(WAVES 2025 - Rajinikanth praises PM Modi) 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते सध्या सुरू असलेल्या परिस्थितीशी लढतील. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करतील', असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या चार दिवसीय जागतिक जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) ते बोलत होते.
Read More
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत. दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी वहिणी आणि भाऊ अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी मराठमोळ्या पेहरावात हजेरी लावली.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की : २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात हिंदील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार एकत्र झळकले आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. यादरम्यान, कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर कसे संबंध आहेत. भविष्यात ते एकत्रितपणे काम करण्याची काही शक्यता आहे का? याबद्दल खुलासा केला आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांनी कुआलालम्पुरमध्ये मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली. दक्षिण कुआलालम्पुर येथील पुत्रजया येथील 'Bangunan Perdana Putra' इमारतीत पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या योजनांचा सन्मान केल्याबद्दल अन्वर इब्राहिम यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचे आभार मानले. अन्वर इब्राहिम म्हणाले की, आम्ही ज्या सामाजिक मुद्यांवर बोलतोय. त्यांच मुद्यांवर तुम्ही भाष्य केले.
मुंबई : "कबाली" या चित्रपटाचे निर्माते के. पी. चौधरी यांना ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलंगणातील हैदराबाद पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत हैदराबाद पोलीसांना निर्माते के. पी. चौधरी हे कोकेन विकत असल्याचे पुढे आले आहे. चौधरी यांच्यावर ड्रग्जची विक्री केल्याचा आरोप करत पोलीसांच्या विशेष पथकाने त्यांना ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडले आहे. जवळपास ८२.७५ ग्रॅम कोकेन या कारवाईत जप्त करण्यात आले असून २.५ लाखांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
सुपरस्टार रजनीकांत या आगामी चित्रपट 'जेलर' ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे
भारतीय चित्रपट सृष्टीत गेली ४ दशके दिलेल्या योगदानाबद्दल देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार
राजकारण कधी, कोणते आणि कसे वळण घेईल, हे खुद्द परमेश्वरही सांगू शकत नाही, असे जे म्हटले जाते, ते थलायवा रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्यापूर्वीच्याच ‘एक्झिट’मधून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
तामिळ जनतेची मागितली माफी
सुपरस्टार रजनिकांत यांना शुक्रवारी १० वाजता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून ते सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. सिनेमाच्या सेटवर काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रजनिकांत यांची २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेली कोरोना चाचणी करण्यात आली होती.
सुपरस्टार रजनीकांत करणार नव्या पक्षाची स्थापना
काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएएबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत : रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत आता मेन वर्सेज वाईल्ड या बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एपिसोड प्रचंड गाजला होता.
रजनीकांत यांच्याकडून अलीकडे जे वक्तव्य केले गेले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ होऊनही, आपल्या म्हणण्यावर ते ठाम राहिल्याने ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. दुसरी व्यक्ती आहे, ‘देशाचे तुकडे झाले पाहिजेत,’ अशी मनीषा बाळगून काम करीत असलेल्या टोळक्याचा सदस्य शरजील इमाम.
‘थलायवा’ म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ६९वा वाढदिवस.
संगमनगरी प्रयाग येथे बुधवारी एक आश्चर्यकारक प्रकरण उघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून एकजण यमुना नदीच्या पुलावर तिरंगा घेऊन उभा होता. ४८ तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पोलीसांनी सुरक्षित खाली उतरवले. दरम्यान, मी चांद्रयानाशी संपर्क व्हावा, म्हणून प्रार्थना करत, असल्याचा दावा त्याने केला आणि पोलीसही चक्रावले.
अभिनेता रजनिकांत याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना श्रीकृष्ण आणि अर्जूनाची उपाधी देत कौतूक केले आहे. चेन्नई येथे उपराष्ट्रपती व्यैकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी कलम ३७० च्या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे कौतूक केले.
करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारतर्फे प्रस्तावित ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाला सध्या सर्व स्तरांतून तसेच, कित्येक राजकीय पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे.