Trinamool Congress प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी यांच्या लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कट्टरपंथी नेत्याने सरस्वतीचे पूजन करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मोहम्मद शब्बीर अली हे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करत खून करेन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read More
शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. ( Saraswati Chhatra Sena ) त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...
Geography of India म्हणजे काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या भाषेत एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखती दरम्यान सुनावले आहे. भारतात राहणाऱ्या कट्टरपंथींनी पाकिस्तानात स्थलांतरण करून वास्तव्य करावे. या कट्टरपंथी मुस्लिमांच्या मागणीमुळेच भारत देशाची फाळणी झाली असल्याचे भाष्य त्यांनी एका मुलाखती दरम्यान केले होते.
ठाणे : आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर ( Daji Panshikar ) यांनी व्यक्त केले. दाजी पणशीकर लिखित 'गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार' या मॅजेस्टिक प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस आणि तारांकित संस्था यांच्या वतीने शनिवारी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात पणशीकर यांनी ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी’ या विषयावर व्याख्यान दिले.
आजमगड : अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी संभल, बांगलादेशसह धर्माच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. यासोबतच "बांगलादेशातील हिंदूंसाठी ( Hindu ) वेगळा देश तयार करण्यात यावा," असेही ते म्हणाले. "अशा वेळी प्रत्येक भारतीय त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येईल." बुधवारी ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वाचा कोणी अपमान करत असेल तरी उद्धव ठाकरे त्यावर कधी व्यक्त होत नाहीत. अर्थात या भूमिकेवरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न उद्धवने धुळीस मिळवली, हेच दिसते,” असे मत ‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती ( Swami ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
मध्य प्रदेशमधील धारच्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व विभागाकडून गेल्या ८० दिवसांहून अधिक काळ सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात दिवसेंदिवस नवनवीन मूर्ती, कलाकृती उत्खननादरम्यान सापडल्या आहेत. त्यानिमित्ताने भोजशाळेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे काशी येथे विशेष यज्ञास प्रारंभ करणार आहेत. हा यज्ञ प्राणप्रतिष्ठेपासून पुढील ४० दिवस होणार आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. ५०० वर्षांच्या संघर्षांनंतर आज हे मंदिर बनत असल्याने भारतभर या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. झारखंडच्या धनबाद येथील सरस्वती देवी यांचे अनोखे व्रतही यानिमीत्ताने पूर्ण होणार आहे.
काशी प्रांतातील साधारण २२ कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. यापैकीच एका परिवारातील इकरा अन्वर खान या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी ११,००० रुपयांची देणगी दिली होती. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी एबीपी न्युज या वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहीती दिली. इकरा अन्वर खानने आपल्या हातावर जय श्री रामही लिहले आहे.
केरळमध्ये सत्ताधारी सीपीआय(एम) या पक्षाने पूजापुरा येथील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची हिंदू मंदिरे, सरस्वती मंडपम आणि नवरात्री मंडपम यांचा उपयोग राजकीय कामात करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हिंदू मंदिरांचे रुपांतर राजकीय प्रचार मंचात केले आहे. डाव्या पक्षाच्या या कृत्याला भक्तांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. पण कोणाच्याच विरोधाला न जुमानता सरस्वती मंडपमचे रुपांतर राजकीय कार्यालयात करण्यात आले.
तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल बैस सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केले आहे. फरजाना नावाच्या या मुलीने आपले नवीन नाव सरस्वती ठेवले आहे. तिने २५ जुलै रोजी वीरेंद्र कश्यप कश्यपसोबत एका मंदिरात वैदिक रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांचे सुमारे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. फरजानाने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचबरोबर तिने आपल्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
मीरारोडमध्ये 'लिव्ह-इन पार्टनर' खून प्रकरणात अनेक नवे खुलासे उघडकीस येत आहेत. सरस्वती वैद्य यांचे तुकडे करून कुकरमध्ये उकळणारा आरोपी मनोज साने याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी गुगलवरून उपाय शोधला होता. तसेच साने याने खून केल्यानंतर मृतदेहाचे फोटो काढल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे जाणून घेण्यासाठी साने यांनी अनेक गुगल सर्चही केले. चौकशीदरम्यान साने हे वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने मागील वर्ष कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येणाऱ्या वर्षात कोकण प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समालखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी रा.स्व. संघाचे कोकण प्रांत संघ
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला होता. "शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. मात्र, सरस्वतीचा फोटो. शारदा मातेचा फोटो कशाला, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. छगन भुजबळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वात
ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि द्वारकेतील शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी नरसिंहपूर येथे वैदिक मंत्रोच्चारात समाधिस्त करण्यात आले
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
बासर येथे नुकताच श्रीदत्तमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दाक्षिणात्य धाटणीचे हे मंदिर म्हणजे एक पावन तीर्थस्थानच. त्याविषयी काही...
विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेच्या विसर्जनाच्या दिवशीही झारखंडमध्ये अशांतता होती. हजारीबाग, कोडरमा आणि जामतारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरस्वती विसर्जनावेळी अशांततेच वातावरण पसरलेले होते. सरस्वती पूजनाच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी येथे कट्टरपंथियांच्या जमावाने गोंधळ घातला.
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या विविध रूपांचा जागर करताना दै. ‘मुंबई तरुण भारत’ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नवदुर्गांची प्रेरणा ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध करणार आहे. आज गुरुवार, दि. ७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, प्रारंभी शारदावंदन केले जाते. या परंपरेलाच अनुसरून लेखमालेतील पहिला लेख एकविसाव्या शतकातील आधुनिक सरस्वती डॉ. शकुंतला गावडे यांच्या विद्याकर्तृत्वाला वंदन करणारा...
“नद्यांना प्रदूषणुक्त करण्यासाठी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करूया,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी रेडिओवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासीयांना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जागतिक नदी दिनानिमित्त नद्यांचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “‘जागतिक नदी दिन’हा एक दिवस आहे जो आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी जुळलेला आहे.
साधारणपणे ज्येष्ठ महिना संपला की, आषाढाच्या अगदी सुरुवातीलाच आठवण होते ती कविकुलगुरू कालिदासाची! ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजेच आषाढाची प्रतिपदा ही कालिदासाच्या जीवन व कार्याला उजाळा देणारी मानली जाते. महाराष्ट्राच्या रम्य अशा रामगिरी पर्वतीय प्रदेशात निवास करताना पहिल्यांदाच जेव्हा त्याला मनोरम असे मेघमंडळ दृष्टीस पडले, तेव्हा तो आपल्या प्रियतमेच्या गोड आठवणींना उजाळा देऊ लागतो. त्याचवेळी त्याचा वाग्विलास बहरू लागतो. हेच काव्य पुढे मेघदूतासारख्या खंडकाव्याच्या रूपाने जगासमोर येते. कदाचित याच कारणामुळे नुकत्
सरस्वती नदीचा अभ्यास अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे - एक तर यामधून भारताच्या प्राचीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी, वेद व महाभारताचा काळ निश्चितीसाठी ठोस माहिती मिळत आहे. तसेच प्राचीन ग्रंथांतून दिलेल्या ‘सरस्वती लुप्त झाली,’ सारख्या कथा म्हणजे ‘थोतांड’ आहे, असे म्हणता येणार नाही. सिंधू-सरस्वतीच्या खोर्यातील गावे का ओस पडली, हे कळण्यासाठी आज या माहितीची मदत होते आहे.
सकारात्मकता हे कोरोनाविरोधातील महत्वाचे शस्त्र : सोनल मानसिंह
विक्रोळीत नुरानी मशिदीच्या रस्त्यावर आदरणीय संत श्रीमान यति नरसिंहानंद सरस्वती यांचे फोटो चिकटवण्यात आले आहेत.
सा. ‘विवेक’ संचलित ‘विवेक साहित्य मंच’च्या वतीने शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत डॉ. अर्चना कुरतडकर यांनी नुकतीच घेतली. शरणकुमार लिंबाळे यांनी आतापर्यंत आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार हाताळले असून, समीक्षा आणि संपादनही केले आहे. अन्य प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले असून, ‘सनातन’ ही त्यांची तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीला मानाचा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ नुकताच प्राप्त झाला.
ज्येष्ठ शल्यविशारद आणि डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ डॉ. वेणीमाधव श्रीराम उपासनी तथा ‘अच्युतानंद सरस्वती’ यांचे वयाच्या ८५व्या वर्षी गुरुवार, दि. १८ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
ज्येष्ठ शल्यविशारद आणि डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ डॉ. वेणीमाधव श्रीराम उपासनी तथा अच्युतानंद सरस्वती यांचे गुरुवार, दि. 18 मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते अच्युतानंद सरस्वती या नावाने ओळखले जात होते. डॉ. वेणीमाधव यांनी चार आश्रमांचे तंतोतत पालन केले होते.
आज मंगळवार माघ शु. पंचमी अर्थात वसंतपंचमी. त्यानिमित्त सरस्वती या ज्ञानदेवीचा भारताबाहेर झालेलाप्रवास मांडणारा हा माहितीपूर्ण लेख...
विदर्भ साहित्य संमेलनातील घटना
इसवी सन १९२०-३०च्या दशकात मोहेंजोदरो, हडप्पा वगैरे ठिकाणे सिंधू नदीच्या खोर्यात सापडलेली असल्याने, त्या नागरीकरणाला ओघानेच ‘सिंधू संस्कृती’ असे नाव दिले गेले. पण, पुढच्या काळात सिंधूच्या खोर्यात न येणार्या अशा दूरवरच्या इतरही अनेक ठिकाणी त्याच्याशी समकालीन असे आणि साधारण तशीच वैशिष्ट्ये असलेल्या नागरीकरणाचे अवशेष मिळायला लागले. त्यांच्यापैकी बहुसंख्य ठिकाणे प्राचीन ‘सरस्वती’ नदीच्या काठी होती, असे लक्षात येते. त्यामुळे या नागरीकरणाचे ‘सरस्वती संस्कृती’ हेच नाव जास्त समर्पक ठरते. ते तसेच असावे, याची कारणम
दि. १७ सप्टेंबर रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. आज या घटनेला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात महर्षी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या ‘आर्य’ समाजानेही महत्त्वाची भूमिका निभावली. आज जाणून घेऊया मराठवाडा मुक्ती संग्रामात ‘आर्य’ समाजाच्या बरोबरीने ‘गुंजोटी’ गावाने दिलेल्या लढ्याबद्दल...
निलेश नीलकंठ ओक यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि ‘The Historic Rama - Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.
श्रीराममंदिर निर्मिती कोणत्याही मुहूर्तावर अवलंबून नाही तर मंदिरनिर्मितीला ज्या वेळी सुरुवात होईल, ती वेळच आपोआप शुभ मुहूर्त होऊन जाईल. म्हणूनच स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनीही ‘झारीतले शंकराचार्य’ न होता मुहूर्त, मतभेद, वैयक्तिक लाभ वगैरेच्या बाहेर पडून ५ऑगस्ट रोजी होणार्या श्रीराममंदिर निर्मितीच्या पायाभरणी सोहळ्यात मनाने, कायेन, वाचेन सहभागी व्हावे.
राम मंदिर शिलान्यास निर्माणाची वेळ ठरवण्यात आली आहे. मात्र, आता मंदिर निर्माणाच्या वेळेवर शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शंकराचार्य यांनी मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त अशूभ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "मी रामभक्त आहे, मंदिर कुणीही बनवावे परंतू मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त हा शुभ असायला हवा. मंदिर जनतेच्या मदतीने बनत आहे तर त्यांचेही मत जाणून घेतले पाहिजे."
३० जानेवारी, २०२०... ही तारीख आहे बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची... ही तारीख आहे सरस्वती पूजनाची! मात्र, दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आल्याने प्रकरण सध्या न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले आहे. ज्याप्रमाणे सर्वाधिक हिंदूंची लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये हिंदुराष्ट्राची मागणी लावून धरली जाते, असाच काहीसा बंड येथील हिंदू बांधवांनी जुलमी व्यवस्थेविरोधात केला.
२०१० ते २०१९ पर्यंत सुतोपोने दरवर्षी किमान २ हजार, ३०० धोक्याचे इशारे दिले. ते खरे ठरले आणि अक्षरश: लाखो लोकांचे जीव वाचले. सुतोपो ‘पाक तोपो’ म्हणजे ‘श्रीमान तोपो’ या टोपण नावाने तमाम जनतेच्या लाडका बनला.
क्रांतिवीर गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर यांच्या पत्नी सरस्वतीबाई सावरकर उर्फ येसूवहिनी सावरकर यांची आज तिथीनुसार (वसंत पंचमी) १०० वी पुण्यतिथी. त्यानिमित्त येसूवहिनींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
स्वामींनी भारतभ्रमण पायी केले. पायात चप्पल न घालता, वाहनात न बसता सर्वत्र पदयात्रा करणारे टेंबेस्वामी! त्यांचा शिष्यपरिवार भारतभर पसरलेला आहे. त्यांच्या कृपेने कृतार्थ झालेले अनेक भक्त आहेत.
देवीने धारण केलेल्या सर्व आयुधे-शास्त्र-चिह्ने-अवजारे यांचा संक्षिप्तरूपाने आणि विस्ताराने सुद्धा उल्लेख केला गेला.