स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जगातील पहिल्या स्मार्ट रोबोट्सच्या पत्रकार परिषदेत रोबोट्सनी सांगितले आहे की ते मानवाविरुद्ध बंड करणार नाहीत. या पत्रकार परिषदेत सहभागी असलेले सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयद्वारे चालवले जाणार होते. पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ३००० तज्ञांसह ५१ रोबोट आले होते. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
Read More
अमेरिकेशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपला दुसरा ‘रोबोट रणगाडा’ (युजीव्ही) ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ जगासमोर आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘युजीव्ही रणगाडा’ १०० किमीपर्यंत मानवी मदतीशिवाय गस्त घालत आहे. इतकेच नव्हे, तर ‘युजीव्ही रणगाडा’ आपल्याबरोबर ‘स्वार्म ड्रोन्स’चे संपूर्ण सैन्य घेऊन चालत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे नवे हत्यार पापणी लवते न लवते तोच कोणताही सैनिकी तळ उद्ध्वस्त करु शकतो. ‘युरन-९’ नंतर ‘युजीव्ही’ रशियाचा दुसरा रोबोट रणगाडा आहे.
यंत्रमानवाच्या या जगात प्रवेश करताना या क्षेत्राचा रोजगाराच्या संधींवर, अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच समाजावर होणारा परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही