कोकण किनारपट्टीवर konkan sea turtle सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'प्रथमा' नामक मादी कासवाने गेल्या दोन महिन्यांमध्ये २५० किमी अंतर कापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही मादी गुजरातच्या सागरी परिक्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवांना 'सॅटलाईट टॅग' करण्यात आले असून कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा सागरी प्रवास सुरू आहे. konkan sea turtle
Read More
गेल्या महिन्यात वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थानअंतर्गत (डब्लूआयआय) आंजर्ले किनाऱ्यावर ( konkan sea turtle ) सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'सावनी' नामक मादी कासवाने पुन्हा एकदा विण केली आहे. शुक्रवारी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर 'सावनी' अंडी घालताना आढळून आली. भारताच्या किनाऱ्यापट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा विण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा आहे. ( konkan sea turtle )
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर मंगळवारी (१५ फेब्रुवारी) सागरी कासवाला सॅटलाईट ट्रान्समीटर लावून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. मॅंग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विशेष अभ्यास प्रकल्पाअंतर्गत सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेले हे तिसरे कासव आहे. येत्या काही दिवसांमध्ये अजून दोन कासवांना ट्रान्समीटर लावण्याचा मानस आहे. ( konkan sea turtle )
कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना (Konkan Sea Turtle) 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. या अभ्यासाकरिता २५ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.