बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात सुरू होईल अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळ स्थापनेनंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या मार्गाचे लोकपर्ण होण्याचे संकेत मिळत आहे.
Read More
जालना-नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या सहा बांधकाम कंत्राटांसाठी मंगळवार, दि.२१ रोजी चार स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. जालना - नांदेड द्रुतगती महामार्गात जालना, परभणी व नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या महामार्गाची एकूण लांबी १८० कि. मी. आहे. विजेत्यांच्या यादीत APCO इन्फ्राटेक प्रा. लि., मॉन्टेकार्लो लिमिटेड (एमसीएल), पीएनसी इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लि. (आरएसआयआयएल) यांचा समावेश आहे.
जलयुक्त शिवार योजना, समृद्धी महामार्ग, राज्यातील शहरांमध्ये वेगाने विस्तारणारे मेट्रो रेल्वेचे जाळे आणि आता अटल सेतू... या योजना-प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे आणि आव्हानात्मक परिस्थितीतही हे प्रकल्प पूर्णत्वास आणणारे महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणजे देवेंद्र फडणवीस!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचे स्वप्न पाहिले. महाराष्ट्राने यात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी ‘आर्थिक परिषदे’ची स्थापनाही केली. या परिषदेने यासाठीचा आपला अहवाल नुकताच सादर केला असून, याची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यास आगामी काही काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची झालेली असेल.
लढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 1.26 च्या सुमारास बस पलटून भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही नागपूर वरुन पुण्याला जात होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस भरधाव वेगात असतांना तिचे टायर फुटले आणि बस काँक्रीट दुभाजकावर जाऊन आदळली.
"ज्या महामार्गाला नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं दिलेलं आहे. आणि त्यांच्या नावानी असलेल्या महामार्गाला शापित बोलणं हे बाळासाहेबांचा फार मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे." अशी टीका आं नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे. समृद्धी महामार्ग बनत असताना सर्वांत पहिला विरोध कोणी केला? तर त्या संजय राजाराम राऊतच्या मालकांनी केला. असा हल्लाबोल ही त्यांनी यावेळी केला आहे.
वंदनीय बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची होती. असं भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी 'उचलली जीभ लावली टाळ्याला' हा कार्यक्रम राबवला आहे. असा खोचक टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे.
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पार पडले. समृद्धी महामार्गावर लवकरच इंटीलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम बसविण्यात होणार आहे. ही यंत्रणा तातडीने बसविण्याची विनंती त्यांनी केली. याच वेळी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दलही चिंता व्यक्त करत प्रवाशांना विनंती केली आहे.
"अंदाज कुछ और है सोचनेका, मुझे शौक है रास्ता बनाने का" असा शेर देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिर्डी ते भरवीर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाच्या लोकार्पणावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेरो-शायरी केली.
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थकारणाला कलाटणी देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उदघाटन करण्यात आले होते. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मार्गावर प्रवास करून प्रकल्पाचे काम दर्जेदार झाल्याचा पुरावा दिला होता. याच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २६ मे रोजी होणार असून नागपूर ते भरवीर हा म
मी काही टीका करत नाही. मात्र, मागच्या सरकारने ५० हजार कोटींचा एमओयू केला होता. मात्र, एक रुपयाही ते महाराष्ट्रात आणू शकले नाही, याबद्दल बोलणार का, असाही सवाल त्यांनी विरोधकांना केला. अजित पवार सत्तेतून बाहेर गेले अन् डोळ्यावर अंधारी आलीयं!, असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. सरकारने केलेल्या विकासप्रकल्प किंवा महामार्गावरुन ते प्रवास करतील मात्र, त्यांच्या दृष्टीस ते पडणार नाही, असे म्हणत त्यांनी पवारांचा समाचार घेतला.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली महामार्ग यांसारख्या राज्याच्या आर्थिक राजधानीला विविध शहरांशी वेगवान पद्धतीने जोडणार्या महामार्गांचे पहिले टप्पे प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाले. पण, मागील एका तपापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवगतीनेच सुरु आहे. तेव्हा, एकूणच मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प रखडण्यामागची कारणे आणि हा महामार्ग कधी पूर्णत्वास येईल, यासंबंधी आढावा घेणारा हा लेख...
कोकणच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत. तसेच ‘समृद्धी’ महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेच्या धर्तीवर लवकरच मुंबई-गोवा महामार्ग ‘ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल’ रस्ता बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. कोकणच्या पर्यटनवृद्धीसाठी ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून ‘कोस्टल रोड’चेही रुंदीकरण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात कोकणवासींयाशी संवाद साधण्यासाठी आले होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "बाईमाणसाने बाईसारखेच बोलले पाहिजे, माणसासारखे बोलू नये. आम्हीही माझगावचे आहोत. माझगावचे त्यांचे पूर्वीचे नेते यांच्याकडून कशी एक्टिंग करायची हे आम्ही देखील शिकलो आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ॲक्टिंग करू शकतो. त्या