काल संध्याकाळी राम मंदीर, अलिबाग येथे 'शेवटचं पान' ही स्वरचित कवितांची मैफिल संपन्न झाली. शिवानी, प्रतिक व अनिकेत या अलिबागमधीलच काही स्थानिक तरुणांनी ही मैफिल आयोजित केली होती. 'कलेला वाव देणारं, मनाचा ठाव घेणारं - तुमच्या आमच्या वहीचं, सर्वात खास, शेवटचं पान' हे शीर्षक असलेलं आकर्षक पोस्टर रसिकजनांचं लक्ष वेधून घेत होतं. तरुणांनी या मैफिलीचं आयोजन केल्यामुळे प्रेम, पाऊस, रात्र, समुद्र अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या कविता सादर करण्यात आला. शिवाने दामले यांच्या एका कवितेला तर वन्स-मोर देखील मिळाला.
Read More