दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या कॅरिबियन किनार्यालगतच्या प्रवाळांवर समुद्राच्या वाढत्या तापमानाचा परिणाम झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. किनार्यालगतच्या प्रवाळांचे ‘कोरल ब्लीचिंग’ वाढत असल्याची माहिती ‘कोरालेस दे पाझ’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात समोर आली आहे. या संस्थेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिंकॉन डेल मार, पिको डे नॉफ्रागो आणि कँटो डेल मेरी शहरांजवळील कोस्टल प्रवाळ खडकांचे सर्वेक्षण केले होते.
Read More
मुंबईच्या किनाऱ्या लागत साकार होत असलेल्या 'कोस्टल रोड'च्या बांधकामामुळे बाधित होऊ घातलेल्या समुद्री प्रवाळांचे २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात स्थलांतर करण्यात आले होते. फाॅल्स पिलो आणि इतर सहा प्रजातींचे स्थलांतरण यावेळी करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रीविज्ञान संस्थेने कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात हे स्थलांतर केले होते.
आपल्या घरामागील अंगणात, एक परिसंस्था इतकी अद्वितीयआहे की ती आपल्या कल्पनेच्या मर्यादा तपासते. हे ऑस्ट्रेलियातील ‘ग्रेट बॅरियर रीफ’सारखेच वैविध्यपूर्ण आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यात आणि वातावरणातील कार्बन शोषून घेण्यात महत्त्वाची भूमिका असूनही, ‘आंग्रिया बँके’चा कोरल रीफ - आपल्याला क्वचितच माहीत आहे. याच ‘आंग्रिया बँक’ची माहिती देणारा हा लेख...
महराष्ट्रातील धोकाग्रस्त प्रवाळ 'कोरल' आणि संबंधित परिसंस्थांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यात येणार आहे. वनविभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने गुरुवारी दि. ९ सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ)ची या अभ्यासासाठी नियुक्ती केली आहे. या अभ्यासाद्वारे प्रवाळांचा पुनर्संचय कसा करता येईल यावर भर देण्यात येणार आहे.
समुद्राखालचे प्रवाळांचे जग हे विस्मयकारक आहे. प्रवाळांची ही परिसंस्था जटील आहे. कारण, ती समुद्राच्या डोहामधील अनेक जीवांना आश्रय देते. त्यांचे संरक्षण करते. परंतु, हवामान बदलाचे ग्रहण आता या प्रवाळांच्या परिसंस्थेला लागले आहे. या परिसंस्थेविषयी माहिती देणारा हा लेख.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावाने 'आंग्रिया बेट' प्रसिद्ध