Devendra Fadnavis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
Read More
काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. खरंतर महाराष्ट्रातल्या निवडणूक धामधुमीत महाविकास आघाडीकडून मुख्यंमत्रीपदाच्या शर्यतीत असणार हे नाव अशा इतक्या वर्षांपासून मतदारसंघावर पकड असणाऱ्या नेत्याला या निवडणुकीत एका सर्वसामान्य घरातून आलेल्या महायुतीच्या उमेदवाराने पराभूत केले.
(Shirdi Assembly Constituency Result 2024)राज्यातील लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर समोर आला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखेपाटील यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांचा ७० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे यापुढे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.
गोसेवा आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार लवकरच राज्यातील गोशाळा आणि पशुपालन करणाऱ्या सेवाभावी संस्थांना अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी विधानसभेत दिले. मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. २६ जानेवारीपासून ते बेमुदत उपोषण करणार आहे. यातच आता मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. मराठ्यांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण सुरु केले आहे. मुंबईतही हे सर्वेक्षण सुरु झाले असून महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जात हे सर्वेक्षण करत आहेत.
राज्यात स्वतंत्र तालुक्यांच्या निर्मितीसाठी होत असलेल्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक आहे. मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावी, याचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. तालुकानिर्मितीच्या अभ्यासासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
बोरिवली मधील ३० एकर महसुलाची जागा खादी ग्रामोद्योगाच्या नावाखाली एका ट्रस्टला दिली आहे. मात्र त्याचा तिथे खाजगी कारणांसाठी गैरवापर होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीचे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली. त्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ठोस कायदा केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लेखी उत्तरात दिली.
धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
लव्ह जिहाद पाठोपाठ आता 'लँड जिहाद' ने डोकं वर काढले असून या प्रकरणात दस्तरखुद्द प्रशासनातील काही मंडळी झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात उच्च स्तरावरून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे लेखी निवेदन राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यात नोकरभरती करण्यात येत आहे. राज्य शासनाने सदर भरती कंत्राटी पध्दतीने करण्याचे योजिले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
सरकारी नोकरीमध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे वागणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने जोरदार झटका दिला आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने थेट निलंबित केले आहे. या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय आदेशाप्रमाणे बदली होऊनही अधिकारी बदली स्वीकारत नसल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सौजन्य मात्र प्रशासन दाखवत नाही असा एक अलिखित नियम असल्याचेही बोलले जाते. मात्र, राज्य सरकारच्या महसूल विभागाने हा शिरस्ता बदलला असून बदलीचा निर्णय न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात कडक शिस्तीचा मेसेज देण्यात शासन यशस्वी ठरले आहे.
गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र काही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनवंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, शेवटी मुख्यमंत्री शिंदेना उपोषण स्थळी मी आणूनच दाखवलं. मुळात कुणाच्या सांगण्यावरून मी आंदोलन करत नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता फक्त शिंदेंमध्येच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्या
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर समाजाने ही आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने संतापलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अति पर्जन्यवृष्टीचा धाक, मनात असलेली धाकधूक आणि रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने उडालेली झोप अशा कारणांनी सध्या सर्वत्र टेकड्यांवर वसलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शहापूर तालुक्यातील कसारा गावाच्या रहिवाशांनादेखील या भीतीने ग्रासले आहे. शुक्रवारी सकाळी देऊळवाडी विभागातील रहिवासी रामचंद्र गुंडू भगत यांच्या घरावर भलामोठा दगड आल्याची घटना घडली. दगड इतक्या वेगाने आला की, थेट घराची भिंत तोडून घरात शिरला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संकट आजही घोंघावत आह
राज्य शासनाकडून तलाठी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक इच्छुक उमेदवारांना सर्व्हरमुळे अडथळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून या भरतीप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील तलाठी भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात विधानसभेत मागणी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण यासंदर्भात महसूलमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू, तसेच, याआधी एकदा मुदतव
मुंबई : राज्यात आता सरकारी शेतजमिनींवर लॉजिस्टिक पार्क्स उभी करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बैठकदेखील घेतली. दरम्यान, राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी असून या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच, महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट उभे करण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांमार्फत आराखडा तयार करण्याच्या स
पुणे : जी-२० परिषदेअंतर्गत डिजिटल इकॉनॉमीफ गटाची बैठक ११ ते १३ जूनदरम्यान पुण्यात होणार असून, या कालवाधीत दोन्ही पालख्या पुणे येथे मुक्कामी आहेत. बैठकीसाठी २५ देशांचे प्रतिनिधींना या अनुषंगाने पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. त्यासाठी पोलीसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.
मुंबई : मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता भासल्यास प्रचलित नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -२०२३ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडाचे ) मु
मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील व्यापऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. हिंदू व्यापाऱ्यांवर नाहक हल्ले केले जात आहे. कायदा-सुव्यवस्थाही बिघडत चालली होती. यापुढे हिंदू व्यापाऱ्यांना वाकड्या नजरेने पाहिले, तर डोळे जाग्यावर ठेवणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी व्यापाऱ्यांना भेट देत, व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
मुंबई :- अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील क्षेत्राला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील गारपीट नुकसानीची पाहणी करत बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून पंचनामे पूर्ण
फडणवीस-शिंदे सरकारचे नुकतेच झालेले पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्य सरकारची पुढील दीड वर्षांची वाटचाल कशी असेल आणि नेमक्या कुठल्या विकास योजना सरकार राबविणार, याची दिशा दर्शविणारे ठरले. सरकारने केलेल्या घोषणा, आणलेली विधेयके आणि केलेले संकल्प यामुळे पंचामृतरूपी ‘अर्थ’संकल्पाने मविआची कोंडी झाली.
महाराष्ट्र सरकारने नुकताच गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला असून राज्यात लवकरच गो सेवा आयोगाची स्थापना करण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवार, दि. २३ मार्च रोजी खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात महाराष्ट्र गो सेवा आयोग विधेयक विधानसभेत सादर केले आहे.
देशातील सर्वात मोठे 'महापशुधन एक्सपो २०२३ ' शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी हे महा एक्स्पो पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन,आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. २३ मार्च रोजी दिली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे उभारला आहे. तो स्व. मुंडे यांचा राज्यातील सर्वात मोठा पुतळा असल्याचे बोलले जात आहे. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित शनिवार दि. 18 मार्च रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, होणार आहे. दोन एकर परिसरातील ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक सोहळ्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेतील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेअंतर्गत गाय व शेळीगट वापटात झालेल्या भष्ट्राचाराचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मांडला. यावर उत्तर देताना मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) करण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद)उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
गायरान जमिनींवरील वादांवरुन सुरू असलेल्या विरोधकांच्या गोंधळाला आता सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलं आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या दोघांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहेत. या सर्वांनी विधीमंडळांच्या पायऱ्यांवर भजन किर्तन करत आंदोलन सुरू केले आहे. काही आमदारांनी फुगड्या घालत सरकारचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. गायरान जमिनींवरील प्रकरण बाहेर काढली तर हे आंदोलन करणारे अर्धेहून अधिक लोकं गायब होत
राज्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना आता लम्पी या आजाराने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
"महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाळू तस्करांच्या भल्यासाठी लोकांच्या जीवावर उठण्यापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मजल गेली होती आणि या सगळ्याला माजी महसूलमंत्र्यांचे आशीर्वाद होते'असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे
सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, चांगले वकिल का दिले नाहीत ?
राधाकृष्ण विखेपाटील यांची संजय राऊतांवर टीका
राज्याच्या कारभारातील महत्वाच्या निर्णयात विश्वासात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महसूल मंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर गुरुवारी मंत्री अशोक चव्हाणांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता भाजपकडून या प्रकरणी काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येला मुख्यमंत्र्यांच्या फसव्या घोषणा कारणीभूत असल्याचे परखड मत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले
विखे, क्षीरसागर, महातेकरांना न्यायालयाचा दिलासा
गृहनिर्माण मंत्र्यांचे सुतोवाच
मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यावेळी १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा शपथविधी पार पडला.
राधाकृष्ण विखेपाटील यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला. रविवारी सकाळी ११ वाजता त्यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार सकाळी ११ वाजता होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली
विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विखे पाटलांनी आपला राजीनामा मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. यासोबतच विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार व अमित देशमुख यांचे नावेही चर्चेत आहेत.
विरोधीपक्ष नेते पदाचा काँग्रेसने राजीनामा मंजूर केल्यानंतर विखे पाटलांनी लोणी येथे पत्रकार परिषद घेऊन मौन सोडले
अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा पाठवला
काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विखेंचा हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे बोलताना सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.