गेल्या आठवड्यात ‘इंडी’ आघाडीतील जवळपास सर्वच घटकपक्षांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध केल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्ते व नेत्यांना ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या छुटभैया नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करा, आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच राहणार आहे, असा स्पष्ट सल्ला दिला होता. यावरून काँग्रेस आता घटकपक्षांना महत्त्व देणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, यामुळे ‘इंडी’ आघाडीमध्ये मतभेद सुरूच राहणार असल्याचे दिसून येते. त्याचवेळी प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यामध्ये वेगळी चूल मांडण्याचाही निर्णय घेतील
Read More
(Jharkhand) “जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस हे झारखंडचे तीन मोठे शत्रू आहेत. हे शत्रू झारखंडवासीयांनी लवकर ओळखल्यास झारखंडचा भाग्योदय निश्चित आहे. झारखंडनिर्माणाचे उट्टे आजही आरजेडी झारखंडकडून फेडत आहे आणि काँग्रेस झारखंडचा शत्रू आहेच,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
Muhammad Izhar Asfi बिहार येथील किशनगंज येथील कोचाधामन येथील राष्ट्रीय जनता दलाचे कट्टरपंथी आमदार मुहम्मद इझार आसफींनी एका शिक्षकाला धमकी दिली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत कट्टरपंथी आमदार मुहम्मदने शिक्षकाला धमकी दिली की तुरूंगात टाकू, तुला माहिती आहे का, तुरूंगातील ९० टक्के लोकं ही आमची आहेत. तुला तुरूंगातच त्रास द्यायला सांगू, अशी धमकी मुहम्मद इझार असीफने दिली.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आर्म्स ऍक्ट प्रकरणात त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदर प्रकरण दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असून यात लालू यादव यांच्या नावाने शस्त्रे खरेदी करण्यात आली होती. तसेच, शस्त्रे वेगवेगळ्या ठिकाणी पुरविण्यात आली होती.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी सरस्वती देवीवर आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालू यादव यांच्या पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी माता सरस्वती आणि ब्रह्मदेवाच्या नात्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू यादव यांचे पक्ष सरकार चालवत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आहेत. सुधाकर सिंह हे तेजस्वी यादव यांच्या पक्ष आरजेडीचे आमदार आहेत, ते पहिले मंत्रीही होते. आता ते नितीशकुमार यांचे कट्टर विरोधक आहेत.ते नितीश कुमारांना घेरून राहतात. यावेळी नितीश कुमार यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याची युक्ती उघड केली. शेतकऱ्यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी स्वतांचे डोके फोडू नये, तर अधिकाऱ्यांवर थुंकले पाहिजे, असे शेतकऱ्य
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना १९९५ मध्ये मशरख, छपरा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
बिहारची राजधानी पाटना येथील कंकड़बाग येथे असलेल्या 'अटल बिहारी वाजपेयी पार्क'चे आता 'कोकोनट पार्क' असे नामकरण करण्यात आले असून राज्याचे पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार अनेकदा माजी पंतप्रधान अटल बिहारींना 'पूज्य अटलजी' म्हणून संबोधित करतात.त्यांची प्रशंसा करतात. मात्र या घटनेने त्यांची बेगडी श्रद्धा लोकांसमोर आली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आहे, ज्यामध्ये आरजेडी-जेडीयू-काँग्रेसचा समावेश आहे. केंद्रात विरोधी पक्ष असूनही नितीश कुमार यांन
बिहारमध्ये पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच परीक्षार्थी आणि शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता. आता वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर बिहार पोलिसांनी गोळीबार केला आहे. कटिहारमध्ये पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भाजपने नितीश कुमार यांची तुलना जनरल डायरशी केली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थांच्या कथित गैरवापराबाबत विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ १४ विरोधी पक्षांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यासारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत १४ राजकीय पक्षांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी दि. ५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
बिहार हे एक उदाहरण आहे. मात्र, देशातील काँग्रेसह जवळपास सर्वच प्रादेशिक-कौटुंबिक पक्ष अद्याप आपला ‘इगो’ सोडण्यास तयार नाहीत. हा ‘इगो’ म्हणजे काहीही झाले तरी जनता आम्हाला स्वीकारणारच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र घराणेशाही-भ्रष्टाचार-राष्ट्रीय हितांना बाधा हे गृहीतक जनतेसमोर अतिशय स्पष्ट शब्दात मांडले आहे. त्यामुळे अन्य पक्षांनी या बदलत्या प्रवाहांचा विचार न केल्यास भाजपसाठी मैदान मोकळे असण्याची स्थिती निर्माण होण्यास फार वेळ लागणार नाही.
भाजपसारख्या जुन्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसून आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणाऱ्या नितीश कुमार यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे
आरजेडीचा सत्ताकाळाला जंगलराजची उपमा देणाऱ्या नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आणि लालूंच्याच भाषेत सांगायचे झाल्यास नितीश यांनी सपाप्रमाणे कात टाकून भाजपची साथ सोडली. आता नितीश लालूंचा आरजेडी, कॉंग्रेस आणि निवडणुकीच्या आखड्यात मरणासन्न अवस्थेत असलेल्या डाव्यापक्षांसी संसार थाटणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आले. त्यात भाजप मित्र पक्षांना संपवतोय असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत भाजपवर केला. सध्या देशातील मोदी विरोधकांना नितीश यांच्या रूपाने मसीहा मिळाल
ठरावीक काळानंतर आपल्या सहकारी पक्षांविषयी उफाळून येणार्या असुरक्षिततेने नितीश कुमार यांना बेभरवशी राजकारणी बनविले आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची सरकारमधील वाढती पकड आणि लोकप्रियतेमुळे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत युती केली होती. त्याचप्रमाणे यावेळी भाजपचा वाढलेला जनाधार पाहून त्यांनी राजदसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे ही अनाकलनीय वृत्ती नितीश कुमार यांच्यासाठी आता राजकारणामध्ये मोठा ‘स्पीडब्रेकर’ ठरली आहे.
केंद्रशासित प्रदेश अर्थात लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आहेत मोहम्मद फैजल. पण, त्याच्या अनोख्या प्रतापांकडे पवार साहेबांचे लक्ष कधी जाणार, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण, खा. मोहम्मद फैजल आणि त्यांचा पुतण्या अब्दुल रज्जाक या दोघांविरूद्ध टूना मासळी घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे
भाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, या खेपेला त्यांची राजकीय शक्ती फारच कमी झालेली दिसून येते आणि नेमकं याच कारणांनी जदयुचे ‘ते’ १७ आमदार नाराज आहेत. तेव्हा, बिहारमधील या राजकीय रणकंदनाचा आढावा घेणारा हा लेख...
रालोआच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पाहता काँग्रेसने ओवेसींवर केलेला ‘व्होटकटवा’ हा आरोप निरर्थक ठरतो व भाजप आपल्या जोरावर तिथे मजबूत असल्याचे समजते. तसेच एमआयएमने महागठबंधनशी हातमिळवणी केली असती तरी तिथे रालोआचेच उमेदवार जिंकले असते, हेही दिसून येते.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र चालवून आपले मनसुबे पूर्ण करण्याचा विचार देशातील काही भागात सुरू आहे. त्यांना मी नव्हे तर जनताच इशारा देईन. निवडणूका होत असतात, जय - परायजय सुरूच असतो; मात्र हा मृत्यूचा खेळ आता चालणार नाही, असा निर्वाणीचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नाव न घेता बुधवारी, दि. ११ नोव्हेंबर रोजी दिला. यामुळे आता बंगालमध्ये सत्तापरिवर्तन करण्याच्या भाजपाच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे.
दुपारी १२ पर्यंत भाजपच्या नावावर अंदाजे ७३ जागांवर आघाडी
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात जामीन मिळाला आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात सुरु होते उपचार
नितीशकुमार व भाजप यांची युती होईल की नाही, याबद्दल थोडे दिवस संभ्रम होता. पण नितीशकुमारांनी मोदी सरकारने केलेल्या ‘नागरिकत्व दुरूस्ती कायद्या’ला पाठिंबा दिला व यातून मी भाजपशी युती करायला तयार आहे असा संदेश दिला. अर्थात, आजच्या स्थितीत नितीशकुमारांसमोर तसा पर्यायच नव्हता. आता ते पुन्हा राजद व काँग्रेसशी युती करू शकत नाही.
पक्ष कार्यकर्ते म्हणतात 'वर्ल्डकप पाहण्यासाठी गेले असावेत'
देशभरात चौथ्या टप्प्यात मतदान होत असून झारखंडमध्ये संथ सुरुवात झाल्याचे दिसत आहे
झारखंडमध्ये मतदानाला संथ सुरुवात झाली पण दुपारपर्यंत पार केला ४०चा आकडा
नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्णय घेतला
चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.