Vaishnavi Hagavane suicide case in Pune is currently making headlines across the state. Even in this modern era such ruthless inhumane incidents happen in an educated society पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या आधुनिक काळातदेखील अशा प्रकारच्या निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणार्या घटना सुशिक्षित समाजात घडतात, यातूनच त्यांची नेमकी ‘हुशारी’ लक्षात येते.
Read More
(George Soros) डाव्या विचारसरणीचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा मुलगा तसेच ओपन सोसायटी फाउंडेशनचे (OSF) अध्यक्ष ॲलेक्स सोरोस (Alex Soros) सध्या सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करत आहेत. वॉशिंग्टन डीसीतील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांच्या निर्घृण हत्येचा निषेधार्थ त्यांनी पोस्टद्वारे केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार टीकेची राळ उठली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली.
हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने हा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या निर्णयानंतर, भारत आणि इतर देशांतील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)तर्फे कायदेशीर तरतुदींनुसार मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) कायदा, २००२च्या अध्याय ७मधील 'भाडे निर्धारण' अंतर्गत असलेल्या कलम ३३ आणि ३४ (१) अंतर्गत भाडे निर्धारण समिती (एफएफसी) स्थापन करण्यासाठी राज्य सरकाराला प्रस्ताव देण्यात आला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन २ए आणि ७ या मार्गिकांशी हे पाऊल संबंधित आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच हा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठविण्यात येईल.
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
( Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजने’तून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1 हजार, 300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला
(16th Finance Commission praises Uttarakhand's financial management) उत्तराखंडला भेट दिलेल्या १६ व्या वित्त आयोगाने उत्तराखंडच्या आर्थिक व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया म्हणाले की, "जर कोणत्याही विकसनशील राज्यात संतुलित वित्तीय तूट असेल तर ती वाईट परिस्थिती नाही. हो, ही तूट वाढणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे."
मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळवार, दि. २० मेपासून कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, तसेच दि. ३१ मेपर्यंत रस्ते वाहतूक योग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
current status of Mumbai Metro network
( maharashtra ST Smart Bus arrive ) भविष्यात ‘एसटी’च्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बससेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘एसटी’च्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा ‘एसटी महामंडळा’चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा देऊ. तेथे किमान एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान उभारू”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी केली.
अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भारताने लष्करी आणि राजनैतिक दोन्ही स्तरांवर अतिशय यशस्वी कामगिरी केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “भारताने फक्त शस्त्रानेच नव्हे, तर डिप्लोमसीच्या जोरावरही पाकिस्तानला पराभूत केले.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, हेच भारताच्या ताकदीचे लक्षण आहे.
राज्य सरकारकडून कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी देण्यात आली असून यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होणार आहे. मंगळवार, १३ मे रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
(Swatantryaveer Savarkar Indian freedom struggle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
Sanjiv Puri has projected a growth rate of 6.5 percent This projection is a reflection of the strong fundamentals, policy clarity and collective will of the Indian economy भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.5 टक्के दराने भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. व्यक्त केलेला हा अंदाज म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकट पायाचे, धोरणात्मक स्पष्टतेचे आणि सामूहिक इच्छाशक्तीचे मूर्त रूपच. सध्याची जागतिक स्तरावरील अनिश्चितता, व्यापार संघर्ष, जागतिक अर
कोकणच्या विकासाला नेहमीच यूती सरकारचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. रविवार, ११ मे रोजी त्यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(Air Marshal A. K. Bharti detail response to Pakistan aggression) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ यांनी आज १२ मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात असल्याचे म्हटले आहे. एअर मार्शल ए.के. भारती म्हणतात, "भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे.
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते उदघाटन पार पडले. यावेळी भर कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नँसी आणि सुकरवाडी एसटी डेपोच्या पुढील ३ महिन्यांत निविदा काढणार, अशी घोषणाच केली.
( India strike on six major Pakistani military bases ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानतर्फे भारतीय शहरांसह सैन्यतळांन लक्ष्य करण्याचा प्रयत्न मोडून काढल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकचे सहा सैन्यतळ, एक सैन्. विमानतळ आणि एका रडारतळावर लढाऊ विमानांसह अन्य शस्त्रास्त्रांनी हल्ला करून धडा शिकवला आहे.
( Important meeting state government ) भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
( Minister Mangal Prabhat Lodha on Startup ) एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होत. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे असे प्रतिपादन, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित "टेक वारी" कार्यक्रमात केले.
Nancy ST depot in the east part of Borivali भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे १० मे, २०२५ ला सायंकाळी ८.०० वाजता केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे.
( Maharashtra State Rural Improvement Mission honored in 100day office improvement program ) १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत य
( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला म्हणून ७ मे २०२५ रोजी १:१७ वाजता पहिला हल्ला झाला आणि १:४४ वाजता मिशन सिंदूर पूर्ण झाले. हल्ला दहशतवाद्यांवर होता आणि या हल्ल्याने उत्कृष्ट कामगिरी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी बुधवारी मीडियाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.
( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
(Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra new sarcastic emperor Sapkal statements can be said to be a guide to the future course of the Congress at present एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली
Rahul Gandhi statement Lord Shri Ram a mere mythological character राहुल गांधी यांनी प्रभू श्रीराम यांना केवळ पौराणिक पात्र म्हटल्याने, देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य ही कुठलीही तात्कालिक चूक नसून, ती काँग्रेसच्या आजवरच्या दीर्घकालीन हिंदूविरोधी दृष्टिकोनाची पुराव्याने सिद्ध होणारी साखळी आहे.
(BKC underground bullet train station) “मुंबईतील ‘बीकेसी’ बुलेट ट्रेन स्थानकाचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. भूमिगत स्थानकांपैकी तिसर्या मजल्याचे काम सुरू आहे. या भूमिगत स्थानकांना आधार आणि मजबुती देणारे काम पूर्ण झाले आहे. आता स्थानकांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच भुयारी मार्गाचे कामही वेगात सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील पाच शाळांमध्ये शौचालय बांधकामाचे कार्य जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Re) आणि विरांगणा महिला मंडळ (VMM Foundation) यांच्या संयुक्त CSR उपक्रमांतर्गत यशस्वीरित्या पूर्ण झाले. या उपक्रमाचा लाभ किनवली, मुगाव, नारायणगाव, वेलोली आणि उमरई या गावांतील विद्यार्थ्यांना झाला आहे.
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना देणारा निर्णय, असेच याचे वर्णन करावे लागेल. देशातील एक मोठा वर्ग यानिमित्ताने मुख्य आर्थिक प्रवाहात येणार आहे.
(India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी
प्रेमाच्या कोशिंबिरीत रोजच्या नात्यांचे चविष्ट तुकडे असतात, पण काही चवी जिभेवर रुळायला थोडा वेळ लागतो, अगदी गुलकंदासारखं! गुलाबाच्या पाकळ्या जशा साखरेत मुरतात, काळाच्या कुशीत विश्रांती घेतात आणि मग कुठे त्या चवीला गंध लाभतो. ’गुलकंद’ हा चित्रपटसुद्धा तसाच एक अनुभव देऊन जातो. ही केवळ प्रेमकथा नाही, ही आहे भावना, नात्यांचे अस्पष्ट कंगोरे आणि त्या नाजूक नात्यांत मिसळलेला दाट गोडवा. कधी अल्लड हास्य, कधी सुस्कारा, तर कधी हलकासा सल, अशा मानवी भावनांचे मिश्रण एकत्रित करत ही कथा आपल्याला प्रेमाच्या गूढतेकडे, त्याच्
महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी राज्य सरकारांकडून आखण्यात येणार्या नव्या धोरणांचा आढावा घेणारा लेख...
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd
( mahrashtra state cabinet meeting ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्यात रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि भांडवल उभारणीसाठी ‘महा इनविट’ स्थापन करण्यास मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी संकलनाला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांना स्थिर परताव्याची संधी मिळणार आहे.
(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
नालासोपार्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणार्या हिंदूंना या देशद्रोही गुंडांनी अडवत धमक्या दिल्या. तसेच, पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेण्यात आला
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचेच हे यश आहे.