महाराष्ट्रात आता ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपटात ‘शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम होते, शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती, शिवरायांचे ११ अंगरक्षक मुस्लीम होते,’ असे ‘खोटे नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा गेल्या दोन-तीन दशकांपासून अनेक विचारवंत आणि सेयुलर पोंगापंडितांनी असाच बिनबुडाचा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु, या तथाकथित विचारवंतांनी तेव्हा आणि आजही याबाबतचा कोणताही समकालीन पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे शिव
Read More
यंदा समुद्री कासवांच्या पिल्लांबाबत कोकण किनारपट्टी लखपती झाली. कारण, समुद्री कासव विणीच्या २०२४-२५ या यंदाच्या हंगामात कोकणातून तब्बल १ लाख ७१ हजार २४५ पिल्लं समुद्रात सोडण्यात आली (sea turtle hatchlings released from Konkan coast). रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापैकी यंदा सर्वाधिक पिल्लं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोडण्यात आली, तर कासवाची सर्वाधिक घरटी रत्नागिरीच्या जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आली. (sea turtle hatchlings released from Konkan coast)
मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणार्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सिंधुदुर्गातील तळाशील खाडीत गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी वाहून आलेल्या सात फुटांच्या 'ड्वार्फ स्पर्म व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याला सुखरुप समुद्रात सोडण्यात आले (whale released from sindhudurg). वन विभागाच्या 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण'च्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने खाडीत अडकलेल्या या व्हेलला खोल समुद्रात जाऊन सोडले. (whale released from sindhudurg)
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ जून २०२४ सोरेन यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन संध्याकाळी रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले. न्यायालयाने दि. १३ जून रोजी सोरेन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आठ भारतीय नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. आठ पैकी सात जण सोमवारी सकाळी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांशिवाय आम्हाला परत आणणे अशक्य होते अस नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या नागरिकांनी म्हटल आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारने या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
cheetah in india भारतातील आफ्रिकन चित्त्यांचे नवीन घर असलेल्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये २० ते २५ चित्त्याना राहण्यासाठी पुरेशी जागा आणि पुरेसा शिकार साठा असल्याचे एका वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. ज्या अभयारण्याचे नाव कुठेच नव्हते, ते आज जागतिक बातम्यांचे केंद्र बनले आहे. नामिबियातून आणलेले आठ चित्ता - पाच मादी आणि तीन नर १७ सप्टेंबर रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मोठ्या धूमधडाक्यात सोडण्यात आले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील तीन चित्त्याना उद्यानातील एका विशेष बंदिस्तात सोडले.
सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगर भागातील एका रिकाम्या विहिरीतून एका जंगली मांजराची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी दि. १८ रोजी पहाटे वनविभागाने या मांजरीची सुटका केली. पहाटेच्या वेळी ट्रेकिंगसाठी गेलेल्या काही मुलांना ही मांजर आढळून आली होती. त्यांनी लगेच वन विभागाला कळवले.
जंगलाला लागून असलेल्या चिपळूण तहसील कार्यालय परिसरात काल दि. १४ जून रोजी एक खवले मांजर आढळून आले. वन विभागाने हे खवले मांजर ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका केली.
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावर देवालय येथे विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे सापडलेल्या खवले मांजरची सुटका काल दि २६ रोजी नैसर्गिक अधिवासात करण्यात आली. मात्र, यामुळे कोकणात अजूनही छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.
गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा'...
वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेला आगामी चित्रपट कुली नंबर १ च्या रिमेकचे मोशन पोस्टर त्याचबरोबर आणखी दोन पोस्टर आज प्रदर्शित झाली आहेत. डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नंबर १' आगामी वर्षात १ मे ला प्रदर्शित होणार आहे.