नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी जस्टिन ट्रूडो सरकार ( Trudeau government ) बॅकफूटवर आले आहे. कॅनडाच्या सरकारने निज्जर हत्याकांडात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांचा कोणताही संबंध किंवा पुरावा नसल्याचे मान्य केले आहे. ट्रूडो सरकारने हा आरोप करणाऱ्या कॅनडाच्या प्रसारमाध्यमाचा दावा फेटाळून लावला आहे.
Read More
(India ) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वर्तमानपत्रातील दहशतवादी निज्जरच्या संबंधातील वृत्त फेटाळून लावले. मंत्रालयाने अशा अहवालांना हास्यास्पद म्हटले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या मृत्यूमुळे भारता आणि कॅनडा या देशांमधील तणाव वाढत असताना, या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. कॅनडाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांच्या मते निज्जर याची हत्या रिपुदमन सिंग मलिक याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झाली होती.
(India-Canada Diplomatic Row)हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे पुन्हा भारतावर बिनबुडाचे आरोप करत, भारताच्या कॅनडामधील राजदूतांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि सर्व अधिकार्यांना पुन्हा मायदेशी बोलावले आहे.
निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याला कॅनडाच्या संसदेत श्रद्धांजली वाहिली जाते, त्याच्या स्मरणार्थ मौनही पाळले जाते, हे सर्वस्वी धक्कादायकच! कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारताशी नव्याने संबंध प्रस्थापित करण्याची गरज इटलीत व्यक्त करतात आणि मायदेशी परतल्यानंतर त्याविरोधात भूमिका घेतात. यातूनच कॅनडाचा दुटप्पीपणाच अधोरेखित होतो.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या आरोपांबाबत कॅनडा सरकारकडून पुरावे मागितले आहेत.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव पुन्ही एकदा वाढण्याची शक्यता आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसंदर्भात ट्रुडो यांच्या आरोपांवर पुन्हा एकदा पुरावे मागितले आहेत.
तात्कालीक राजकीय फायद्यासाठी कॅनडामध्ये खलिस्तान्यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षेचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, असा आरोप कॅनडियन – भारतीय संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रितेश मलिक यांनी केला आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे.
मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका फुटीरवादी नेत्याने दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर खलिस्तानी नेटवर्कच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हवालाद्वारे मणिपूरमधील दंगेखोरांना पाठवण्यात आले.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा भारतीय एजन्सींवर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो एका नव्या अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. ९-१० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान ट्रूडो ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्याचा दावा एका माजी भारतीय राजनयिकाने केला आहे.
कॅनडा हा भारतातील सर्वांत मोठ्या पाच गुंतवणूकदारांपैकी एक आहे. भारतासोबत वाकड्यात शिरून आपण चूक केल्याचे कॅनडाच्या लक्षात आले आहे. अमेरिका भारत आणि कॅनडामधील संबंध पुर्नप्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने कूटनीतीचा प्रभावी वापर करून कॅनडासोबतच पाश्चिमात्य देशांनाही संदेश दिला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हरदीपसिंग निज्जरच्या विरोधात तयार केलेल्या डॉजियरमध्ये निज्जरच्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली आहे.
सध्या भले कॅनडात भारतविरोधी शक्तींना बळ मिळत असले, तरीही एकेकाळी कॅनडाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. १८५८ मध्ये दोन्ही देशांच्या ऐतिहासिक संबंधांना सुरुवात झाली. दोन्ही देश ब्रिटिश राजवटीखाली असल्याने अनेक ब्रिटिश भारतीय सेनेचे माजी सैनिक नव्या जीवनशैलीच्या शोधात कॅनडात स्थायिक झाले.
कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव वाढला असून, त्याचा परिणामही दिसून येत आहे. महिंद्राने कॅनडातून आपला व्यवसाय बंद केला.त्यामुळे बाजार अजूनही या धक्क्यातून सावरत असतानाच एक बाब समोर आली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी कोणत्याही पुराव्यांविना भारताविरुद्ध लावलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत. दोन्ही देशांनी उच्चपदस्थ राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. यातच आता नवा खुलासा झाला आहे. कॅनडाने भारतीय राजनयिकांचे कॉल टॅपिंग केल्याचा, दावा कॅनडाच्या सरकारी मिडीयाने केला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला चांगलच सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्रालय म्हणाले की, "कॅनडाने भारतावर केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरशी संबंधित कोणतीही माहिती आमच्याशी शेअर केलेली नाही. कॅनडाने केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत."
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या सगळ्यावर आता काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरोधात वक्तव्य केले होते. याशिवाय, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर कॅनडाने एका भारतीय राजनयिकाला देश सोडण्याचा आदेश दिला आहे.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान २ जुलै रोजी वाणिज्य दूतावासाला आग लावण्यात आली होती. या घटनेत दूतावासाचे फारसे नुकसान झालेले नाही. अमेरिकेने याचा तीव्र निषेध केला आहे. यापूर्वी मार्चमध्येही सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता.
नवी दिल्ली : कॅनडामध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे या पंजाबबहुल शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारामध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.