कांजण्या हा ‘वेरीसेला झोस्टर’ या ‘व्हायरस’मुळे होणारा आजार आहे. याची साथ साधारण जानेवारी ते एप्रिल महिन्यांदरम्यान असते. रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कातून किंवा हवेतील ‘ड्रॉपलेट’मुळे या आजाराचा प्रसार होतो. ‘व्हायरस’ने शरीरात प्रवेश केल्यावर १४ ते १६ दिवसांत (इन्क्युबेशन पीरिएड) या रोगाची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. शाळेत वर्गातील एका मुलाला जरी लागण झाली तरी ती साथ वर्गभर पसरण्याची शक्यता असते. सुदैवाने या आजाराची लागण आयुष्यात एकदाच होत असल्यामुळे एकदा कांजण्या येऊन गेल्या अ
Read More