( Minority Schools in Mumbai ) मुंबई शहरामध्ये अल्पसंख्याक शाळांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवलेल्या अनेक शाळा व्यवस्थापनांकडून अल्पसंख्याकांसाठीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. अल्पसंख्याक शाळांना शैक्षणिक अधिकारानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही. त्यामुळे आरटीईसारख्या कायद्यातून सुटका व्हावी यासाठी ही शक्कल लढवल्याने दरवर्षी अल्पसंख्याक शाळांचा आकडा वाढत आहे.
Read More
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवार दि. १७ मे पासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या प्रवेशाची अंतिम मुदत शुक्रवार, दि. ३१ मेपर्यंत असणार आहे.
ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.