मुंबई : परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई. व्ही. पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा ( AI ) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.
Read More
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आपला नाविन्यपूर्ण डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी याची प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम भारतातील रस्ता सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना देण्याप्रती एचएमएसआयच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.
ठाणे : खाजगी बस वाहतुकीवर ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने ' वॉच' ठेवला आहे. त्यानुसार आरटीओच्या विशेष तपासणी मोहिमेत कर थकीत, विनापरवाना तसेच परवाना अटीचा भंग करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेऊन वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ३५ खाजगी बसेस विरोधात आरटीओच्या वायुवेग व रस्ता सुरक्षा पथकाने दंडात्मक कारवाई करून तब्बल अडीच लाखांचा दंड आकारला आहे.
मुंबई : मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट येणार आहे.
जबाबदार वाहनचालक घडविण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांतर्फे राबविण्यात आल्याचे मत उमविचे कुलगुरु डॉ. पी.पी.पाटील यांनी व्यक्त केले.
प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे. रस्त्यावर अनेक दुर्घटनांमुळे अने परिवार उध्वस्त होतात. त्यामुळे आपले हे कर्तव्य आहे की आपण रस्त्यावर सुरक्षेची काळजी घ्यावी. स्वत:ची काळजी घ्यावी आणि रस्त्यावर चालणाऱ्या इतरांची देखील. त्यामुळे आपण रस्ता सुरक्षेचा संकल्प घेऊया. असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.