( Chief Minister Devendra Fadanvis on RERA fraud case ) ‘रेरा’ फसवणूक प्रकरणी त्या ६५ बांधकामांमधील एकाही रहिवाशांला बेघर होऊ देणार नाही. खोटे कागदपत्रे सादर करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना फसवले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी अधिवेशनात जाहीर केले.
Read More
नागपूर : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात ( RERA Scam ) सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'द्वारे केली.