कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन १वर पेपर क्यूआर तिकीट प्रणाली यशस्वीपणे सुरू केली आहे. ही नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन प्रणालीचे अद्ययावतीकरण करून साकारण्यात आली आहे, जे नव्या गरजांना पूरक आहे.
Read More
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या व्यवहार स्थगितीला पुढे ढकलले आहे. आरबीआयकडून या संदर्भात सूचनाही जारी करण्यात आलेली आहे. वन ९७ कम्युनिकेशनस मालकीच्या पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईत कुठलीही सवलत आरबीआयकडून देण्यात आलेली नाही. केवळ व्यवहार, देवाणघेवाणीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने प्रश्न उत्तर ( एफ ए क्यू) प्रसिद्ध केले आहे. यात सांगितल्याप्रमाणे यापुढे पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात कुठलाही पैसा जमा करण्यास आरबीआयने मज्जाव केला आहे. यानुसा
आज राखी पौर्णिमा म्हणजेच बहीण-भावाच्या प्रेमाचा सण. आजच्या दिवसात घरोघरी रक्षाबंधन साजरे केले जात असते. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून आपलं नातं अतूट बनवत असते, तर भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो.
तुम्ही घेतलेले औषध खोटे आहे, असे तुम्हाला कधी वाटते का? आता तुमची ही भीती दूर होणार आहे. कारण, आजपासून (१ ऑगस्ट) केंद्र सरकारने 300 औषधांवर QR कोड लावण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मा कंपन्यांना कठोर आदेश दिले आहेत. त्यानुसार देशातील टॉप ३०० औषधी ब्रँड्सना त्यांच्या औषधांवर क्यूआर कोड किंवा बार कोड टाकणे अनिवार्य झाले आहे, ज्याचे स्कॅनिंग केल्याने तुम्हाला तुमच्या औषधाबद्दल बरेच काही कळू शकेल.
घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी आहे. आता, इमारतींच्या जाहीरातींमध्ये QR Code बंधनकारक असणार आहे. 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक करण्यात येणार आहे. मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे.
वाहनांत इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी ‘क्रेडिट’ किंवा ‘डेबिट कार्ड’ने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल पे’ने तसेच ‘पेटीएम’ने असे पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यांना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते. त्याविषयी...