संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना सांगितले की, पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील लोक एक दिवस भारतात परत येतील आणि अभिमानाने सांगतील की ते भारतीय आहेत. त्यांनी हा विश्वास व्यक्त करताना स्पष्ट केले की भारताची कारवाई दहशतवादाविरोधात असून, ही कृती भारताच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आहे. त्यांनी सांगितले की, भारत कोणतीही मर्यादा न ओलांडता दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे ठोस उदाहरण आहे.
Read More
भारताचे धैर्य आणि शौर्य राम आणि कृष्णापासून आले आहे. शंभर अपराध भरल्यानंतर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने धर्मरक्षणासाठी सुदर्शन चक्र धारण केले होते, तसेच भारतानेही आता सुदर्शन चक्र धारण केले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा कोणत्याही प्रकारची आगळीक झाल्यास स्थगित असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत केले आहे.
संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्याची तारीख आणि वेळ अखेर निश्चित झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या चर्चेला लोकसभेत सोमवार, 28 जुलैपासून सुरुवात होणार असून, राज्यसभेत मंगळवारी, 29 जुलैला चर्चा होईल. दोन्ही सभागृहांत एकूण प्रत्येकी १६-१६ तासांची चर्चा होणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभरात भारतीय संरक्षण उपकरणांची मागणी वाढली असून जगाचे भारतीय संरक्षण क्षेत्राकडे लक्ष लागले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले आहे. महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
(India-China Relationship) चीनच्या क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्द्यांवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(SCO) चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी २५ जूनला भारताच्या वतीने या बैठकीत सहभाग घेतला होता.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवनी पहलगामन येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद असेल तेथे नष्ट करण्याचे धोरण स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत केले आहे.
विशेष प्रतिनिधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला मान्यता दिली. यामुळे स्वदेशी संरक्षण क्षमतांना चालना मिळून देशांतर्गत एरोस्पेस उद्योगाला बळकटी मिळेल. वैमानिक विकास संस्था (एडीए) उद्योग भागीदारीद्वारे हा कार्यक्रम अंमलात आणण्यात येईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. ते तर केवळ एक ट्रेलर होते. पाकिस्तानला यातूनही धडा न घेतल्यास संपूर्ण ‘पिक्चर’ही दाखविण्याची भारताची तयारी आहे, असा सणसणीत इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला शुक्रवारी दिला आहे.
(Minister Rajnath Singh warning ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत, हे आता जगाने बघितले आहे. त्यामुळे पाकची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएइए) देखरेखीखाली येणे आवश्यक आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगाला दिला आहे.
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या आकांवर लवकरच जोरदार हल्ला होईल, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली आहे.
शिवरायांच्या किल्ल्यावरील पवित्र जल संग्रहित करण्यात येणार असून ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमार्फत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी एकविसाव्या शतकातील आव्हानांमध्ये भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करून संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया घातला जाईल. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath singh ) यांनी बुधवारी केले आहे.
नवी दिल्ली : आजच्या सतत बदलणाऱ्या काळात लष्करी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज आणि सज्ज करण्यात लष्करी प्रशिक्षण केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय संविधान हे एका विशिष्ट पक्षाची देणगी असल्याचे ठसविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, भारतीय संविधान ( Constitution ) हे नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून सरदार भगतसिंग, पं. मदनमोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी संविधानाची भावना बळकट होते, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत शुक्रवारी केले.
(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदल सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे ‘आयएनएस तुशील’ ( INS Tushil ) ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. ‘आयएनएस तुशील’ ही प्रोजेक्ट ११३५.६ची क्रिवाक खखख श्रेणीची अपग्रेड केलेली युद्धनौका आहे. ‘आयएनएस तुशील’ युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉन एक्स्पोर्
नवी दिल्ली : भारताने ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ( Hypersonic Missile ) यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान अमेरिकेकडेदेखील नाही. रशिया, चीननंतर भारताने या प्रकारच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी या क्षेपणास्त्राच
नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे मूलभूतपणे युद्धाच्या पद्धती आणि साधने बदलत आहेत. त्यानुसार भारतही सज्ज असून असून जगाचे ‘ड्रोन हब’ ( Drone hub ) बनण्याक़डे भारताची वाटचाल आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले आहे.
मुंबई : ( Matangi Boat ) दिल्लीत स्वावलंबन २०२४ कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या सागरमाला परिक्रमेला हिरवा झेंडा दाखवला होता. क्रू नसलेल्या या बोटीचाही या कार्यक्रमात समावेश होता. या ‘मातंगी बोटी’ने ६०० किलोमीटर अंतराचा प्रवास चालकाशिवाय केला. देशातील पहिल्या स्वायत्त या बोटीने नुकताच नवा विक्रम प्रस्थापित केला. ही ‘ऑटोनोमस मोड’वर चालणारी बोट भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचा वापर सागरी सीमेवर पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षा मोहिमांसाठी केला जाईल.
संरक्षण मंत्रालय भारतीय नौदलासाठी सात प्रगत फ्रिगेट्स आणि लष्करासाठी टी-७२ रणगाड्यांऐवजी आधुनिक फ्यूचर रेडी कॉम्बॅट व्हेइकल्स (एफआरसीव्ही) वापरण्याचा सुमारे १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत यावर मोहर लावली.
नेपाळ भारताचे मित्रराष्ट्र असले तरी नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनाने त्या देशात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण, याठिकाणी पुष्प कमल दहल प्रचंड यांचे सरकार जाऊन पुन्हा के. पी. शर्मा ओली यांचे सरकार आले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार असून त्याच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या आहेत.लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 695 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५, ओडिशातील ५, झारखंडमधील ३, जम्मू – काश्मीरमधील १ आणि लडाखमधील एका जागेवर मतदान होणार आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदी सरकारला तानाशाह म्हणणाऱ्यांना उत्तर दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. ज्यांनी मला माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिले नाही तेच लोक आम्हाला हुकूमशहा ( Dictatorship ) म्हणत आहेत. असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता भाजपकडून जाहिरनाम्यासाठी समितीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीकरिता जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पक्षाकडून स्थापन करण्यात आलेली जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प दि. १ फेब्रुवारी रोजी सादर केला. देशाचा संरक्षण अर्थसंकल्प हा गेल्या वर्षी ५.९३ हजार कोटी होता. आता तो ६.२२ हजार कोटी इतका वाढला आहे. देशाच्या जीडीपीच्या मापदंडावर संरक्षण अर्थसंकल्प १.३९ टक्के आहे. २०२४-२५चा संरक्षण अर्थसंकल्प एकूण सरकारी खर्चाच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्याचे या लेखात केलेले सविस्तर विश्लेषण...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंग्लंड दौर्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यावर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. इंग्लंडलाही भारताबरोबर नव्या जागतिक व्यवस्थेत भागीदार म्हणून काम करायचे आहे. उभय देशांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा दौरा असे याला म्हणता येईल.
अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. अनुपम यांनी राजनाथ यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली असून यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली अशी माहिती फोटो पोस्ट करत दिली.
तुमचा मागचा अनुभव चांगला आहे की, नाही ते मला माहिती नाही. परंतू, आता आपण सोबत आलो तर चांगलं काम करुया, अशी टिपण्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्यावर केली आहे. त्यामुळे त्यांनी कुमार विश्वास यांना थेट ऑफरच दिल्याचे बोलले जात आहे.
दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.
लढाऊ क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारताने गुरुवारी 2.23 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण संपादन प्रकल्पांना प्राथमिक मान्यता दिली. यामध्ये 97 तेजस हलकी लढाऊ विमाने आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) या प्रकल्पांना मंजुरी दिली.
भारतीय सैन्य दलासाठी दि. ३० नोव्हेंबर, गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषदेने ९७ अतिरिक्त तेजस विमाने आणि १५६ प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ही दोन्ही विमाने स्वदेशी बनावटीचे आहेत. हा करार सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय हवाई दल अधिक शक्तिशाली होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा केली.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेअंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली.
स्वदेशी एलसीए मार्क २ आणि एमएसीए या दोन लढाऊ विमानांच्या पहिल्या दोन क्वाड्रनच्या इंजिनांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. त्यासाठी अमेरिकेसोबत केलेल्या करारातील सर्व बाबींना मंजुरी मिळाली असून यामुळे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रास मोठी चालना मिळणार असल्याचे डीआरडीओ प्रमुख समीर कामत यांनी सांगितले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 10 व्या आसियान आणि सहभागी देशांच्या (एडीएमएम- प्लस) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी आसियान असल्याचे स्पष्ट केले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विविध भागधारकांमधील व्यापक एकमत प्रतिबिंबित करण्यासाठी सल्लागार आणि विकासाभिमुख प्रादेशिक सुरक्षा उपक्रमांचे आवाहन केले. समुद्री सुरक्षा वाढवण्यासाठी एडीएमएम- प्लससोबत व्यावहारिक, दूरदृष्टी, परिणामाभिमुख सहकार्य वाढवण्यासाठी आवाहन केले.
भारत आणि अमेरिका दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेमध्ये संरक्षण उत्पादन, इस्रायल-हमास युद्ध आणि चीनविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधील या 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चा संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर झाल्या. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे शुक्रवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण आणि धोरणात्मक विषयांशी संबंधित अनेक मुद्यांवर दोन्ही मंत्र्यांनी सर्वसमावेशक चर्चा केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षा दलातील महिला सैनिकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सुरक्षा दलातील महिला अधिकार्यांप्रमाणेच आता महिला सैनिकांनाही प्रसूती, बालकांची काळजी आणि मुले दत्तक घेण्यासाठी रजा आणि इतर सुविधांसारखे समान लाभ मिळणार आहेत.
मणिपूरमधील हिंसक घटनांवरून विरोधकांच्या हल्ल्यांदरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असला तरी, गेल्या ९ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे.
हवाई दल कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारतीय हवाई दलाच्या कार्यसज्जतेबाबत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी सत्रादरम्यान संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी संरक्षण उत्पादनांचा आयातदार असणारा भारत आज मोठा निर्यातक बनला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करताना केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा उद्देश भारताची समृद्ध लष्करी संस्कृती आणि शतकानुशतके विकसित झालेला वारसा भाषणे, कला, नृत्य, नाटक, नृत्यनाट्य आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून साजरे करणे हा आहे.
भारतीय सैन्य देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील कोणत्याही आगळिकीस उत्तर देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी आर्मी कमांडर्स परिषदेस संबोधित करताना केले.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, चांद्रयान ३ सारख्या मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने देशाचा गौरव केला आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन कायदा ही महिला शास्त्रज्ञांसाठी भेट आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले.
जी-२० शिखर परिषद संपल्यानंतर काहीच वेळात भारताकडून चीनला एक मोठा संदेश देण्यात आल्याची चर्चा होत आहे. लडाखच्या न्योमा भागात जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती भारत करणार आहे. या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राजस्थानमध्ये परिवर्तन संकल्प यात्रेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाना साधला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "चांद्रयानचे प्रक्षेपण आणि लँडिंग यशस्वी झाले, परंतु काँग्रेसचे राहुलयान २० वर्षांपासून प्रक्षेपित होऊ शकले नाही."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ०२ आणि ०३ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्यामध्ये राजनाथ सिंह श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्री रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्देना यांच्याशी चर्चा करतील.