( Panvel RTO office shifted to Kharghar ) सध्या कळंबोली येथील इमारतीतून कार्यरत असलेले ‘पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय’ (आरटीओ) एप्रिलमध्ये खारघरच्या सेक्टर-३६ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृह विभागाने गेल्या आठवड्यात अधिकृत आदेश जारी करून या स्थलांतरासाठी प्रशासकीय आणि आर्थिक आवश्यकतांना मान्यता दिली आहे.
Read More
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात ९ डिसेंबर २०२४ रोजी भीषण अपघात ( Kurla Bus Accident ) घडला होता. त्या बस अपघाताच्या जखमा अजुनही ताज्या आहेत. या अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बस चालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच संजय मोरेचा परवाना रद्द करण्यासाठी आरटीओने प्रक्रिया सुरु केली असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ठाणे : दुचाकी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या आरटीओच्या ( RTO ) परीक्षेत अनेकजण गर्भगळीत होतात. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून शिकाऊ दुचाकीस्वार या सिम्युलेटरवर सराव करीत आहेत. युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात १३७५ दुचाकीस्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन घेतेवेळी दि.०३ जुलै २०२४ ते दि.२१ जुलै २०२४ या कालावधीत पथकारातून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असेल अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिली. याघटनेवर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने घटनास्थळाची पाहणी करत चौकशीचे आदेश दिले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. एवढंच नाही तर खासगी ट्रॅव्हल्सने किती दर आकारावेत याचे दरपत्रकही जारी केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांच्या खिसेकापीला ब्रेक लागणार आहे.
पुणे आरटीओने ७०९ शालेय बसेसची तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान १७८ शालेय बसेसवर नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. शालेल बसेसची तपासणी करण्यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आला आहे. या स्कॉडकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
‘आरटीओ’ पुणे येथे कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव ज्ञानदेव भोर हे ‘वन्यजीव छायाचित्रकार’ म्हणून राष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण करणारे छायाचित्रकारदेखील आहेत. हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वाचकांना सुखद आश्चर्याचा धक्का न बसेल तरच नवल!
पुणे : जी २० निमित्त आरटीओ परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर काही व्यावसायिक आणि पथारी धारकांनी हल्ला करीत मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. या सर्व घटनेचा पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे.
नाशिक : शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर उभारण्यात आले. काही ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर केले गेले. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होत असली तरी अशास्त्रोक्त गतीरोधकांमुळेच अपघातही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ते पाहता महापालिका शहरात स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा नाही याबाबत फेरसर्वेक्षण करणार आहे.
नाशिक शहरातील प्रवासवाहिनी असलेली आणि महापालिकेच्या सेवेतील शहर बस सेवा ‘सिटीलिंक’ च्या कर्मचार्यांनी नुकत्याच केलेल्या संपामुळे नाशिककरांचे गुरुवारी अतोनात हाल झाले. शहरात ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवे’साठी ’सिटीलिंक’ वगळता अन्य कुठलाही पर्याय नाशिककरांसमोर नाही. त्यात विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठांना संपाचा मोठा त्रास सहन करावा लागला. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘सिटी लिंक’चे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव नाही. मध्यंतरी प्रवासी संख्या प्रचंड रोडावल्याने ‘सिटीलिंक’ला प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यातून सावरत
डोंबिवली शहरात रिक्षा मीटर पद्धतीने सुरू कराव्यात,अशी गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना आणि प्रवासी मागणी करीत आहेत.
अनिल परब, भागीदार सदानंद कदम, सचिव बजरंग खरमाटे यांचा कोट्यवधी रुपयांची लाच, बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत २६ मार्च : चला दापोली अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया! म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांच्यावरही आयकरची धाड पडली आहे.
वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी वाहनाची ठराविक वयोमर्यादा संपल्यानंतर आरटीओकडे ग्रीन टॅक्स (हरित कर) भरून वाहनाचे पूर्ननोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, हा कर भरण्याकडे अनेक वाहनमालक दुर्लक्ष करताना दिसतात.
वाहन चालवण्याचा पक्का परवाना काढण्यासाठीची परीक्षा आता सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारीदेखील देता येणार आहे. कोरोना काळात पक्के परवाना काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आगीमध्ये ९ वाहने जळून खाक
केंद्र सरकारने सुरु करण्यात आलेल्या योजनेनुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या ३५० रुपयात मिळणार आहे आणि तेही घरपोच.
परिवहन विभागाकडून २८ मोटार वाहन निरिक्षक व ९ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बर्याचदा वाहनधारकांना रोखल्यानंतर वाहनाच्या मूळ कागदपत्रांची मागणी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकार्यांकडून केली जाते.