मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता भाजप नेते गिरिश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीत अजित पवारांचा फोटो छापल्याने राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर सर्वांचे फोटो छोटे असून पवारांचा मोठा फोटो छापलेला आहे.पवारांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असे कॅप्शन देण्यात आले आहे.
Read More
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीतच खच्चीकरण सुरू झाले असून त्यातुनच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली. हा पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागल्याचे म्हटले जात आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चा, आरोप - प्रत्यारोप आणि वाद - प्रतिवादांना अखेर बुधवार, दि. २५ मे रोजी जवळपास पूर्णविराम लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे राज्यात नवी चर्चा सुरू झाली होती.
राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजेंचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला असल्याचे ठाम मत संजय राऊत यांनी मांडले आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी हवी असल्यास संभाजीराजेंनी पक्षात प्रवेश करावा अशी भूमिका शिवसेनकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी हि अट मान्य न केल्यामुळे शिवसेनेकडून कोल्हापूरमधीलच दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याचं ठरलं होत. त्यानुसार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते.
उद्योग-व्यवसायामध्ये ‘आव्हानातून संधी’ हा यशाचा एक मूलमंत्र आहे. हा मंत्र जो उद्योजक कटाक्षाने पाळतो, तो यशस्वितेच्या शिखरावर पोहोचतो. कोरोना काळात आपल्या उत्पादनाला वेगळी दिशा देत, ‘रुद्रा क्रिएशन्स’ने उद्योगाला नव्या क्षेत्रात स्थिरावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कंपनीचे सीईओ संजय पवार आणि संचालक प्रीती पवार यांनी अपार मेहनत केली. तसेच कोरोना केअर सेंटर्स उभारणीतही, संबंधित वस्तूंच्या पुरवठ्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि ते काम यशस्विपणे पूर्णही केले. तेव्हा, कोरोना काळातील त्यांच्या या मेह
'रुद्रा क्रिएशन्स'ला लवकरच १७ वर्षे पूर्ण होतील. आज ‘रुद्रा क्रिएशन्स’ची उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात आहे. ४० हून अधिक लोकांना ‘रुद्रा क्रिएशन्स’ कंपनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देते. आपल्या यशाचं सारं श्रेय संजय पवार आपले भाऊ, पत्नी प्रीती, मोठे साडू, मित्रपरिवार, कंपनीची टीम आणि ग्राहक यांना देतात.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नामुळे २३ वर्षीय महिलेची फाटलेली गर्भपिशवी वाचवित तिला पुनर्जन्मच मिळाला आहे.