निवडणूकीचा अनपेक्षित कलामुळे अदानी पोर्टस, व अदानी समुहाच्या इतर समभागात घसरण झाली आहे. परिणामी गौतम अदानी यांच्या कंपनीच्या बाजार भांडवलात मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील या समभागात २० टक्क्यांनी घसरण झाल्याने अदानी समुहातील समभागात ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अंबुजा सिमेंट,अदानी एंटरप्राईज, अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी ग्रीन, एनडीटीव्ही, अदानी टोटल गॅस या समभागात १२ ते १८ टक्क्यांनी नुकसान झाले आहे.
Read More
एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात बदल झाले आहेत. यामध्ये विप्रो कंपनी सेन्सेक्स ३० मधून बाहेर गेली असून अदानी समुहाची अदानी पोर्टसची एन्ट्री या निर्देशांकात (Index) मध्ये झाली आहे. बेंचमार्क ३० मध्ये येणारी अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन ही समुहाची पहिली कंपनी ठरली आहे.
नवीन आलेल्या माहितीनुसार, अदानी समुहाने शेअर बाजारात झालेले नुकसान आता पूर्ण भरून काढलेले आहे. फेब्रुवारी २०२३ मधील हिंडनबर्ग शॉर्ट सेलरने केलेल्या खळबळजनक आरोपांनी अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. परिणामी गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला मोठे मूल्यांकनात नुकसान झाले होते. मात्र अदानी समुहाने आपली थकित देणी चूकवून कर्ज कमी करणत नवीन प्रकल्प काही काळासाठी कमी केले होते
अदानी समुहाकडून पूर्वेच्या किनारी आता आपले साम्राज्य पसरवले जाणार आहे. अदानी पोर्ट या अदानी समूहातील कंपनीकडून गोपालपूर पोर्ट लिमिटेड कंपनीचे संपादन (Acquisition ) केले जाणार आहे.यासाठी अदानी समूहाने ३०८० कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत आहे. गोपालपुर हे भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे पोर्ट आहे जे रेल्वे रोड यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वाचे ठरते. सध्या गोपालपूर पोर्टची क्षमता २० एमएमटीपीए असून याहून ती भविष्यात वाढू शकते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी यांच्या शेयरमध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे. तर अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेयरमध्ये सुद्धा तेजीचे वातावरण आहे.
अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स या कंपनीला अमेरिकेकडून मोठा निधी मिळाला आहे. श्रीलंकेतील कोलंबो बंदराच्या टर्मिनल विकासासाठी अमेरिकेच्या सरकारकडून ५३३ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे. या कर्जातून मिळालेल्या निधीमुळे अदानी पोर्ट्सला आपला व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.