भारतीय अंतराळ संशोधनात नवनवे विक्रम ‘इस्रो’ रचत असून, भारतीय अंतराळ स्थानकाची प्रतिकृती सादर करत, ‘इस्रो’ने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. ‘गगनयान’ मोहिमेच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताचे अंतराळयानाचे स्वप्न अधिक जवळ आले असून, केंद्र सरकारच्या धोरणात्मक पाठबळामुळेच हे शय झाले आहे.
Read More
भारत हा तरुणांचा देश. या देशातील युवाशक्ती राष्ट्रउभारणीचे विधायक कार्य सातत्याने करीत असते. याला अंतराळ विज्ञानाचे क्षेत्रसुद्धा वर्ज्य नाही. अंतराळ मोहिमांमागचा भारतीय विचार इथपासून ते अवकाश मोहिमांचे पर्यावरणपूरक भविष्य इतया व्यापक क्षितिजावर काम करणारी युवकांची फळी भारतामध्ये आहे. आज ‘राष्ट्रीय अंतराळ दिना’च्यानिमित्ताने अशाच काही निवडक युवा अंतराळ अभ्यासकांचा, संशोधकांचा हा अल्पपरिचय...
(NISAR to be launched from Sriharikota) भारत आणि अमेरिकने संयुक्तपणे विकसित केलेल्या 'नासा -इसो सिंथेटिक अॅपर्चर रडार' (निसार) या अत्याधुनिक उपग्रहाचे बुधवारी दि. ३० जुलैला श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून जीएसएलव्ही एफ-१६ (GSLV-F16) रॉकेटच्या साहाय्याने संध्याकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. हे रॉकेट निसारला ७४७ किलोमीटर उंचीवर, ९८.४ अंशांच्या झुकाव असलेल्या सूर्य-समकालिक कक्षेत ठेवेल.
(GSLV-F 16 successfully launches NISAR satellite from Sriharikota) नासा आणि इस्रोच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेली एक महत्त्वाकांक्षी मोहीम — 'निसार' अर्थात नासा -इस्त्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार'. या मोहिमेअंतर्गत बुधवार दि. ३० जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी, हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 रॉकेटद्वारे अंतराळात झेपावले आहे. हे रॉकेट उपग्रहाला सूर्य-समकालिक कक्षेत म्हणजेच सन सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये ७४७ किमी उंचीवर प्रस्थापित करेल.
(Shubhanshu Shukla) 'ॲक्सिओम-४' या मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशू यांनी या एक संदेश दिला आहे. "हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनीय होऊ शकला," असे शुभांशू त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले.
(Axiom-4 Mission) भारताच्या अंतराळ प्रवासातील आजचा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता यशस्वीरित्या अवकाशात झेप घेत नवा इतिहास रचला आहे. Axiom-4 या खासगी अंतराळ मोहिमेअंतर्गत ते चार सदस्यीय अंतराळवीर पथकासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएसकडे रवाना झाले आहेत. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ
अंतराळाचे आकर्षण मानवाला सुरुवातीपासूनच होते आणि आजही आहे. यासाठीच विविध मोहिमा जगभर आखल्या जातात. अंतराळातील मोहिमांसाठी भारताची ‘इस्रो’ ही संस्था म्हणजे आदर्शत्वाचे उत्तम उदाहरण ठरावे! जगाला अचंबित करणाऱ्या अनेक मोहिमा ‘इस्रो’ने लीलया पूर्ण करून अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध केली आहे. तीच परंपरा पुढे नेत पुन्हा एकदा राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने झेप घेत नवा इतिहास रचला आहे. ‘एक्जिओम-४’ या खासगी अंतराळ मोहिमेंतर्गत शुभांशु शुक्ला दि. २५ जून र
इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या अवकाश क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १०.४३ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. के. कस्तुरीरंगन इस्रोचे माजी संचालक होते.
नवी दिल्ली : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो)ने ( ISRO ) स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पेडेक्स)ची यशस्वी चाचणी घेतली. ‘इस्रो’ने रविवार, दि. १२ जानेवारी रोजी दोन अवकाश उपग्रहांमधील अंतर प्रथम १५ मीटर, नंतर तीन मीटर ठेवले. यानंतर दोन्ही उपग्रहांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या ’गगनयान’साठीची ( Gaganyan ) जय्यत तयारी सुरू आहे. या मोहिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला टप्पा नुकताच पार पडल्याची माहिती ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्त्रो) शुक्रवार, दि. २९ ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ला रामसेतूचा सुधारित समुद्राखालील अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुष्यकोडीपासून श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत या सेतूचा नकाशा ‘इस्रो’ने प्रसिद्ध केला आहे. हा नकाशा तयार करण्यासाठी ‘इस्रो’ने अमेरिकेच्या उपग्रहाचेदेखील सहकार्य घेतले. अमेरिकन उपग्रहाच्या साहाय्याने समुद्रतळावर लेझरच्या माध्यमातून सेतूचे प्रतिबिंब मिळवणे ‘इस्रो’ला सोपे गेले. एकूण 29 किमीचा चुनखडी असणारा सेतू 99.98 टक्के समुद्रात बुडाला असल्याचे शास्त्रज्ञांनी
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चांद्रयान -१ या पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झाले आहे. ७१ वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी संबंधित आजारावर उपाचार सुरु होते. त्यामध्ये हद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ३० वर्षापेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमध्ये कार्यरत होते. २००८ मध्ये भारताच्या पहिल्या चांद्रयान १ या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भुमिका महत्त्वाची होती. सेवानिवृत्तीनंतर हेगडे हे बेंगलुरुमधील स्टार्टइअप टीमशी जोडले गेले होते. त्यांच्यापश्चात हेगडे यांच
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेईकलचे (आरएलव्ही एलईएक्स - ०२) यशस्वी लँडिंग केले.या स्वदेशी अंतराळयानाला ‘पुष्पक’ असे नाव देण्यात आले आहे. आरएलव्ही एलईएक्स – ०२ लँडिंग प्रयोगाद्वारे रीयुजेबल लॉन्च व्हेईकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड गाठला गेला आहे, असे इस्रोने म्हटले आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) मध्ये सकाळी 7.10 वाजता ही चाचणी घेण्यात आली. ‘पुष्पक’ उंचीवरून प्रक्षेपित केल्यानंतर अचूकतेने धावपट्टीवर यशस्वीरित्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशात विकसित झालेल्या ‘न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाईल’ ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचे ‘मल्टिपल इंडिपेन्डंटली टारगेटेबल रिएंट्री व्हेईकल’ तंत्रज्ञानासह (एमआयआरव्ही) पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या ‘मिशन दिव्यास्त्र’साठी ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांचे नुकतेच कौतुक केले. ‘मिशन दिव्यास्त्र’ची निर्मिती ही संपूर्णपणे स्वदेशात झाली आहे. त्यानिमित्ताने ‘अग्नी-५’ची संरक्षण सज्जता आणि ‘मिशन दिव्यास्त्र’ यांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एक नवा इतिहास रचणार आहे. भारताचे पहिले सौर मिशन लवकरच यशस्वीरित्या एल १ पॉइंटवर पोहोचणार आहे. गतवर्षी २ सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आता ते ध्येय गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
इस्रोने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. दि. १ जानेवारी २०२४ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेत क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला आहे. हा उपग्रह पीएसएलव्ही-सी५८ या रॉकेटच्या मदतीने अवकाशात झेपावला.
‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथापासून रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असाच आहे. भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
भारताने २०४० पर्यंत अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला केली. तसेच २१ ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण पार पडणार आहे. भारतही गगनभरारी घेऊ शकतो, या पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचेच हे यश म्हणावे लागेल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केल्यानंतर विविध मोहीमा हाती घेतल्या आहेत. त्यातील गगनयान मोहीम अंतिम टप्प्यात आली असून येत्या काळात मानवयुक्त आणि मानवरहीत मोहीम राबविण्यासाठी इस्त्रोत लगबग सुरु आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या सूर्य मोहिमेबाबत ३० सप्टेंबर रोजी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. भारताच्या आदित्य एल १ मोहिमे अतंर्गत पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानाने पृथ्वीपासून ९.२ लाख किलोमीटरचे अंतर पार करून पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून यशस्वीरित्या बाहेर पडले आहे. ते आता लॅग्रेंज पॉइंट १ (L1) च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
महाराष्ट्रात एक विश्वगुरू पंडित आहेत, त्यांनी भविष्यवाणी केली की, २०२४ साली मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. ‘इंडिया’ गटबंधनातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची हीच भविष्यवाणी आहे. आपल्या सारखी सामान्य माणसे भविष्यवेत्ती नसतात. आपण वर्तमानात जगतो म्हणून वर्तमान काय आहे, याचा जरा विचार करूया.
इस्रो आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या भारताचे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणार नाही. ISRO चे अहमदाबाद स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (SAC) संचालक नीलेश देसाई म्हणाले की, संपर्क प्रस्थापिक करण्याचं काम उद्या म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी केले जाईल.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, चांद्रयान ३ सारख्या मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने देशाचा गौरव केला आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन कायदा ही महिला शास्त्रज्ञांसाठी भेट आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले.
भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य एल १ उपग्रहाने १५ सप्टेंबर, २०२३ रोजी पृथ्वी प्रदक्षिणेचा चौथा टप्पा म्हणजे 'अर्थ बाउंड मॅन्युव्हर' यशस्वीपणे पूर्ण केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
सामाजिक क्षेत्रात गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ने १४ वर्षं पूर्ण होऊन १५व्या वर्षांत पदार्पण केले. राज्यातील विविध ठिकाणी ‘सेवा सहयोग फाऊंडेशनचा १५वा वर्धापन दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या या वर्धापन दिन कार्यक्रमांचा घेतलेला हा धावता आढावा...
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इस्रोने इतिहास रचला. आता आपला देश लवकरच अंतराळ महासत्ता म्हणून ओळखला जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनच्या तियांगॉंग अंतराळ स्थानकानंतर भारत जगातील तिसरे अंतराळ स्थानक ( स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. आयएसएस आणि चीनच्या स्पेस स्टेशनच्या तुलनेत ते अनेक अर्थांनी खास असेल.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने चांद्रयान ३ बद्दल ९ सप्टेंबर, २०२३ रोजी इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान २ ऑर्बिटरवरच्या ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने ६ सप्टेंबर, २०२३ रोजी चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरचे छायाचित्र टिपले आहे.
२ सप्टेंबर रोजी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या आदित्य एल-१ ने पृथ्वीवर आपला पहिला फोटो पाठवला आहे. आदित्य एल-१ ने अवकाशात पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतला आहे. आदित्य एल-१ सेल्फी घेत असतानाचा व्हीडिओ इस्त्रोने शेअर केला आहे.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण शनिवारी, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले. सूर्याभ्यासासाठी निघालेले हे यान १५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून एल १ पॉइंट पर्यंत पोहचणार आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेच्या प्रत्येक रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी काउंटडाउनसाठी जो आवाज आपण ऐकत होतो. तो आवाज एन वलारमथी यांचा होता. दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दि. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळीही संपूर्ण देशाने काउंटडाउन ऐकले होते, ते ही एन वलारमथी यांनीच केले होते. वलारमथी यांचा आवाज यापुढे श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांची काउंटडाउन करणार नाही. त्यामुळे सर्व शास्
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आदित्य L१ अंतराळयानाची कक्षा आज म्हणजेच रविवार, ३ सप्टेंबर रोजी वाढवली. आता ते २४५ किमी ते २२४५९ किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच त्याचे पृथ्वीपासून सर्वात किमान अंतर २४५ किमी आहे आणि कमाल अंतर २२४५९ किमी आहे.इस्रोने सांगितले की आता ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास आदित्यची कक्षा पुन्हा एकदा वाढवली जाईल. त्यासाठी इंजिन काही काळासाठी चालू करण्यात येईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो'ने चांद्रयान ३ या मोहिमेतंर्गत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर आतापर्यंत विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाविषयी नवनवीन माहिती पाठवत होता. त्यासंदर्भातील तपशील ' इस्त्रो'ने अधिकृतरित्या जाहीर केला.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. त्यामुळे आजपासून भारत सूर्य वारीला निघाला आहे असे म्हणावे लागेल.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आदित्य हा उपग्रह, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर ठेवण्यात येईल. सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोने आदित्य एल १ या यानात सात वेगवेगळी उपकरणे बसवली आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या यान उतरविल्याने भारताचे सर्वदूर कौतुक होत आहे. यामुळे भारत चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला. भारताच्या कमी खर्चिक परंतु महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेपैकी ही एक मोहीम आहे. या यशापाठोपाठ दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य-एल १’ ही मोहीम प्रक्षेपित झाली. भारताची अंतराळ मोहिमांमधील प्रगती आणि यश पाहता, ही मोहीमदेखील यशस्वी कार्य करेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने या सूर्यमोहिमेचा आढावा घे
भारताच्या पहिल्या सौर मोहिमेला म्हणजेच 'आदित्य एल १' ला आता काहीच तास उरले आहेत. रॉकेटची लॉन्च रिहर्सल आणि इतर तपासणीसुद्धा बुधवारीच पूर्ण होऊन इस्रो प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहे.
चांद्रयान-३ मोहिमेत अलौकिक यश मिळवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने सुर्य मोहिमेकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. सुर्याचा अभ्यास करणारे भारताचे हे पहिलेवहिले मिशन असल्याने ते खास असणार आहे.
चांद्रमोहीमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सूर्यमोहीम हाती घेतली आहे. आदित्य L1 असे या मोहीमेचे नाव असून २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी पीएसएलव्हीच्या माध्यमातून हे यान श्रीहरीकोटा येथुन पाठविण्यात येणार आहे.
पाटणा, बंगळुरूनंतर आता दि. ३१ ऑगस्टला ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आगामी लोकसभेच्या रणनीतीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यावरच बैठकीत मंथन तथा कुंथन होईल, हे कुणी सांगण्याची गरज नाही. देशातील २६ विरोधी पक्ष या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु, बैठकीआधीच राहुल गांधींवर त्यांच्या नेतेमंडळींकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव सुरू झाला.
भाजप सरकारने केलेली कोणतीही कामगिरी काँग्रेसच्या नेत्यांना खरी वाटत नाही, याला काय म्हणावे! पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्याचे पुरावे द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेबद्दल असे काही तारे तोडण्यात येत असतील, तर आश्चर्य वाटायला नको!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या 'चांद्रयान-३' मोहीमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाबाबतचा मोठा खुलासा जगासमोर आला आहे. दरम्यान, चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सांगितले आहे. लँडरला एक विशेष प्रकारचा थर्मामीटर पाठवण्यात आला आहे. यामार्फत मोठी माहिती इस्त्रोच्या संशोधकांच्या हाती लागली आहे.
'चांद्रयान-३' मोहिमेतील चांद्रयानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग होऊन तीन दिवस झाले आहेत. या आश्चर्यकारक आनंदाच्या बातमीनंतर, तिथून आनंदाच्या बातम्या येणं सुरूच आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दि.२६ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान बद्दल नवीन माहिती दिली. इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले की, दि. २६ ऑगस्ट रोजी रोव्हरने १२ मीटरचे अंतर कापले.
भारताचे विक्रम लँडर चंद्रावरील ज्या भागात उतरले, त्या भागास आजपासून ‘शिवशक्ती’ पॉइंट या नावाने ओळखले जाईल; त्याचप्रमाणो २३ ऑगस्ट ही दिवस यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ प्रकल्पात सहभागी असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महिला शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेच्या यशात या महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले.
दि. २३ ऑगस्ट रोजी भारताची ‘चांद्रयान-३’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली आणि जगभरातून कौतुकवर्षाव झाला. त्यानिमित्ताने या अंतराळ संशोधन मोहिमेचे फलित, आगामी दिशा आणि जागतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
‘चांद्रयान-३’चे यशस्वी लॅण्डिंग झाले आणि संपूर्ण भारतात आनंदकल्लोळ उसळला. कार्यालयांतून, रस्त्यांवरून, सोसायट्यांपासून गावागावांतून, शाळा-महाविद्यालयांतून जल्लोष साजरा होत होता. आपल्या दैनंदिन आयुष्यावर सूर्याप्रमाणेच किंवा काकणभर अधिक प्रभाव असलेला हा आपल्या पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. अशा या चंद्राला आपल्या हिंदू संस्कृतीतही तितकच महत्त्वाचं स्थान आहे. पण, आपल्या भावनिक विचारविश्वालाही तो व्यापून आहे. तेव्हा कालानुरूप वारंवार साहित्यात पडत असलेलं चंद्राचं प्रतिबिंब नक्की काय सांगतं, याचा घेतलेला हा वेध...