अफगाणिस्तानमधील दहशतवादाचे चित्रीकरण करताना दहशतवाद्यांकडून हत्या झालेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांना सोमवारी मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे
Read More
जुलै २०२१ मध्ये दानिश सिद्दिकी ‘रॉयटर’चा प्रतिनिधी म्हणून ‘अफगाण नॅशनल आर्मी’सोबत अफगाणिस्तानात, कंदाहार परिसरात, स्पिन बुलदाक या गावात गेला होता. तिथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांची चकमक झाली, त्यात सैनिकांबरोबर सिद्दिकीसुद्धा जखमी झाला. या जखमी लोकांनी गावातल्या एका मशिदीत आश्रय घेतला. पण, तेवढ्यात तालिबानी गनीमही तिथे पोहोचले. दानिश हा पत्रकार आहे, हे कळूनही तालिबान्यांनी इतर सैनिकांसह त्यालाही गोळ्या घातल्या.
काश्मीरातील बारमुला जिल्ह्यात सोपेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या भागात हल्ला चढवला होता. या दरम्यान, गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा तीन वर्षांचा नातू आपल्या आजोबांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळाला नाही. धीटपणे तो तिथेच बसून राहीला, काहीकाळ त्याने आपल्या आजोबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्यानंतर आजोबांच्या मृतदेहावर तसाच बसून राहिला. गोळीबाराच्या आवाजात न डगमगता तिथेच बसून राहिला. जवानांनी त्याची तिथून सुटका केली.
कुठल्याही ठिकाणी घडत असलेला वादंग, संकट किंवा आणखी काही गोष्टी प्रकरणे, प्रसार माध्यमे आणि पत्रकारांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करत असतात. तिथल्या वार्तांकनासाठी त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळत असते. भारतात जम्मू काश्मीरसारखी दुसरी जागा किंवा ठिकाण असल्या वृत्तांकानांसाठी असूच शकत नाही.
तीन भारतीय छायाचित्रकारांना पत्रकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तिघेही जम्मू काश्मीरचेच रहिवासी आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या वार्तांकनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यासीन डार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद याना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हे तिघेही एपी या वृत्तसंस्थेसाठी काम करतात.
जगभरात माध्यमांवर असे अनेक भ्याड हल्ले झाले. पण, असा क्रूर हल्ला यापूर्वी माध्यमांनी, जगानेही कधी पाहिला नव्हता आणि परवा याच वृत्तपत्राला वृत्तांकन आणि पत्रकारांनी दाखवलेल्या धाडसासाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.