प्रसिद्ध पटकथा लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 'कॉपीराइट कायदा, १९५७' अंतर्गत घोष यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असता, सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकारी यांच्या समोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासूनही सूट देत घोष यांना दिलासा दिला आहे.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेल्या प्रत्येक अभिनेत्रींनी सध्या ओटीटीची वाट धरल्याचे दिसून येते. अभिनेत्री करीना कपूर खान हिने नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर पदार्पण केले असून सुजॉय घोष यांच्या 'जाने जा' या चित्रपटाच्या निमित्ताने ती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. कहाणी, बदला अशा प्रकारच्या थ्रिलर गोष्टी आपल्या चित्रपटातून मांडणारे दिग्दर्शक चित्रपटांचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी 'जाने जा' या चित्रपटाच प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मोठ्या विश्रांतीनंतर अभिनेता अभिषेक बच्चन एका भन्नाट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सत्यजीत रेंच्या कथांचे फॅन असाल आणि थ्रिलिंग चित्रपट आवडत असतील तर लगेच बघा हा लघुपट..