उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. खर्या अर्थाने पक्षाचे प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं, ही कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब. परंतु, त्यानंतरच्या अडीच वर्षांत ठाकरेंनी कुटुंबातील लोकांच्या हाती सत्ता सुपुर्द करून आपले मुख्यमंत्रिपद म्हणजे केवळ ‘रबरी शिक्का’ असल्याचे दाखवून दिले होते.
Read More
ठाणे : नालेसफाईत 'हातसफाई' करणाऱ्या एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतरही शहरातील कळवा,मुंब्रा,वागळे इस्टेट भागातील बहुतांश नाल्यांमध्ये अद्याप काहीच सफाई झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव दै.मुंबई तरुण भारतने मांडले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार या ठेकेदारांना साडेआठ लाखांचा दंड ठोठावला आहे.
उल्हासनगरमध्ये लवकरच मेट्रो धावणार असून शहरवासीयांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतीच भाजप आ. कुमार आयलानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हा त्यांनी शहरवासीयांना उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे. मेट्रोला मान्यता मिळाल्याने आ. कुमार आयलानी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात राऊतांनी स्वतांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट जे अद्यापही उद्धव ठाकरे चमूकडेच होते. मात्र, ठाकरे गटाने निकाल आल्यानंतर त्याचेही नामकरण 'शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे', असे केल्याने ट्विटरच्या नियमावलीनुसार ब्लू टीक हटवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाला सोशल मीडियावर हा मोठा दणका मानला जात आहे. 'शिवसेना' ट्विटर अकाऊंटचे एकूण ८ लाख ४८ फॉलोअर्स आहेत. तर 'शिवसेना कम्युनिकेशन्स' या ट्विटर खात्याचे एकूण २ लाख १३ हजार इतके फॉलोअ