'साहेबगंजचा रावण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गुन्हेगाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे खरे नाव राम नरेश साहनी आहे. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. राम नरेश सहानी हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. तो सध्या ५० हून अधिक चोरट्यांची टोळी चालवत आहे.
Read More
दसरा हा सण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचपद्धतीने परदेशात स्वीडन (युरोप) येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता स्वीडनमधील रावण दहनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ४० सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमधील एक नागरिक दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळ्याला बाण मारताना दिसत आहे. स्वीडनमधील या दसरा उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. व्हिडिओमध्ये लोक 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देतानाही ऐकू येत आहेत. सोश
“अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी होणे हा भारतीयांच्या धैर्याचा विजय आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील द्वारका येथे रावणदहन कार्यक्रमास संबोधित करताना केले.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व हिंदु युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ठाण्यातील कोलबाड, जागमाता मैदान येथे विजयादशमी उत्सव निमित्त भव्य दिव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.अन्याय,अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, हिंदू धर्मीय सर्वत्र रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी जागमाता मैदान, कोलबाड रोड खोपट ठाणे
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. राज्यात काही भागात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.
रामायणातील सर्वांत मोठा धडा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात धार्मिकतेचे सर्वोच्च महत्त्व आहे. धार्मिकता ही जीवनाला प्रज्वलित करणारी आध्यात्मिक ठिणगी आहे. धार्मिकतेचा विकास ही माणसातील सुप्त देवत्व जागृत करण्याची प्रक्रिया आहे. परमात्म्याचा तेजस्वी अवतार प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनातून नीतिमत्तेच्या मार्गावर कसे चालायचे हे दाखवून दिले आहे. नुकत्याच देशभर उत्साहात साजर्या झालेल्या रामनवमीनिमित्त आदर्शांचा आदर्श असलेल्या प्रभू श्रीरामांचे हे विचारदर्शन...
श्रीलंकेला त्याच्या विमान चालवण्याच्या भूतकाळात तपशीलवार वैज्ञानिक संशोधन करून आपले प्राचीन वैभव पुन्हा मिळवायचे आहे. अनेक श्रीलंकेच्या लोकांचा असा विश्वास आहे की राजा रावण हा जगातील पहिला अनुभवी वैमानिक होता आणि त्याच्या काळात या बेटावर विमाने आणि विमानतळ होते. या पौराणिक समजुतींना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचा युक्तिवाद फेटाळून लावत काही लोक स्वतःहून संशोधन करू इच्छित आहात. दोन वर्षांपूर्वी या कल्पनेला चालना देण्यासाठी नागरी विमान वाहतूक तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्
वाद उफाळल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने आपलं विधान मागे घेतले आहे
स्वयं महिला मंडळाने दि.१३ नोव्हेंबर रोजी भांडुप येथे किन्नर भगिनींसोबत दिवाळी साजरी केली. ते एक अनोखे स्नेहसंमेलनच होते. यावेळी स्वयं महिला मंडळासोबत विविध सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे हेसुद्धा सहभागी झाले होते. किन्नर भगिनींना साडी आणि मिठाई वाटप असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र, विठ्ठल कांबळे यांनी किन्नर रामायण संदर्भ दिला आणि स्नेहसंमेलनाचे चौकट स्वरूप बदलले. किन्नर भगिनींनी आपले सुखदु:ख, आपले जगणे, आपले असणे यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
दिल्ली आणि अलीगड येथे भडकलेल्या हिंसाचार प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम आता पोलीसी सुत्रांनी सुरू केले आहे. गतवर्षी झालेल्या एनआरसी-सीएए विरोधातील हिंसाचारात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) असल्याचे उघड झाले होते. आता या प्रकरणातही पीएफआय आणि भीम आर्मीवर संशयाची सुई फिरत आहे. 'पीएफआय' ही कट्टर इस्लामिक संघटना असून भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण हा आहे.
भारतीय औद्योगिक संस्था ‘ठाणे मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन’चे अध्यक्ष भालचंद्रसिंह रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रावराणा केशवराव सभागृहाचा उद्घाटन सोहळा ठाण्यातील टीएमए हाऊसमध्ये बुधवार, दि. १३ फ्रेब्रुवारी सायंकाळी पार पडला.