मानवजातीच्या उद्धारासाठी अवतरलेल्या वर्तमानयुगात भगवान श्रीरामकृष्ण यांची दिव्यलीला परिपूर्ण करण्याकरिता साक्षात ब्रह्मशक्ती श्रीसारदादेवींच्या रूपात त्यांची सहधर्मचारिणी म्हणून भूतलावर प्रकट झाली. जडवादाच्या - भोगवादाच्या - घोर अंधकारात मग्न अशा वर्तमान जगासमोर दिव्य मातृभावाचा परमपावन असा आदर्श श्रीसारदादेवींनी प्रस्थापित केला. श्रीसारदादेवींचे हे दिव्य मातृत्व आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श संन्यासिनी, आदर्श गुरू इत्यादी अनेकविध रूपांतून प्रकट झाले होते.
Read More