोस्टोरी बघणार आहोत. रामायण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मागच्या हजारो वर्षांपासून आपण वेगवेगळ्या स्वरूपात रामकथा ऐकत आहोत. आतापण या कथेवर आधारित अनेक चित्रपट, सिरीज निघाल्या पण, कथेचा गाभा मात्र तोच राहिला. असेच एक ताकदीचे माध्यम म्हणजे शिल्प. या कलाकारांनी दगडांच्या माध्यमातून, मंदिरांवर रामायणातले वेगवेगळे प्रसंग साकारले आहेत. वेगवेग
या लेखमालेच्या निमित्ताने दर आठवड्याला अनेक वाचक आवर्जून फोन करतात, मेसेज करतात, आपली मतं, मंदिरांमध्ये आवडलेल्या गोष्टी, त्यांना आलेले अनुभव, असे सगळे काही माझ्यासमोर मांडतात. त्याचबरोबर त्यांना अजून कुठल्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायला आवडेल? हेदेखील हक्काने सांगतात. मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचकांनी कंबोडिया देशातल्या ‘अंगकोर वाट’ या मंदिराबद्दल आम्हाला वाचायला आवडेल, असे सांगितले. या वाचक मंडळींच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी आजचा लेखनप्रपंच.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट’ असा उल्लेख मिळवणाऱ्या या महाकाव्यावर निर्मात्यांनी अफाट खर्च केला असून, त्यामुळेच हा चित्रपट ‘हिट’ ठरवण्यासाठीही त्याला तितक्याच मोठ्या संख्येने कमाई करावी लागणार आहे.
रामायणात, रामाने सामान्य लोकांना एक ध्येय दिले आणि रावणाची शक्ती नष्ट केली. आपल्या सर्वांना दिशा देण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. समाजात अनेक चुकीच्या कथा निर्माण झाल्या आहेत ज्या खूप खोलवर रुजल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची जबाबदारी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांनी केले.
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या हेच जीवनकार्य जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठ
रामानंद सागर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली 'रामायण' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही अढळ स्थान मिळवून आहे. या मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण या भूमिकांमुळे संबंधित कलाकार घराघरांत पोहोचले. अरुण गोविल यांनी रामाची, तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. या जोडीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून आजही त्यांचं तितकंच प्रेम मिळतं.
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Sri Lanka Ramayana हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पव
Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू
Ram Navami 2025 तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Ramnavami 2025 रामायणाचे खोतानी स्वरुपखोतान राज्याच्या भूमीत, भारतीय परंपरेतील रामायण एका वेगळ्या रूपात साकारलेले आजही पाहायला मिळते. भाषा वेगळी, परंपरांची वळणं वेगळी, पण कथा तीच; धर्म, सत्य आणि आदर्शाचं तेज जपणारी! वेळ बदलली, ठिकाण बदलले, पण ही कथा आजही लोकांच्या मनांत त्याच श्रद्धेने घर करून आहे. खोतानी रामायण वाचताना, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवल्याचा भास आपल्याला होतो, जिथे परंपरा आणि श्रद्धांच्या अतूट धाग्यांनी विणलेली ही रामायणाची नक्षी नव्या अर्थांनी समोर येते.
Japanese Ramayana रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
आग्नेय आशियाई देशांपैकी रामायणाच्या सर्वाधिक पाऊलखुणा आजही कुठे दृष्टिपथास पडत असतील, तर तो देश म्हणजे थायलंड. तेथील राजांच्या नावापासून ते अगदी मंदिरे, शिल्पकला आणि एकूणच समाजजीवनात रामकथेचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथच ‘रामाकियन रामायण.’ असे हे थायलंडचे रामायणाशी असलेले ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
Torve Ramayana दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यातील ‘कन्नड’ ही एक सशक्त व समृद्ध भाषा. या भाषेतील वचनसाहित्याचा ठेवा कन्नड भाषेचे वैभव आहे. महात्मा बसवेश्वर, योगिनी अक्कमहादेवी, संत पुरंदास आदी संतांचे कन्नड साहित्यात विशेष योगदान आहे. कर्नाटकमध्ये शैव आणि वैष्णव, अशा दोन्ही भक्तिधारा पूर्वीपासून विद्यमान आहेत. वनवास काळात किष्किंधा अरण्यातील वानराज वाली-सुग्रीव यांच्या राज्यात श्रीरामाचे वास्तव्य होते. किष्किंधा विद्यमान कर्नाटक राज्यातील हम्पी परिसरात आहे. अशा प्रकारे कर्नाटकची भूमी श्रीराम-लक्ष्मणांच्या च
Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
Jagmohan Ramayana निसर्ग व संस्कृती संपन्न ओडिशा (उत्कल) राज्यातील महाकवी बलरामदास यांनी पुरीच्या मंदिरात, भगवान जगन्नाथासमोर बसून लिहिलेले रामायण म्हणजे ‘जगमोहन रामायण.’ या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणूनही ओळखले जाते. हे रामायण उडिया भाषेतील आदि महाकाव्य असून, ते गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ आधीच्या काळातील आहे. स्वतःला ‘मत्त कृपासिद्ध बलराम’ म्हणवून घेणारा हा कवी उडियाचा ‘राष्ट्रकवी’ आहे. हे रामायण 1 लाख, 90 हजार ओव्यां(दंडी)चे आहे. त्याविषयी...
बंगाली भाषेतील पहिली कवयित्री म्हणून चंद्रावतीला मान दिला जातो. वंगभूमीमध्ये मध्ययुगात इ. स. १५५० ते १६०० असा तिचा काळ मानला जातो. चंद्रावती ही बन्सीधर भट्टाचार्य या मनसादेवी उपासकाची कन्या, कवित्वाची नैसर्गिक देणगी लाभलेली. तिने अनेक गीतातून रामसीतेची कथा गायलेली आहे. या गीतसंग्रहालाच ‘चंद्रावतीचे रामायण’ ( Chandravatis maukhik ramayan ) म्हणून ओळखले जाते. हे रामायण नसून खर्या अर्थाने ‘सीतायन’ आहे. हे रामायण सीताप्रधान आहे. ते लिखित नसून मौखिक आहे. ही गीते आधी सर्वत्र मौखिक रूपाने लोकप्रिय झाली आणि नंतरच्
लखनौ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला महाकुंभ मेळा ( Maha Kumbh Mela ) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठचे खासदार अरुण गोविल यांनी महाकुंभ मेळ्यात पत्नीसोबत हजेरी लावत त्रिवेणी संगमात डुबकी घेतली. त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच पंडित धीरेंद्र शास्त्री यांचीही भेट घेतली. मां गंगा, मां यमुना आणि मां सरस्वती सर्वांचे कल्याण करो, असे म्हणत अरुण यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरातील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वार्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या संस्मरणीय अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने अयोध्येसह देशभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुंबईतील लोअर परळ फिनिक्स मॉल येथे ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ ( 'Ramayana: The Legend of Prince Rama' ) या अॅनिमेशनपटाच्या विशेष चित्रीकरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानिमित्ताने
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवरील नाटकं सुरू आहेत. सगळ्याच प्रकारच्या नाटकांना विशेष पसंती मिळत आहे. अशातच एक वेगळा विषय घेऊन 'सुमुख चित्र' निर्मित व 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. उर्मिला...वाल्मीकींच्या रामायणातली एक उपेक्षित व्यक्तिरेखा. रामायणातील राम, सीता आणि रावण या तीन व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत उर्मिला ही व्यक्तिरेखा काहीशी अबोलच राहिली. या व्यक्तिरेखेला बोलतं करणार आणि उर्मिल
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट गेल्या अनेक काळापासून प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री राम यांची तर साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याबद्दल विविध माहिती समोर येत असताना लक्ष्मणच्या भूमिकेत अभिनेता रवी दुबे दिसणार असे म्हटले जात होते. आता, स्वत: रवी याने याबद्दल खुलासा केला आहे.
(Srilankan airlines) रामकथेच्या माध्यमातून ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ केवळ पर्यटकांना आकर्षित करणार नाही, तर भारतीयांच्या मनावरही खोल प्रभाव टाकत आहे. अवघ्या पाच मिनिटांत रामायण ही कथा नसून भारतीय आणि श्रीलंकेच्या इतिहासाचा एक अस्सल दस्तऐवज आहे, ज्याने श्रीलंकेच्या मोहक प्रवासाला प्रेरणा दिली, यावर संपूर्ण जगाचा विश्वास बसला आहे.
आपल्या महाराष्ट्राचे भाग्य एवढे थोर की, आपणास ‘संत, पंत आणि तंत’ असे तीन प्रकारचे कवी लाभलेले. संतकवी, पंडितकवी आणि शाहीर कवी अशा तीन परंपरांपैकी पंडितकवींच्या परंपरेतील कवी मुक्तेश्वर हा सर्वात लोकप्रिय प्रतिभासंपन्न व कलाचतुर असा कवी होता. तो संत एकनाथांचा नातू होता. त्यांचे मराठी व संस्कृत भाषांतर प्रचंड प्रभुत्व होते. तो मराठी भाषाभिमानी म्हणून प्रसिद्ध होता. मुक्तेश्वरांचा एक भारत काव्य पर्वाचा ‘मराठी साहित्यातील कोहिनूर’ गौरव केला जातो. इतिहासाचार्य राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर सह अनेक थोर मोठ्यां
दिवाळीच्या निमित्ताने अनेक नव्या चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. अशात प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित 'जय हनुमान' चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला असून तो हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या या लूकला चाहत्यांची विशेष पसंती मिळता आहे. 'जय हनुमान' चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस मिथ्री ऑफिशियलने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे एक अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये ऋषभ शेट्टी भगवे कपडे परिधान करून रामाची मूर्ती छातीजवळ
दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.
दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट केजीएफचा अभिनेता यश रामायण चित्रपटात झळकणार आहे. गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चित्रपटाची टीम किंवा कोणत्याही कलाकाराकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. आता स्वत: यश याने रामायण चित्रपटात तो रावणाची भूमिता साकारणार असल्याचे जाहिर केले आहे.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांना पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत. यात ‘रेहना है तेरे दिल मै’, ‘रॉकस्टार’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश असून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा चित्रपटही या यादीत येतो. दरम्यान, लवकरच लोकप्रिय ‘रामायण’ हा अॅनिमेशनपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत अशी एकही व्यक्ती क्वचित असेल ज्यांनी हे अॅनिमेटेड रामायण पाहिले नसेल.
संत एकनाथ हे रामाचे बालभक्त होते. संत एकनाथांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यामध्ये ‘भावार्थ रामायण’ हा 40 हजार ओव्यांचा मोठा ग्रंथ आहे. पराक्रमी योद्धा श्रीरामाचे वीररसयुक्त दर्शन या ग्रंथातून घडते. मराठी भाषेतील हे पहिले रामायण लिहिण्याचा मान या संत एकनाथांना असून त्यांचा राम हा ‘नित्यविजयी रघुनंदन’ आहे. सलग दोन लेखांत आपण या रघुवीराचे दर्शन घेणार आहोत.
अभिनेते अजिंक्य रमेश देव यांना ३ मे रोजी सगळ्यांनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण तुम्हाला माहित आहे का नेमकी त्यांचा वाढदिवस कधी असतो? तर स्वत: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी त्यांच्या वाढदिवसाची गंमत ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये सांगितली. अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचा एक शब्द मुलाखत देताना इकडचा तिकडे झाला आणि अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांचा वाढदिवस ३ मे रोजी आहे असं सगळीकडे पसरलं. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात...
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि साई पल्लवी दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचा लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून त्याचं कनेक्शन थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरुन अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. अतिशय प्रभावीपणे या भूमिका सांभाळताना (Sai Pallavi) दिसत असून त्यांचा हा लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
नुकताच रामनवमीच्या निमित्ताने रामनामाच्या उत्सवात संपूर्ण देश न्हाऊन निघाला. रामकथा ही सर्वार्थाने आदर्श. रामायणातील अशाच अनेक आदर्शांचे, संस्कारांचे प्रतिबिंब भारताच्या एकूणच राज्यकारभारात आणि परराष्ट्र धोरणातही उमटलेले दिसते. त्याचाच घेतलेला हा आढावा...
भारतीयांचा श्वास असणार्या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
भारताची वैज्ञानिक प्रगती हा भारतात तसेच जगातदेखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांना रामायण आणि महाभारत हा इतिहास तर काहींना तो फक्त एक साहित्याचा प्रकार वाटतो. पण, या मंथनातून कायमच सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. पण, वाल्मिकी महर्षी यांनी लिहिलेले रामायण हा आपला प्राचीन इतिहास आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण रामायणात विविध घटना घडताना दिसतात. त्याचा सखोल अभ्यास केला असता, त्या काळात भारताची प्रत्येक क्षेत्रात असलेली प्रगती पाहून मन थक्क होते. रामायणातील अनेक प्रसंगांत आपल्याला रामकथेबरोबरच अनेक वै
रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रा
आयुर्वेदाची उत्पत्ती ही अथर्ववेदापासून झाली असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे देखील म्हटले आहे. थोडक्यात अनादी काळापासून आयर्वेुदाची परंपरा ही सार्वत्रिक सुरू असल्याचे विविध संदर्भ, आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये दिसतात. रामायणदेखील त्याला अपवाद नव्हे. या लेखात जाणून घेऊया रामायणात दिसणार्या आयुर्वेदाशी निगडीत घटनांबद्दल..!
महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृतीच्या प्रेमातून-स्वाभिमानातून प्रसवलेले श्लोकबद्ध महाकाव्य म्हणजे डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’ होय. रामाला पिता, सीतेला माता आणि हनुमानाला महाराष्ट्राचा निर्माता मानणार्या डॉ. साधलेंचे हे रामायण भक्ती-प्रासादिकतेऐवजी शृंगार, करुण आणि वीर रसाला प्राधान्य देणारे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना या काव्यास लाभली असून शृंगाराच्या अतिरेकाचा त्यांनी स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. आधुनिक पाश्चात्य ऐहिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे रामायण काव्य-कल्पन
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘रामायण’ (Ramayana) हा चित्रपट एक नव्हे तर तब्बल तीन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
भारतीय वाङ्मयामध्ये वाल्मिकी ऋषींना ‘आदिकवी, महाकवी’ म्हणून अग्रपूजेचा मान असून, ‘वाल्मिकी रामायण’ काव्याचा ‘आदिकाव्य ग्रंथ’ म्हणून गौरव केला जातो. वाल्मिकी ऋषी कोण होते? अनेक जण त्यांना लुटारू-वाटमार्या मानतात. पण, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी स्वतःबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. रामायणात एके ठिकाणी स्वतःचा परिचय देताना, ‘मी प्रचेतस मुनींचा दहावा पुत्र आहे’ असे ते म्हणतात. ‘रामायण’ मूळातून वाचल्यावर, आपणास वाल्मिकी ऋषींची खरी ओळख होते. ते विद्वान पंडित व कांंतदर्शी थोर कवी होेते. महान तपस्वी होते. त्यांच्
काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
कर्नाटकातील मंगळुरू येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेत जाणाऱ्या हिंदू मुलांवर सर्व प्रकारची बंधने लादण्यात आली होती. असा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच, एका शिक्षकाने पंतप्रधान मोदींविरोधातील अपप्रचाराच्या गोष्टी सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. या शिक्षकाने विपर्यास करून 'गोध्रा घटना' आणि 'बिल्कीस बानो प्रकरण' यासारखे संवेदनशील मुद्दे मुलांसमोर मांडले, त्यामुळे मुलांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात द्वेष भरला.