रोटरी क्लब ऑफ पालघरच्या पुढाकाराने बारामती येथे आयोजित ‘ग्रीन गोल्ड’ शेतकरी मार्गदर्शन शिबिरात पालघर तालुक्यातील केळवे, मासवण, मनोर आणि किराट या भागांतील २० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Read More
(National Shooter Sharayu More Accidental Death Baramati) राष्ट्रीय नेमबाज शरयू मोरे हिचे वयाच्या २२व्या वर्षी बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची ती कन्या होती. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
बारामतीतील एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे होत, पुढे समाजसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या अॅड. अक्षय गायकडवाड यांच्याविषयी...
(Baramati News) पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी १७ जुलैच्या रात्री उशिरा एका बँक मॅनेजरने बँकेच्या शाखेतच गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशंकर मित्रा असे या बँक मॅनेजरचे नाव आहे. मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमध्ये मित्रा यांनी म्हटले आहे.
राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणे गरजेचे असून बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी केले.
(Ajit Pawar) महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे
(Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
’झी नाट्यगौरव २०२४’मध्ये प्रायोगिक विभागातून साहाय्यक अभिनेता होण्याचा मान मिळवणार्या, बारामतीच्या सोमनाथ लिंबारकर यांच्या नाट्यप्रवासाविषयी...
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला. बारामतीच्या सूरज चव्हाणने शब्द दिल्याप्रमाणे ट्रॉफी गावाकडे आणलीच. दरम्यान, या घरात त्याने तयार केलेली नाती आजही कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने विजेत्या सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य त्याला भेटायला गेले होते. यादरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर ती भेट झाली आहे.
बारामती विधानसेभेचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अशाच एका सभेत आता कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
( Sharad Pawar - NCP ) "हा प्रश्न भावनेचा नसून हा तत्वाचा आहे, गांधी, नेहरू आणि यशवंतराव चव्हाण तसेच शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी काम करणारा आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोयं त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. महाराष्ट्राची सत्ता सामान्य माणसासाठी सत्ता हातात घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा, आपल्याला सामाजिक क्षेत्रात आणखी काम करायचे आहे," असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या ५२ मनिटांच्या भाषणात शरद पवार यांन
Sharad Pawar vs Ajit Pawar बारामती विधानसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. काका विरूद्ध पुतण्या अशी टफ फाईट होणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. बारामतीत दि: २८ ऑक्टोबर रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत दिसणार आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या यांच्यात थेट लढत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना मैदनात उतरवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकीतही बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. युगेंद्र पवार यांनी आपल्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली असून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे, अजित पवारांचे पूत्र जय पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असून यात बारामतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत बारामतीतून कोणता उमेदवार असणार? असा संभ्रम निर्माण झाला असताना आता अजित पवार हेच बारामतीतून लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. परंतू, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु केल्याची माहिती पुढे आली होती. तर दुसरीकडे, अजित पवारांनी गुरुवारी आपला मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार हा जोरदार सुरू आहे. कोट्यवधी महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. ही योजना सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. या योजनेवरुन आता मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. तसेच या योजनेची जागृती इतर कुठल्याही योजनेपेक्षा अधिक वेगाने झाली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासही सुरुवात केली असून त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
बारामती लोकसभेचा कौल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युगेंद्र पवार यांची बारामती कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत.अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटला. या संघर्षात दादांचे बंधू श्रीनिवास यांनी शरद पवार आणि सुप्रिया यांची साथ दिली. त्यांचे पूत्र युगेंद्र या सर्वात आघाडीवर होते. त्यांनी बारामती विधानसभेचा कोपरान् कोपरा पिंजून काढत सुप्रिया सुळें
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली असून यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. बारामतीत यंदा सुप्रीया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार याठिकाणी सध्या सुप्रीया सुळे आघाडीवर दिसत आहेत.
भाजपचे सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचे की भाजी, तेच सांगतील, असे मी म्हणजे तुमचा आदूबाळराजे म्हणतो. आपल्या मॅडम, आपले बारामतीचे साहेब जे जे म्हणतात ना, तेच म्हणालो. जसे भाजपला संविधान बदलायचेय, मुंबई तोडायची आहे, भाजपला लोकशाही नको वगैरे वगैरे. लोकांची पण कमाल आहे. आपण त्यांच्या जिवावर इथे दुसरी ‘मातोश्री’ बांधली आणि आवाज कुणाचा म्हणणारे ते कार्यकर्ते मुंबईतली घरे विकून मुंबईबाहेर गेले. जाऊ दे. आपले नवीन मतदार आहेत ना? सलामलेकुम!
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. मतदान केल्यानंतर त्या अजितदादांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मंगळवारी लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असून शरद पवारांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी अनेक दशकांनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून मतदान केले आहे. शरद पवारांनी माळेगाव येथील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कुल येथील मतदानकेंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
महाराष्ट्रात आज (मंगळवार) लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्याकरिता ११ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यापैकी बारामती, सांगली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांच्या नजरा खिळून आहेत. या मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. निवडणूकीमध्ये अजित पवार गटाने पैसे वाटले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्यासोबत माझी आई आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदानानंतर अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यावरून आता माझ्यासोबत माझी आई आहे असं म्हणत अजितदादांनी त्यांना सुनावलं आहे.
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडलं. या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. यापैकी बारामतीमध्ये सर्वात कमी तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
लवकरच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून यामध्ये बहुचर्चित बारामती लोकसभेचाही समावेश आहे. दरम्यान, अनेक दशकांनंतर शरद पवार या मतदारसंघातून मतदान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बारामती लोकसभेत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची नक्कल केली आहे. तसेच बारामतीकर ही नौटंकी सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
लग्न झाल्यावर बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये, असा खोटक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते सध्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आहेत.
बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला. इतकी वर्षे अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु कोणालाच या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता आला नाही. मात्र, यंदा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या लोकसभा मतदारसंघातील हवा पूर्णतः पालटलेली दिसते. पवारकन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे चुलत बंधू अजित पवार आता पूर्ण ताकदीने त्यांच्या विरोधात उतरले आहेत.
माझी ही वैयक्तिक लढाई नसून विचारांची लढाई आहे, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेसाठी गुरुवारी अर्ज दाखल केला. त्याआधी सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.
बारामती लोकसभेच्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रचारार्थ सभाही आयोजित करण्यात आली होती.
बारामती लोकसभेत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. मात्र, आता या लढाईत एक नवीन ट्विस्ट आला आहे. बारामती लोकसभेतून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्ज भरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी निवडणूकीसाठी डमी अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे.
बारामतीमध्ये परिवर्तन करण्याची वेळ आली असून आता अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. गुरुवारी बारामतीतील महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे येथे आयोजित महायूतीच्या सभेत ते बोलत होते.
सुनेला पाठवा दिल्लीत आणि लेकीला राहूद्या गल्लीत, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचें नाव न घेता लगावला आहे. गुरुवारी महायूतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्या प्रचारार्थ पुण्यात महायूतीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
विजय शिवतारेंनी निवडणूकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना रात्री फोन आले असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच नुसती संसदेत भाषणं करुन बारामतीचा विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते.
बारामतीतील १०० टक्के कामं मी केलेली आहेत. परंतू, काहींनी स्वत:च्या पुस्तकात हे आम्हीच केलं आहे, असं दिलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंना तर महायूतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत दोन्ही पवारांविरुद्ध दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता. मात्र, आता त्यांनी या निवडणूकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शिवसेना माजी मंत्री विजय शिवतारे यांची उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत बारामती लोकसभा जागेबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविणार अशी ठाम भूमिका मागील काही दिवसांपासून घेतली होती.
शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे Vijay shivtare Baramati यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
निव्वळ सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. त्यांनी सोमवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडेन, असे विधान शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी केले आहे. विजय शिवतारेंनी बारामतीतून पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. ते शनिवारी इंदापूर दौऱ्यावर असून त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay shivtare Baramati ) यांनी मी कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास तयार आहे. असं म्हटलं आहे. हे बंड नसुन मतदारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी ही निवडणुक लढवत आहे. असंही विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
काही वृत्तवाहिन्या मी माघार घेतल्याची बातमी प्रसारित करीत असून ती बातमी खोटी असल्याचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी म्हटले आहे. विजय शिवतारेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबतच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे.
माझा आवाका सांगणाऱ्या अजित पवारांना आता माझा आवाका कळेल, असा इशारा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारेंनी अजित पवार आणि शरद पवारांविरोधात दंड थोपटले असून बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. यानिमित्ताने त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.