समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की, हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येक
Read More
समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
समर्थ रामदासस्वामींवर प्रकाशित साहित्य एकाच ठिकाणी वाचणे शक्य व्हावे यासाठी सुमंगल प्रकाशनातर्फे 'समग्र समर्थ साहित्य' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहे.
समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत.