'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त वर्षभरापूर्वी जन्मलेल्या वाघाच्या तीन बछड्यांना मंगळवार दि. २४ जून रोजी व्याघ्र सफारीत सोडण्यात आले (borivali national park tiger safari). त्यामुळे यापुढे व्याघ्र सफारीकरिता जाणाऱ्या पर्यटकांना वाघाच्या बछड्यांचे दर्शन घडणार आहे (borivali national park tiger safari). सद्यपरिस्थितीत बछडे धरुन राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विहारातील वाघांची संख्या आठ आहे. (borivali national park tiger safari)
Read More
कांदळवन निसर्गपर्यटन हे स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचे साधन आहेच. सोबतच कांदळवन अधिवासाबद्दल जनजागृती निर्माण करण्यास मदत करते. रत्नागिरीतील नाचणे गावाला कांदळवनामुळे मिळालेल्या रोजगाराची माहिती देणारा हा लेख...
“ ‘ताडोबा अंधारी व्याघ्र’ प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंहाची (jespa lion) जोडी दाखल झालेली असताना उद्यानातच जन्मलेल्या एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. 'जेस्पा' (jespa lion) नामक नर सिंहाचा रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानातच जन्मलेला हा सिंह गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. (jespa lion)
'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या कास पठारावर आता पर्यटकांसाठी 'नाईट सफारी' सुरू केली जाणार आहे. सातारा वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे पठारावरील वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येणार असून निशाचर प्राण्यांच्या वावराला 'नाईट सफारी'चा फटका बसू शकतो.
येत्या काही दिवसात सफारीत वाघिणीला सोडणार
दररोज दुपारी ३ वाजता प्रक्षेपण
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत कर्करोगाशी झुंज देणाऱ्या 'यश' नामक वाघाचा अखेर मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत नांदणाऱ्या 'बाजीराव' नामक एकमेव पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याचे वय १८ वर्ष होते.
अवघ्या ५० रुपयांमध्ये लहानग्यांना करता येणार राणीच्या बागेची सफर
मोबाईल सापडल्यास पर्यटकांवर कारवाई
महापालिकेत अशाप्रकारची कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रशासनाने १७ ऑक्टोबर २०१५ रोजी महासभेत प्रस्ताव सादर केला होता.