अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात, इंदिरा पॉइंटच्या आग्नेयेला 52 सागरी मैलांवर समुद्रात अडकलेल्या ‘सी एंजेल’ या अमेरिकी नौकानयन बोटीसाठी भारतीय तटवर्ती दलाने (आयसीजी) बचाव मोहीम हाती घेऊन बोटीसह त्यातील कर्मचाऱ्यांना वाचवले.
Read More
PM Modi Diwali : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच भारताच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिकारीदेखील देशाच्या सीमावर्ती भागात तैनात सैनिक आणि अधिकाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान पोर्ट ब्लेअरमधील अंदमान आणि निकोबार कमांडमध्ये तैनात असलेल्या सैन्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
Shri Vijaypuram केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेयर असे नाव होते. मात्र आता या राजधानीचे नामांतरण करत श्रीविजयपुरम असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. श्रीविजयपुरम हे नाव ठेवण्यामागे त्यांनी कारण सांगितले आहे. ते म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंदमान आणि निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यता आणि इतिहासात बेटाला महत्त्व आहे.
मोदी सरकारने गुलामगिरीचे आणखी एक चिन्ह पुसून ‘पोर्ट ब्लेअर’ (Port Blair) चे नाव बदलून ‘श्री विजयपूरम्’ असे केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (२८ मे) १४१ वी जयंती. आणि याच निमित्ताने अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट दिऊन सावरकरांना वंदन केले. सध्या रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरच म्हणतात, ‘तू धैर्याची अससी मूर्ती। माझे वहिनी माझी स्फूर्ती॥’ अशा या खुद्द स्वातंत्र्यवीरांची स्फूर्तिदेवता होत्या, त्या त्यांच्या वहिनी, येसूवहिनी... येसूवहिनींचे कार्य, त्यांचे धैर्य, शौर्य, त्याग, मातृभूमीनिष्ठा सादर करणारे सांगीतिक अभिवाचन म्हणजे ‘मी...येसूवहिनी’. सुमारे ११० मिनिटांचा हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम ‘समिधा-पुणे’तर्फे सादर केला जातो. त्याविषयी...
जगात केवळ नारकोंडम बेटावर आढळणाऱ्या नारकोंडम धनेश (narcondam hornbill) पक्ष्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी, या पक्ष्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पक्षी नारकोंडम बेटावर प्रदेशनिष्ठ आहे (narcondam hornbill). त्यामुळे भविष्यात या प्रजातीला रोगप्रसारासारख्या कारणांमुळे नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी 'संवर्धन प्रजनन कार्यक्रम' (कॉन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम) राबवण्याचा पर्याय संशोधकांनी सुचवला आहे. (narcondam hornbill)
१९२९ ते १९३६ या काळात बंगालमध्ये क्रांतिकारक तरुणांनी इंग्रज सरकारविरुद्ध जो लढा उभारला होता, त्यात अनेकांना सेल्युलर तुरुंगाची हवा खावी लागली, अशा काही देशभक्तांच्या या कहाण्या.
हवामान आणि वातावरणीय बदलांचा पृथ्वीवरील जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कित्येक संशोधनातून सिद्ध झाले आहेच. प्राणी, पक्षी तसेच फुलांवरही हवामान बदलाचे असे विपरीत परिणाम दिसून येतात. मग रंगीबेरंगी आणि लक्षवेधी ऑर्किड्सलाही त्याला अपवाद नाहीच.
१८५७चे स्वातंत्र्यसमर ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकण्यात यशस्वी झाले नाही; पण त्याने ब्रिटिशांच्या छातीत धडकी भरली, हे मात्र नक्की. सरकारच्या विरोधात क्रांतिकार्य करणार्या देशभक्तांना तुरुंगात ठेवताना भारताच्या मुख्य भूमीपासून दूर नेऊन ठेवले पाहिजे, असे सरकारने ठरवले आणि त्यासाठी अंदमान बेटांची निवड केली. ही बेटे भारताच्या पूर्व किनार्यापासून सुमारे १ हजार, २०० किमी दूर आहेत. चहुबाजूंनी असलेला समुद्र, जवळ-जवळ वर्षभर पडणारा पाऊस, त्यामुळे असलेले रोगट हवामान, प्रचंड मोठे आणि घनदाट जंगल, तेथे असलेले त्रासदायक
पोर्टब्लेयर/मुंबई : केंद्रशासीत प्रदेशांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबध्द आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच, अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी यासाठी पोर्टब्लेयर येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डानांची सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची आपण भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. देशात १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु क
आपल्या देशातील सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये तीन प्रांतातील योद्धे मोठ्या प्रमाणावर होते. हे तीन प्रांत म्हणजे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब. या लेखात मी तुम्हाला बंगालमधील तीन तेजस्वी वीरांची गाथा सांगणार आहे.
विनायक दामोदर सावरकर यांचा दि. २८ मे हा जन्मदिवस, तर दि. ९ जून हा भगवान बिरसा मुंडांचा स्मृतिदिन. या पंधरवड्यात आपण सारे या दोन महाविभुतींपुढे नतमस्तक होत त्यांना श्रद्धापूर्वक अभिवादन करत असतो. या दोन लोकोत्तर युगपुरुषांच्या बंदिगृहातील ‘निद्रे’वरची त्यांची मनोगते मला सर्वस्वी चिंतनीय वाटतात. म्हणून त्यांचे विचार माझ्या लेखात सादर करावे असे वाटते. यानिमित्ताने निद्रेची अध्यात्मिक परिक्षेत्रातील कल्पनाही सार्यांनी जाणून घ्यावी असेही वाटते. यावर आधारित ‘निद्रारूपेण संस्थिता’ या लेखाचा हा पहिला भाग...
अत्यंत थकलेल्या, उपाशी असलेल्या वामनरावांना नाशिकच्या सरकारवाडा येथे असलेल्या तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची कसून चौकशी झाली. पण, वामनराव नमले नाहीत. पुढे खटला उभा राहिला. कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी सुनावण्यात आली. तात्याराव सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामनराव जोशी यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. वामनराव जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा नऊ वर्षांचा काळ अंदमानात घालवला. त्यांनी कोलू फिरवला आणि अंदमानात जे अनन्वित छळ होत होते, त्याला तोंड दिले.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनने १२ कोटी नळजोडणाचा टप्पा ओलांडून मोठे यश साध्य केले आहे. त्याचप्रमाणे ९.०६ लाख शाळा आणि ९.३९ लाख अंगणवाड्यांमध्येही नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.
चीनकडे जगातील सर्वांत मोठ्या खोल समुद्रातील मासेमारी नौकांची मालकी आहे, जी चिनी नौदल आणि तटरक्षकांना मदत करणारे ‘सागरी मिलिशिया’ म्हणूनही काम करते. भारतानेही आपली आर्थिक आणि सुरक्षा उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी स्वत:चा मासेमारी फ्लीट ताफा वाढवला पाहिजे आणि आधुनिक बंदरे बांधली पाहिजेत. त्याविषयी...
सागरी जैवविविधतेवर निस्सीम प्रेम करणार्या आणि त्या जैवविविधतेच्या शास्त्रीय अभ्यासातून संवर्धनासाठी कार्यरत डॉ. वर्धन पाटणकर यांचा जलमय प्रवास...
“अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 निर्जन बेटांचे परमवीर चक्र वीरांच्या नावाने नामकरण करणे ही त्या सैनिकांना खरी श्रद्धांजली आहे. ज्यांनी आपल्या उद्यासाठी आपला आज दिला,” असे प्रतिपादन अंदमान आणि निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी केले. सरकारने अंदमान आणि निकोबारमधील 21 निर्जन बेटांना परमवीर चक्र प्राप्तकर्त्यांची नावे प्रदान केली आहेत.
अंदमान-निकोबार बेटांचे नकाशातील स्थान बघता चीनने नुकतेच या बेटांपासून जवळ असणार्या कंबोडिया देशामध्ये नाविक तळ उभा करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर भारतदेखील अंदमान-निकोबार बेटांवर आर्थिक, सामरिक सुधारणा करत आहे. नुकतीच ‘एअरटेल’ने व त्याआधी ‘बीएसएनएल’ने अंदमान-निकोबार बेटांपर्यंत ‘4जी’ दूरसंचार सुविधा पोहोचवली आहे. या पार्श्वभूमीवर समजून घेऊया, अंदमान-निकोबर बेटांचे महत्त्व...
बंगालच्या खाडीतील अंदमान-निकोबार बेटांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ वर्षांत अफाट परिश्रम घेतले. तत्पूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात अंदमान-निकोबार कमांडची स्थापना करण्यात आली होती.
पुढे अंदमान-निकोबारला जाण्याचा योग आला. मुंबई ते चेन्नई आणि पुढे चेन्नई ते पोर्ट ब्लेअर असा विमानाचा प्रवास. विमान आता विमानतळावर उतरणार होतं तेच विमानाच्या खिडकीमधून तो अथांग निळाशार समुद्र खुणावत होता आणि पुन्हा त्याच आठवणी डोक्यात कल्लोळ करत होत्या. थोड्याच वेळात त्या पवित्र भूमीमध्ये विमान उतरलं. पवित्र यासाठी की, ती भूमी साक्षीदार होती त्या सावरकरांच्या अस्तित्वाची, अन् सावरकर तिथे जीवंत समोर उभे दिसले.
‘आधुनिक काळातील कालिदास’ अशीच पदवी ज्यांना शोभून दिसेल, असे कविवर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांच्या कवितेत फक्त देशप्रेमच नाही, तर कारुण्यरस, वीररस ज्वलंत भावनेने दिसून येतात. सावरकरांच्या कवितांचे जर वर्गीकरण केले गेले, तर त्यामध्ये देशप्रेम, विरह, स्तुतीपर काव्य असे वेगवेगळे भाग करता येतील. यातील काही कवितांमधले भाव तर इतके तरल आहेत की, ही कविता त्यांनी अंदमानसारख्या भीषण परिस्थितीत लिहिली असेल, असं वाटत नाही.
येसूवहिनींची पुण्याई म्हणावी की प्रारब्ध हे कळत नाही, पण वयाच्या 13व्या वर्षी पूर्वाश्रमीची सरस्वती फडके सावरकरांच्या घराण्याची सून झाली. पुण्याई यासाठी, कारण सावरकरांकडे वतनदारी होती. त्यामुळे सधन कुटुंबात येसूवहिनींचा गृहप्रवेश झाला. मात्र, प्रारब्ध यासाठी, कारण गृहलक्ष्मीने प्रवेश केल्यानंतर काही काळातच वैभवलक्ष्मीने सावरकरांच्या घराकडे पाठ फिरवली. मात्र, या दोन्ही स्थितीत ही माऊली आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी आणि त्याही पुढे जाऊन सांगायचे, तर आदर्श वहिनी ठरली. वहिनी केवळ सावरकर बंधूंचीच नाही, तर अखिल महारा
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर` हे नाव कानावर पडताच एक नव्हे, अनेक असे त्यांचे अवतार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. महाकवी, उत्कृष्ट वक्ता, लेखक, क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक आणि विलक्षण दूरदृष्टी असलेला हिंदूनिष्ठ नेता अशा अनेक अवतारांची सांगड म्हणजे तात्याराव सावरकर. पण, त्यांची भूमिका कुठलीही असली तरी मनातले ध्येय मात्र एकच आणि ते म्हणजे राष्ट्रसेवा. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सावरकरांच्या जीवनातील अशाच काही धीरोदात्त प्रसंगांचे स्मरण करणारा हा लेख...
अंदमान आणि निकोबार बेटावरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची आश्चर्यकारक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ब्रिटीश राजवटीत वीर विनायक दामोदर सावरकरांना बेटांवर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
यावर्षी हवामान खात्याच्या अचूक अंदाजानुसार मान्सून अंदमानच्या किनारपट्टीवर लवकर धडकणार असून येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवा्यातील काही भागात तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी वर मान्सून पुर्व पाऊस कोसळेल असे भाकित वेधशाळेने केले आहे.
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आयपीएस, रेल्वे संरक्षण दल आणि अंदमान-निकोबार, दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप पोलीस सेवेत नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी शुक्रवारी (दि. २५ मार्च) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हा निर्णय अंतरिम असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
अरबी समुद्रात तयार झालेले तौत्के चक्रीवादळ शमण्याच्या वाटेवर असताना आता बंगालच्या उपसागरामध्ये एका चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. परिणामी वादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाचे नाव 'यास' असून पुढच्या आठवड्यात रोजी ते पश्चिम बंगालच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे.
‘सी व्हिजिल २१’ युद्धसराव आणि आता त्या पाठोपाठ फक्त चार संरक्षण दलांचा सहभाग असलेला ‘टोपेक्स २१’ हा मुख्य युद्धसराव, याद्वारे देश, शांततेचा काळ अथवा युद्धकाळ यांत उभ्या राहू शकणार्या कोणत्याही सागरी आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे, समर्थ आहे.
आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे
सुमारे १३५ किमी लांब असा हा प्रकल्प आहे. तसेच, हा कालवा थायलंडचे आखात आणि अंदमान येथील समुद्र यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे. भारत या प्रकल्पाच्या शर्यतीत सहभागी झाला असल्याने याचा मोठा सामरिक फायदा येणार्या काळात भारताला होणार आहे. तसेच, यामुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रादरम्यानचे अंतरदेखील घटणार आहे.
अमेरिकेचे सर्वांत ताकदवान दोन ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ अर्थात विमानवाहू युद्धनौका भारताच्या दक्षिण टोकापासून दक्षिण अंदमान-निकोबारचीन समुद्राच्या दिशेने जात होते. या जगातल्या सर्वांत शक्तीमान युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ‘न्यूक्लिअर प्रोपेलशन’चा (अणुशक्तीचा) वापर केला जातो. अमेरिकेची शक्तीशाली विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस निमित्ज’ने अंदमान-निकोबारच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसोबत कवायती केल्या. त्यामुळे भारतीय आणि अमेरिकन नौदलाचा हा संयुक्त नौदल सराव दादागिरी करणार्या चीनसाठी एक मोठा इशारा आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्ष आणि वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले
अंदमानचे सेल्युलर जेल मराठी माणसांच्या ओळखीचे झाले ते सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथनातून. योगी अरविंदांचे धाकटे बंधू बारींद्र कुमार घोष (जन्म १८८०-मृत्यू १९५९) हे ही त्या तुरुंगात होते. ‘द टेल ऑफ माय एक्झाइल’ या त्यांच्या आत्मकथनातून त्यांच्या तेथील १२ वर्षांच्या वास्तव्यामधले अनुभव कळतात. यातील एका प्रकरणाचा हा अनुवाद...
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांपैकी नील बेट अर्थात शहीद बेटाला ‘कचरेवाले’ अभियानातून कचरामुक्त करणार्या गरिमा पूनिया या तरुणीची ही प्रेरक कथा...
म्हणतात ना, आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक प्रसंगच पुरेसा असतो. असेच काहीसे घडले ते भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलपटू डेबोराह हेरॉल्डसोबत...
चीनचे जागतिक व्यापार, तेल हिंदी महासागरातून मलक्का समुद्रधुनीतून जाते आणि आपण ते थांबवू शकतो. ‘अखंड सावधानता’ हाच मंत्र आहे.
अंदमान-निकोबार बेटांपैकी बाहेरील नागरिकांस प्रवेश निषिद्ध असलेल्या नॉर्थ सेंटीनेल बेटावर साहसी पर्यटनासाठी गेलेल्या जॉन अॅलन चाऊ या अमेरिकन नागरिकाची बेटावर हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
एकीकडे बौद्ध संस्कृतीची संपन्नता, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींची परस्पर स्पर्धा असा पारंपरिक वारसा जपूनही आधुनिकतेचा साज ल्यायलेला थायलंड हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश. भारताच्या पूर्वेला आणि अंदमान-निकोबार बेटांपासून केवळ एक हजार किमी दूर अशा या देशातील बँकॉक आणि पटाया या दोन प्रमुख पर्यटन शहरांना भेट देण्याचा योग जून महिन्यात जुळून आला. याच अनुभवांचे प्रवासवर्णन रेखाटणारा हा लेख...
स्वा. सावरकरांच्या पत्रात-ज्याला त्यांचे विरोधक क्षमापत्र म्हणून दाखवतात, त्यात नेमका काय उल्लेख होता? सावरकरांनी ब्रिटिशांपुढे काय म्हणणे मांडले? यासह इतर सर्वच मुद्द्यांचा या लेखातून परार्श घेतला आहे...
सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना व परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी ब्रिटिशांकडे करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी त्यांची नव्हती. त्यासंबंधी सावरकरांच्या तसेच इतर लेखकांच्या ग्रंथातील संदर्भांचा घेतलेला हा आजच्या दुसऱ्या भागातील आढावा...
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांची माफी मागून अंदमानातून सुटले, असे निराधार आरोप फार पूर्वीपासून केले गेले. नादान राहुल गांधींनीही मग कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्याचीच ‘री’ ओढली.
उम्मन चाण्डी आणि गौरव गोगोई यांची अनुक्रमे आंध्र आणि प.बंगालसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यापासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे. काही तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होणार आहे.