मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने पारदर्शकता, जनहित आणि नैतिक प्रशासनावरील कटिबद्धता अधोरेखित करत घोडबंदर- भाईंदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गाईमुख-भायंदर प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप न करता एमएमआरडीएच्या कार्यपद्धतीला मान्यता दिली आहे.
Read More
शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या पुलाच्या कमला गती देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.
(kharghar) खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते बेलापूरला जोडणाऱ्या (KCR) खारघर कोस्टल रोडच्या डिझाइन आणि बांधकामासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) निविदा प्रक्रिया सुरू केली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पावसाळ्यासह ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने रस्त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनला मंजुरी दिली, ज्यामुळे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
केंद्र सरकारने ईशान्य भारतात दळणवळण मजबूत करण्यासाठी आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये नव्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारे रस्ते प्रकल्प दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महानगरपालिका अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी देखील अभियंत्यांनी सजग राहिले पाहिजे. कॉंक्रिट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्ता चाचण्या, हवामान यांसह कॉंक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना या विषयी महानगरपालिका अभियंत्यांनी कालानुरूप प्रशिक्षण घेऊन अद्ययावत राहिले पाहिजे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपण
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली.
ठाण्यातील तीन हात नाका, एलबीएसमार्ग येथील रस्त्यावर पडलेल्या एका खड्डयांचे छायाचित्र पोस्ट करत सोशलमिडीयावर आलेल्या तक्रारीचे एमएमआरडीएकडून २४ तासांच्या आत निवारण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी(सीआरआयएफ) अंतर्गत लडाखमधील विकासास गती मिळण्याची शक्यता आहे. लडाखमधील राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
अर्थसंकल्पामध्ये नुकसानभरपाईबाबत उल्लेख नाही; कोळी बांधवांची कैफियत
‘कोस्टल रोड’ प्रकल्पातील जाचक अटींविरोधात संताप
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानमधील अमेरिकेची सैन्यवापसी हा सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय. अमेरिका आणि मित्रदेशाच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच तालिबानची सक्रियताही अपेक्षेप्रमाणे भलतीच वाढली. इतकी की अमेरिकेने अफगाणी सैन्यासाठी मागे सोडलेली काही सैनिकी वाहने, शस्त्रसामग्रीवरही तालिबानने अल्पावधीत कब्जा केला. कारण, आजघडीला अफगाणिस्तानचा ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग हा तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे आणि भविष्यात हे प्रमाण वाढून अखंड अफगाणिस्तानच तालिबानच्या अधिपत्याखाली जाण्याची भीतीदेखील
‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पावसाळ्यासारखे पाणीही तुंबले आणि त्यात रस्त्यांचीही चाळण झाली. आता पुन्हा या रस्तेदुरुस्तीचा पालिकेकडून घाट घातला जाईलच. तेव्हा, यानिमित्ताने मुंबईतील रस्त्यांची सद्यस्थिती आणि पालिकेच्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
कोस्टल रोडसाठी ब्रीच कॅण्डी येथे रस्ता बनवण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी टाटा गार्डनमधील २०० झाडे कापण्यात येणार आहेत
चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट-रोड प्रकल्पात मोठ्या गुंतवणुकीचं आमिष दाखवलं गेलं असलं तरी, त्यातून सार्क देशांच्या पदरी कर्जबाजारी होऊन चीनचे मांडलिक होण्यापलीकडे फारसं काही पडणार नाही. याउलट भारत-आसियान महामार्गांसारख्या प्रकल्पांमुळे त्यांना प्रादेशिक व्यापार आणि गुंतवणुकीचे फायदे मिळतील.