जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Read More
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आजही या तीनही गरजांची पूर्तता होण्याकरिता नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. काही सरकारी योजना या प्रभावीपणे राबविल्या तर नागरिकांनादेखील सुसाहाय्यता प्रदान होत असते. याचा प्रत्यय नुकताच अकोले तालुक्यातील फोफसंडी या गावात आला आहे. येथील सोमनाथ घमाजी वळे यांना ‘पंतप्रधान आवास योजने’तून घरकुल मिळल्याने त्यांचा वनवास आता संपुष्टात आला.
डॉ. जितेंद्र चतुर्वेदी हे मूलभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित असलेल्या जंगलप्रदेशातील नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे अग्रगण्य ठरावे, असेच व्यक्तिमत्व.