ऋग्वेदाचे अंतिम सूक्त म्हणजेच ‘संघटन सूक्त’ यात ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्’ असे संघटनवाढीविषयक सुंदर वर्णन आढळते. मानव समूहाने मिळून-मिसळून चालावे, एकत्र येऊनच एका विचाराने बोलावे आणि सर्वांची मनेदेखील एकच असावीत. ज्यामुळे देशातील जनतेचे सर्वहित साधले जाते. इतकेच काय, तर सार्या समस्यांचे निवारण होऊन माणूस हा खर्या अर्थाने माणूस बनतो. परिणामी, आदर्श मानव समाज उदयास येतो.
Read More
आज मंगळवार माघ शु. पंचमी अर्थात वसंतपंचमी. त्यानिमित्त सरस्वती या ज्ञानदेवीचा भारताबाहेर झालेलाप्रवास मांडणारा हा माहितीपूर्ण लेख...
असंख्य सत्यप्रिय संतजण व महापुरुषांनी प्रखर सत्यवादिता, प्रामाणिकपणे सेवा, परोपकार व राष्ट्रीय-सामाजिक कार्य यांद्वारे आपल्या कुळांच्या कीर्तीचा कळस उंचावला आहे. इतकेच नव्हे, तर यांसारख्या सत्यवादी सत्पुरुषांनी शाश्वत सत्यवाणी (ऋत) व सद्व्यवहाराने आपली इहलोकांची जीवनयात्रा यशस्वी करून परलोकाचाही (पुढील जन्मात) मार्ग सुकर केल्याचे निदर्शनास येते. असा हा सत्याचा प्रताप मानवी जीवनाचे सर्वांगीण कल्याण साधणारा आहे.
आम्ही पौराणिक पद्धतीनुसार देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती करून उभ्या करतो. पण, त्यातून बोध घेण्यास मात्र विसरतो. या मंत्रात इडा, सरस्वती व मही या तीन देवींचे माहात्म्य ओळखून त्यांना जीवनात धारण करण्याचा, म्हणजेच आपल्या अंत:करणात त्यांची स्थापना करण्याचा संदेश मिळतो.
रूपा भाटी या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रायपूर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्सड सायन्सेस, एमए येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी अनेक शोधनिबंधही लिहिले आहेत. त्यांच्या अभ्यासाचा विषय भारतीय साहित्यातील खगोलशास्त्रीय माहिती व त्यावरून त्यातील घटनांच्या काळाचा तर्क लावणे असा आहे. तेव्हा, त्यांच्या लेखाचा हा मराठी अनुवाद.
वेदांत हा आम्हास एक दुसर्यांना वाटून खाण्याचा संकेत करतो- ‘केवलाघो केवलादी भवति।’ म्हणजेच जो केवळ ‘आदी’ म्हणजे एकटाच खाणारा आहे, तो केवळ ‘अद्य’ म्हणजे पापाचे भक्षण करणारा आहे. वेदांची संस्कृती दातृत्वाची शिकवण देते. केवळ ‘मी व माझेच सर्वकाही...’ अशा स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या लोकांना वेदांनी ‘राक्षस’ किंवा ‘दानव’ म्हटले आहे.
वाचकहो, आतापर्यंतच्या लेखांमध्ये ‘आर्य’ शब्दाच्या अर्थाची पाश्चात्त्य विद्वानांनी आपल्या सोयीनुसार पद्धतशीरपणे तोडमोड कशी केली, ते आपण तपशीलवार पाहिले. याच विद्वानांच्या मतानुसार आर्यांचे ते तथाकथित ‘आक्रमण’ झाल्यानंतर पुढच्या काळात त्यांनी वेदांची रचना केली. यातल्या काही वर्णनांवरूनच तर मोर्टिमर व्हीलर (Mortimer Wheeler) या पंडिताने “Indra stands accused” अशा मथळ्याने आपले संशोधन प्रसिद्ध करताना देवांचा राजा इंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मग साहजिकच एक प्रश्न पडतो, की या इंद्र देवाने आपल्या बल
आज सकल प्राणिसमूह व त्यातही मानवसमाज मृत्युभयाने त्रस्त झाला आहे. भौतिक साधने, धनवैभव, पैसा-अडका आणि सर्व प्रकारच्या सुविधा असूनही मानसिकदृष्ट्या तो पोखरलेला आहे. आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक या त्रिविध दुःखांनी (तापांनी) वेढलेला माणूस किंकर्तव्यमूढ बनला आहे.
पाश्चात्त्यांनी मांडलेल्या या 'आर्य स्थलांतर किंवा आक्रमण' सिद्धांताचे (AIT /AMT) स्वरूप ढोबळमानाने आपण मागच्या लेखात समजून घेतले. त्या सिद्धांताला भारतीय संशोधकांनी आणि अभ्यासकांनी काय प्रत्युत्तरे दिलेली आहेत, तेही असेच जरा ढोबळपणे आणि थोडक्यात या लेखात समजून घेऊ. यामुळे यातून आधी आपली एक वैचारिक चौकट तयार व्हायला मदत होईल आणि पुढच्या तपशीलवार लेखांकडे वळण्याआधी या विषयाची रूपरेषा आणि दिशा बरीच स्पष्ट झालेली असेल.
पौराणिक युगात वैदिक शास्त्रात बऱ्याच प्रमाणात प्रक्षेप झाल्याने तेव्हापासून आजातागायत स्त्रीला केवळ भोगविलासाची सुखवस्तू म्हणूनच गणले गेले, तर तिला तिच्या अधिकारापासूनही वंचित ठेवण्यात आले. याच कारणाने वैदिकशास्त्र नाहक बदनाम झाले. पण, वरील मंत्रात आलेली विशेषणे स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सर्वोच्च आदर व सन्मान करणारी आहेत.
वेदांनी माणसाच्या आचरणावर मोठा भर दिला आहे. जगातील सर्व ग्रंथ सत्य आणि प्रामाणिकतेला अग्रक्रम देतात. सत्य गोष्टींना प्राधान्य देतात. पण वेद हे जगातील असे महानतम ग्रंथ आहेत की, ते सत्याबरोबरच सदाचाराला म्हणजेच उत्तम आचाराला ही तितकेच महत्त्व देतात.
ऋग्वेदाचे शेवटचे संघटन सूक्त हे वैश्विक एकात्मता, समानता व एकजुटीचे महत्त्व कथन करते. यात आलेले एकूण सहा मंत्र हे सर्वांना एकत्र राहून एकविचाराने जगण्याचा संदेश देतात. प्रस्तुत दुसर्या मंत्रात आपल्या मती, उक्ती व कृती यांना एकाच समान शृंखलेत बांधून टाकतात.
मानव जीवन अमूल्य आहे. सत्यज्ञानाच्या आचरणाने सतत या जीवनाला पवित्र केले पाहिजे. अगदी लहान-लहान उपदेश ग्रहण करीत पुण्यसंचय करीत राहिल्याने आपली जीवनयात्रा सार्थक ठरते. ज्याप्रमाणे मुंग्या मातीचा एक-एक कण जमवून वारुळ तयार करतात किंवा मधमाशा माधुर्याचा छोटा-छोटा अंश संग्रहित करून मधाचे पोळे तयार करतात, तद्वतच माणसानेदेखील अगदी छोटी-छोटी सत्यतत्त्वे, धार्मिकता, प्रामाणिकपणा, नीतिमूल्ये यांचा संग्रह करीत त्यांना जीवनात धारण करावे आणि आपल्या पुण्यकर्मात वाढ करीत राहावे.