अयोध्येच्या श्रीराम मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या शेषावतार मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना झाल्यानंतर ध्वजदंडही नुकताच स्थापित करण्यात आला. शेषावतार मंदिर लक्ष्मणजींना समर्पित असून येणाऱ्या भाविकांना लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे अद्भुत दर्शन घेता येणार आहे. शेषावतार हे लक्ष्मणजींचेच एक अवतार मानले जातात. म्हणूनच श्रीराम जन्मभूमी परिसरातील सर्वात उंच स्थळी शेषावतार मंदिर उभारले जात आहे.
Read More
( culmination on the Shri Ram temple in Ayodhya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा सोमवारी पार पडला. मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर योग्य विधींसह कळस पूजा करून कळसाची स्थापना करण्यात आली.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा चित्ररथ प्रथमच श्री पोद्दारेश्वर राममंदिराच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. येत्या ६ एप्रिल रोजी श्री पोद्दारेश्वर राममंदिराची ५९ वी भव्य शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने निघणार आहे. यावर्षी प्रथमच या शोभायात्रेत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे.
Shri Ram temple उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर हे जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. राम मंदिर हिंदू समाजाच्या सहकाऱ्याने बांधले गेले आहे. यात सरकारकडून कोणतीही मदत घेण्यात आलेली नाही, असे असून मंदिराने सरकारकडे शेकडो कोटींचा कर जमा केलेला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका बैठकीत सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिर बांधकामाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या भिंतीचे ६० टक्के काम
गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत फरिदाबादमधून दहशतवादी संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हँडग्रेनेडही जप्त करण्यात आले, जे सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ निष्क्रिय केले.
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या ( Shree Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती आता अवघ्या काही दिवसांवर. अयोध्येचा लढा हा काही फक्त एका मंदिरासाठीचा लढा नव्हता, या लढ्याला अनेक कंगोरे होते. या यशस्वी लढ्यातून भारतीयांनी काय कमावले, त्यासाठी किती संघर्ष केला, याविषयी भाष्य करणार्या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे परीक्षण...
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात ( Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जानेवारी रोजीपासून सुरू होईल आणि सोमवार, दि. १३ जानेवारी रोजीपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे स्वरुप प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासारखेच राहील, ज्यामध्ये विशेष अतिथी, देशभरातील महान संत, मान्यवर व्यक्ती आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख राम मंदिरांची माहिती आपण घेत आहोत. त्यामध्ये नाशिकचे श्री काळाराम मंदिर, रामटेकचे राम-सीता गडमंदिर, समर्थ रामदास स्थापित चाफळचे राम मंदिर, नामयोगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित दोन राममंदिरे, फलटणच्या राजे नाईकनिंबाळकर यांचे राममंदिर आदींची आपण माहिती घेतली आहे. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये चंद्रभागा घाटावर स्थापित राम मंदिराची माहिती घेऊ. अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. अहिल्यादेवी या शिवभक्त होत्या व त्यांनी सोमनाथ
नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या ( Shri Ram Mandir ) पाच मंडपांपैकी रंगमंडपाच्या कळसाची उभारणी पूर्णत्वास गेली आहे.
Ram Temple विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील गडावरील प्राचीन राम-सीता मंदिर सुप्रसिद्ध आहे. छोट्या टेकडीवर हे मंदिर असल्याने त्यास ‘गड मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. वनवासकाळात श्रीराम, सीता व लक्ष्मणाचे काही काळ या टेकडीवर वास्तव्य होते. येथेच श्रीरामाची व ऋषी अगस्त्य मुनींची भेट झाली. त्यांनी रामास ब्रह्मास्त्रासह अनेक अस्त्रे दिली. गडमंदिर हे अनेक देवदेवतांच्या मंदिरांचे भव्य-विस्तीर्ण असे संकुल आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मणाचे येथे स्वतंत्र मंदिर आहे. कवी कुलगुरू कालिदासाचा तसेच प्राकृत मराठीत ‘सेतुब
मध्य प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिरात तीन मुस्लिम व्यक्तींनी जबरदस्तीने नमाज पठण केल्याची घटना घडली आहे. रुस्तम, अकबर आणि बाबू खान अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय हे ६५ ते ८५ दरम्यान आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध एफआरआय नोंदवून त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ घडली. हे कृत्य त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली.
संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देताना भारताने मानवाधिकार आणि लोकशाहीसारख्या मुद्द्यांवर बोलण्याचा पाकिस्तानला नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की या सर्व बाबींवर पाकिस्तानचा 'सर्वात संशयास्पद ट्रॅक रेकॉर्ड' आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणादरम्यान पाकिस्तानचे मुनीर अक्रम यांनी काश्मीर, नागरिकत्व कायदा आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करून भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिक्रिय
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर संकुलात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे संकुलामध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. देशात बहुदा प्रथमच धार्मिक संकुलामध्ये अशाप्रकारे प्रथमच तृतीयपंथीयांची काळजी घेण्यात आली आहे.
नंदिन जीवनात अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्याला येतो. एखादी वाईट घटना आपल्याला दिसली की, ‘घोर कलियुग’ असे म्हणत, कलियुगाकडे बोट दाखवत, आपण आपले नैराश्य अधिक वाढवतो. रामावर भरवसा असणारे आणि ‘जे काही होते, ते रामाच्या इच्छेने होते’ असे म्हणत, त्या वाईट घटनेचा क्षण आपल्या मनपटलावरून हद्दपार करतात. पण, चिंताक्रांत मंडळी रामराज्य कधी येणार, असा विचार करीत, वर्तमानात जगण्याऐवजी रामराज्याची प्रतीक्षा करणेच पसंत करतात. पण, रामराज्य म्हणजे काय, हे जाणून घेण्याची देखील आवश्यकता आहे.
'ईडी’चा फेरा चुकविण्यासाठी अरविंद केजरीवालांचे विपश्यना, ध्यानधारणा, चौकशीला दांड्या असं सगळं करून झालं; मात्र ‘ईडी’चा ससेमिरा काही सुटलेला नाही. आता त्यांनी काँग्रेसला दणका देत, पंजाब तसेच चंदीगढ लोकसभेच्या सर्व जागा एकट्याने लढण्याचे जाहीर केले.
रामशीलेची पूजा करायची आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला पाठवायची योजना आखली गेली. संपूर्ण भारतभर व्यापक जनसंपर्क आणि जनजागृती झाली. २ लाख, ७५ हजार गावांमध्ये सहा कोटी लोकांनी रामशीलेचे पूजन केले. संपूर्ण देश राममय झाल्याचे दिसत होते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा किंवा जनसंपर्कापेक्षा कितीतरी पटीने अधिक होते. त्यामुळे संघाने हे केले, असे म्हणणे अविवेकी ठरेल. हे सर्व भारतातील जनतेने आणि रामभक्तांनी केले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी रामललाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्येला पायी निघालेल्या शबनम शेख हिच्याशी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे काही कट्टरपंथी महिलांनी गैरवर्तन केले. कट्टरपंथी महिलांनी तिच्या पेहरावावर आक्षेप घेतला. शबनमला त्रास देणाऱ्या महिलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची ओळख ही वाचाळवीर म्हणूनच कायम आहे. आता हा वारसा त्यांची कन्य सुरन्या चालवत आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सुरन्या अय्यर हिने उपवास केला. पण हा उपवास रामललासाठी नव्हता तर बाबराच्या पिलावळींसाठी होता.
आज आम्हाला प्रत्यक्षात या भूमीवर, पृथ्वीवर राम अवतरले आहेत असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. सोमवारी अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल.
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ताबा घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नही मार सकता’ ही दर्पोक्ती खोटी, मातीमोल केली होती, माझ्यासाठी मर्मबंदातील ठेव होती.
माझ्यासाठी हा दिवस अतिशय भावनिक आहे. केवळ कारसेवकच नाही तर शेकडो कोटी हिंदूंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. अयोध्येत राम ललाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली असून फडणवीसांनी कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या कित्येक वर्षांपासून संपुर्ण देश ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आज प्रत्यक्षात साजरा होत आहे. अयोध्या येथे रामललाचा प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील या ऐतिहासिक क्षणात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा नुकताच पार पडला आहे. दुसरीकडे, राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे काळाराम मंदिरदेखील सजले आहे. काळाराम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे.
भारतातील राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म वगैरे जवळपास सर्व क्षेत्रांतील सर्वोच्च व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच सोहळ्यात एकत्र आल्याचे उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. पण, सोमवारी अयोध्येत झालेल्या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही गोष्ट प्रत्यक्षात घडली. भारताच्या सर्व भागांतील आणि सर्व क्षेत्रांतील दिग्गज नेते आणि कलाकार या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले होते, हीच प्रभू रामांची ताकद आणि प्रभाव...
अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी भव्य राम मंदिर उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. राम मंदिर उद्धाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल यांनी आपल्या घरी एक आध्यात्मिक बाग तयार केली आहे.
मंदिरातील श्रीरामाची पूजा ही ’पत्रम् पुष्पम् फलम् तोयम्’ या परंपरागत पद्धतीने जशी होईल, तशी व त्याबरोबरच मनोमंदिरामध्ये रामदृष्टी स्थापित करून, त्या प्रकाशात आदर्श ठरणार्या आचरणाकडे चालत राहूनही, आपल्याला श्रीरामाची पूजा साधावी लागेल.कारण, ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्, रामो भूत्वा रामं यजेत्’ यालाच आपल्याकडे खरी पूजा मानले गेले आहे. ही दृष्टी विचारात ठेवून, भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित ‘मातृवत् परदारेषु, परद्रव्येषु लोष्ठवत्, आत्मवत् सर्वभूतेषु, य: पश्यति स पंडित:’ अशा श्रीरामांच्या व्यवहारपथावर चालणे आ
अयोध्येचे वर्णनच मुळी जिथे युद्ध नाही ती नगरी, असे आहे. या नगरीसाठी हिंदू समाजाने केलेल्या संघर्षालाही या मंदिराच्या निर्माणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. यानिमित्त ज्ञात-अज्ञात अशा सगळ्यांचे स्मरण करीत, आपण या मंगलमय क्षणाचे सहभागकर्ते होऊया!
अयोध्येत दि. २२ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह आहे. या दिवसासाठी कित्येक शतके रामभक्तांनी वाट पाहिली आहे. यामध्ये कारसेवकांचे पण तितकेच मोलाचे योगदान आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज अयोध्येत जे भव्य राम मंदिर उभा राहत आहे, ते लाखो कारसेवकांच्या त्यागामुळेच शक्य झाले आहे.
अयोध्येत दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ४८ पानांच्या पुस्तकामध्ये अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि सयुंक्त राष्ट्रसंघ सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेली तिकिटे समाविष्ट आहेत.
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यातच राज्यसभा सदस्य शरद पवार यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले आहे. मात्र, दि. २२ जानेवारीनंतर श्रीरामललाचे आपण दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्या दक्षिणेकडील राज्याचा दौरा करणार आहेत.
जन्मतः अंध असली तरी प्रभु श्री रामाप्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील ११ वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असुन तिला अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क राम नामाचे गाणे गाऊन रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर १०० ढोल व ३० ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्री रामाला वंदन केले जाणार आहे. यावेळी भाजपाचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अयोध्येत श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने २० ते २३ जानेवारीदरम्यान श्रीराम आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचे अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गीत रामायणातील गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना मिळणार आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या इथे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडणार असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे राम मंदिर उद्धाटन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. सोमवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर निवडणूकीत हिंदु समाजानेही बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकीयीकरण करत नाकारलेले निमंत्रण, हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदूद्वेषाच्याच कुनीतीचा पुढचा अध्याय! यामध्ये नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला केलेल्या विरोधापासून ते अगदी काँग्रेसने रामाचे, रामसेतूचे न्यायालयात अस्तित्व नाकारण्याचा दाखवलेला करंटेपणा हा इतिहास अगदी सर्वश्रूत. पण, सेक्यॅलुरिझमच्या नावाखाली होणारा हा हिंदूविरोध एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. आज राम मंदिराचे निमंत्रण नाकारणार्यांचा राजकीय इतिहास बारकाईने तपासला असता, स्वातंत्र्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या अभिषेकाच्या ११ दिवस आधी एक संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी सांगितले की, मंदिरात रामललांचा अभिषेक करण्यापूर्वी ते ११ दिवस धार्मिक विधी करणार आहेत. यावेळी ते काही नियमांचे पालन करतील. नाशिकमधील पंचवटी येथून त्यांच्या विधी सुरू होतील जेथे भगवान श्रीरामांनी बराच वेळ घालवला होता.
येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर तमाम देशवासियांना 'श्री रामज्योती दिवा' लावण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुंबई उपनगरातील रहिवाशांना श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यासाठी कुंभारवाडा किंवा मुंबईच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून दिवे उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात यावा, अशी मागणी भाजयुमोच्या वतीने सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राममंदीराच्या सन्मानार्थ प्रयागराजच्या अनामिका शर्माने आकाशातून १३ हजार फूट उंचीवरून राम मंदिराचा ध्वज घेऊन उडी मारली.
देश अयोध्येतील राम मंदिराच्या तयारीत व्यस्त असताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राम मंदिर हाच खरा मुद्दा आहे का? शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य हे प्रश्न राम मंदिरापेक्षा मोठे आहेत. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. असं मोठं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. दि.२२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील हजारो मान्यवरांच्या उपस्थित रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर आंदोलनात शहीद झालेल्या रामभक्तांच्या स्मरणार्थ अयोध्येत स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या पहिल्या देणगीदाराला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या सियाराम यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. सियाराम गुप्ता यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी दिले होते.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत केवळ भारतातच नाही तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साह आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताबरोबरच परदेशातही साजरा होणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्येही आठवडाभराचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
अयोध्येच्या राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या रामललांच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. ८६ वर्षीय वैदिक विद्वान लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित हे 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व करतील. ते वाराणसीचे रहिवासी आहेत, आणि 17 व्या शतकातील काशी विद्वान गागा भट्ट यांचे ते वंशज आहेत. ज्यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक गागा भट्ट यांच्या हस्ते झाला. लक्ष्मीकां
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या अक्षता श्री राम मंदिरातून लोकांच्या घरी पोहोचवल्या जात आहेत. यासाठी अक्षता अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरापासून देशातील विविध शहरांमध्ये पोहोचवल्या जात आहेत
अयोध्येच्या धरतीवर श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्णत्वास येऊ लागले आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या दिवशी श्रीरामलला मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक दिनी भारतभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी न्यासकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, कोकण प्रांतने ४० लाख घरांपर्यंत संपर्क करण्याचा विशेष संकल्प हाती घेतला आहे. विहिंपचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी याविषयी माहिती दिली. शनिवार, दि. १
श्रीराम मंदिराच्या उभारणीला ज्यांचा विरोध होता, त्या जावेदमियाँनी श्रीराम आणि सीता हे संपूर्ण देशाचे आहेत, कोणा एकाची त्यांच्यावर मालकी नाही, अशा आशयाचे परवाच राज ठाकरेंच्या दीपोत्सवात विधान केले. म्हणूनच जावेदमियाँनी श्रीराम मंदिराच्या निमित्ताने कोट्यवधी हिंदूंच्या मनातील प्रखर राष्ट्रवादाच्या भावनेची धास्तीच घेतलेली दिसते.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य जवळपास पुर्णत्वास आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून नुकतेच 'अक्षता कलश' वितरीत करण्यात आले. देशभरातील ५ लाख गावांमध्ये या पूजित अक्षता कलशांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी एका कलशाचे आगमन सोमवार, दि. ०६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले.